शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

वीजवापर शून्य ते 30 युनिट असेल तर सावधान, होऊ शकते तपासणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2021 05:00 IST

सर्वाधिक वीजचोरी औद्योगिक ग्राहक करीत असल्याचे अलीकडे महावितरणने जारी केलेल्या आकडेवाडीतून दिसून आले. गत महिन्यात ९० लाखांची  वीजचोरी पकडली असून, ४०० वीजचोरांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. घरगुती,  ग्राहकही वीजचोरीत मागे नसून अत्याधुनिक किटचा वापर करून वीजचोरी केली जात असल्याचे निदर्शनास येत आहे.

संदीप मानकरलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महिन्याला ० ते ३० युनिट वीज वापरणाऱ्या मीटरची तपासणी महावितरणतर्फे अनेक ठिकाणी केली जात आहे. ० ते ३० युनिटपर्यंत विद्युत ग्राहकांचा वापर असेल तर असे ग्राहक संशयाच्या भोवऱ्यात अडकणार असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. अशा वीजग्राहकांची तपासणी करून दोषी आढळल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.मीटरमध्ये फेरफार, इलेक्ट्रिॉनिक्स चिप्स वा रिमोटच्या माध्यमातून मीटर गती मंद केली जात असल्याचे प्रकार अलीकडे पुढे आले आहे. वीजबिलाच्या वसुलीसह वीजचोरी करणाऱ्या ग्राहकांवरसुद्धा वीज विभागाचे लक्ष असल्याचे सूत्रांनी  सांगितले.

दररोज लाखाेची वीजचोरीसर्वाधिक वीजचोरी औद्योगिक ग्राहक करीत असल्याचे अलीकडे महावितरणने जारी केलेल्या आकडेवाडीतून दिसून आले. गत महिन्यात ९० लाखांची  वीजचोरी पकडली असून, ४०० वीजचोरांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. घरगुती,  ग्राहकही वीजचोरीत मागे नसून अत्याधुनिक किटचा वापर करून वीजचोरी केली जात असल्याचे निदर्शनास येत आहे.

दिवाळी आधीच सात हजार नागरिकांच्या घरात अंधारकृषीग्राहक सोडून घरगुती, वाणिज्य व औद्योगिक वीज ग्राहकांकडे कोट्यवधींची थकबाकी आहे. महावितरणच्या पथकाला या महिन्यात १६० कोटी वीजबिल थकबाकी करण्याचे आदेश होते. त्याकरिता पथक कामाला लागले आहे. मुख्य अभियंता व अधीक्षक अभियंता रस्त्यावर उतरून वीजग्राहकांना आव्हान करून वीजबिल भरण्यास सांगत आहेत. कोळसा टंचाईमुळे विजेची निर्मिती अडचणीत आली असताना वसुलीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी रोज शेकडो ग्राहकांची वीज कापली जात आहे. जिल्ह्यात या महिन्यात सात हजार लोकांची वीज कापण्यात आली. त्यांनी पैशे भरल्यानंतर वीजपुरवठा पूर्ववत केला जात आहे. त्यामुळे हजारो घरगुती ग्राहकांची घरात दिवाळीपूर्वीच अंधार झाला आहे.

जिल्ह्यातील वीज ग्राहक

शून्य ते ३० युनिटपर्यंतच वीज ग्राहकांचा वापर असेल अशा मीटरची तपासणी करतो. आतापर्यंंत १२ हजार मीटरची जिल्ह्यात तपासणी केली. सध्या थकबाकी न भरणाऱ्या ग्राहकांची वीज कापली जात आहे. ग्राहकांनी आम्हाला समजून घेऊन विद्युत बिलाचा भरणा करून महावितरणला सहकार्य करावे. - दिलीप खानंदे, अधीक्षक अभियंता

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीज