शहरं
Join us  
Trending Stories
1
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
2
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
3
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
4
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
5
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी
6
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
7
शाळेच्या गेटमधून आत शिरली, अचानक चक्कर येऊन कोसळली; सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू
8
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
9
दुसरा श्रावण गुरुवार: १० मिनिटांत होणारे प्रभावी ‘गुरुस्तोत्र’ म्हणा; दत्तगुरूंची कृपा मिळवा
10
डोळ्यांवर काकडी ठेवल्याने खरंच रिलॅक्स वाटतं की फक्त ब्यूटी ट्रेंड? सत्य समजल्यावर वाटेल आश्चर्य
11
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
12
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
13
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?
14
नवा ट्विस्ट! "तू ये, नाहीतर तो मला मारून टाकेल"; लेकीचा 'तो' ऑडिओ ऐकून कुटुंबाला मोठा धक्का
15
इम्रान खान समर्थकांचा पाकिस्तानात मोठा राडा, ५००हून अधिक लोकांना अटक! झालं काय?
16
RBI Repo Rate: रेपो रेट म्हणजे काय रे भाऊ? तो वाढल्यानं का वाढतो तुमचा EMI? जाणून घ्या
17
Video : दुचाकीवर हेल्मेट घालणं टाळता? हा व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी घरातूनच हेल्मेट घालून बाहेर पडाल! 
18
"घरं गाडली गेली, फक्त छप्पर बाहेर; आम्ही शिट्ट्या वाजवत होतो जेणेकरून लोकांना पळता येईल"
19
दुसरा श्रावण गुरुवार: फक्त १० मिनिटे ‘अशी’ स्वामी सेवा करा; चिंतामुक्त व्हा, पुण्यच लाभेल!
20
ट्रम्प यांनी जपानला फसवलंय, आता भारताची पाळी..; चिनी एक्सपर्टनं अमेरिकेचा असा केला पर्दाफाश

मला मुख्यमंत्र्यांनी पाठविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 22:18 IST

मला अमरावतीत मुख्यमंत्र्यांनी पाठविले. मी दूत म्हणून आलोय. आ. रवि राणा हे मुख्यमंत्र्यांचे चांगले मित्र आहे. त्यांची विकासासाठी धडपड खरेच कौतुकास्पद असून, त्यांना मुख्यमंत्र्यांनी भरभरून निधी दिला आहे. मीदेखील दोन कोटींचा निधी देत असल्याची घोषणा राज्याचे सामाजिक न्याय व अल्पसंख्याक राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी रविवारी येथे केली.

ठळक मुद्देदिलीप कांबळे : १७ कोटींच्या विकासकामांना प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मला अमरावतीत मुख्यमंत्र्यांनी पाठविले. मी दूत म्हणून आलोय. आ. रवि राणा हे मुख्यमंत्र्यांचे चांगले मित्र आहे. त्यांची विकासासाठी धडपड खरेच कौतुकास्पद असून, त्यांना मुख्यमंत्र्यांनी भरभरून निधी दिला आहे. मीदेखील दोन कोटींचा निधी देत असल्याची घोषणा राज्याचे सामाजिक न्याय व अल्पसंख्याक राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी रविवारी येथे केली.येथील कल्याणनगरात विविध विकासकामांच्या भूमिपूजनाप्रसंगी ना. कांबळे बोलत होते. आ. राणांच्या विकासकामांचा आलेख मांडला. मतदारसंघात मागास वस्त्यांमध्ये नाल्या, रस्ते, समाजभवन, शादीखाना, स्मशानभूमिचे बांधकामे आदींना त्यांनी प्राधान्य दिले. बडनेरा मतदारसंघातील गरीब, सामान्य कुटुंबीयांसोबत त्यांचे आपुलकीचे स्नेह आहे. आ. राणांच्या आग्रहाखातर स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात कोंडेश्र्वर देवस्थानसाठी २५ कोटी, राजापेठ उड्डाणपुलासाठी ३० कोटी व ऋणमोचन देवस्थानसाठी १२ कोटींचा निधी मंजूर केल्याचे ना.दिलीप कांबळे म्हणाले. यावेळी उपस्थितांमधून टाळांच्या कडकडाटाने आ. राणांवर कौतुकाचा वर्षाव झाला. मंचावर नवनीत राणा, प्रबोधनकार सत्यपाल महाराज, नीळकंठ कात्रे, बाबासाहेब शिरभाते, अजय गाडे, दादाराव महल्ले, रॉय काका, जयश्री मोरय्या, गजानन बोंडे, जयंतराव वानखडे, गणेशदास गायकवाड, रूपेश खडसे, संजय हिंगासपुरे, सुमती ढोके, सपना ठाकूर आदी उपस्थित होते.विरोधकांनो, सोशल मीडियाच्या बाहेर पडा - रवि राणाभूमिपूजन कार्यक्रमाच्या निमित्ताने आ. रवि राणा यांनी विरोधकांवर ताशेरे ओढताना नागरिकांची प्रामाणिकपणे कामे करा. व्हॉट्सअप, फेसबूक सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजात संभ्रम निर्माण न करता प्रभागात विकासकामे करा, असा मौलिक सल्ला त्यांनी दिला. छत्रीतलाव परिसराचा विकास करण्यापासून मला कुणीही रोखू शकणार नाही, असा थेट प्रहार आ. राणांनी विरोधकांवर केला.निराधार योजनेचा लाभ दोन हजार रूपये द्याशासनाच्या संजय गांधी निराधार, श्रावण बाळ निराधार योजनेतील लाभार्थ्यांना मिळणारे ६०० ऐवजी दोन हजार रूपये अनुदान देण्याची मागणी युवा स्वाभिमान संघटनेच्या मार्गदर्शक नवनीत राणा यांनी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्याकडे केली. विधवा, परितक्ता, अपंगांना न्याय देण्याविषयीची भूमिका नवनीत राणा यांनी मांडली.