शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

रेशन कार्ड धारकांकडे हे पुरावे नसल्यास कार्ड करण्यात येईल निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 11:51 IST

३१ मेपर्यंत प्रक्रिया : उत्पन्न, रहिवासी पुरावा नसल्यास आता कार्ड निलंबित

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अपात्र लाभार्थी सरकारी स्वस्त धान्याचा लाभ घेत असल्याने पुरवठा विभागाद्वारा अशा रेशन कार्डधारकांचा ३१ मेपर्यंत शोध घेण्यात येणार आहे. ई-केवायसीमुळे या प्रकाराला आता बराचसा आळा बसला आहे. या मोहिमेत आता रेशन कार्डधारकांच्या वार्षिक उत्पन्नासह रहिवासी पुराव्याची पडताळणी होणार आहे. हा पुरावा नसल्यास रेशन कार्ड रद्द होणार आहे.

सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये रेशन कार्ड तपासणी ही निरंतर प्रक्रिया आहे व यामध्ये आता रेशन दुकानदार यांच्यामार्फत एक अर्ज देण्यात येणार आहे. यामध्ये अर्जासोबत शिधापत्रिकाधारकाला ते त्या भागात राहत असल्याचा कोणताही एक पुरावा द्यावा लागणार आहे. यामध्ये भाडेपावती, निवासस्थानाच्या मालकीबाबत पुरावा, गॅस जोडणी क्रमांकाची पावती, बँक पासबुक, विजेची देयक, टेलिफोन देयक, ड्रायव्हिंग लायसन्स, ओळखपत्र, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड आदी प्रती देता येणार आहेत व हे सर्व फॉर्म रेशनदुकानद्वारा पुरवठा विभागाकडे जमा करण्यात येणार आहेत.

... तर नोटीसपश्चात रेशन कार्ड निलंबितशिधापत्रिकाधारकांना वास्तव्याच्या पुराव्यासह आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी नोटीस पुरवठा विभाग बजावणार आहे. निलंबित रेशन कार्डधारकास पुन्हा १५ दिवसांचा कालावधी देण्यात येणार आहे व या अवधित कागदपत्रे सादर न झाल्यास शिधापत्रिका रद्द करण्यात येणार आहे.

"शासन निर्देसानुसार जिल्ह्यात प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ई-केवायसीमुळे अपात्र लाभार्थ्यांना चाप बसला आहे."- प्रज्वल पाथरे, सहा. जिल्हा पुरवठा अधिकारी

टॅग्स :Amravatiअमरावती