गणेश वासनिक अमरावतीराज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी शासनाच्या १५ वर्षांच्या कार्यकाळात आयएएस अधिकाऱ्यांच्या मंत्र्यांसोबत असलेल्या सलोख्याला भाजप नेत्यांनी ‘ब्रेक’ देण्याची तयारी चालविली आहे. मंत्रालयात एकाच ठिकाणी ठिय्या मांडून बसलेल्या बड्या आयएएस अधिकाऱ्यांची यादी तयार करण्यात येत आहे. आघाडीच्या काळात भाजप नेत्यांसाठी अडचणीच्या ठरलेल्या आयएएस अधिकाऱ्यांची सरकार स्थापन होताच उचलबांगडी करण्याची तयारी देखील करण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.एकनाथ खडसे, देंवेद्र फडणवीस, सुधीर मुंनगंटीवार, विनोद तावडे, भाऊसाहेब पुंडकर, शोभा फडणवीस हे नेते मागील १० ते १५ वर्षापासून विधीमंडळात भाजपचे नेतृत्व करीत आहेत. आघाडी शासनाच्या कार्यकाळात भाजपच्या नेत्यांना ज्या आयएएस अधिकाऱ्यांकडून त्रास झाला, अशांची यादी तयार केली जात आहे. लवकरच राज्यात भाजपचे शासन आरुढ होणार आहे. भाजपचे नेते ठरवतील त्याच आयएएस अधिकाऱ्यांना मंत्रालयात सचिव, अतिरिक्त सचिवपदी कायम राहता येईल, अन्यथा आघाडी शासनाच्या कार्यकाळात मंत्र्याशी सलोख्याचे संबंध असणाऱ्या अधिकाऱ्यांची खैर नसल्याची चर्चा हल्ली सुरू आहे.
आयएएस अधिकारी-मंत्र्यांच्या सलोख्याला बे्रक!
By admin | Updated: October 25, 2014 01:58 IST