शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

आय लव यू; तेरा फोटो देखके दिल आ गया है! बँक मॅनेजर महिलेला व्हाईस मेसेज

By प्रदीप भाकरे | Updated: April 15, 2023 08:37 IST

'आय लव यू, तेरा फोटो देखके तेरेपे दिल आया है, जानेमन पैसा मत दे, सिर्फ एक बार तेरे साथ खाना खाना चाहता हूँ' असा व्हाईस मेसेज टाकून एका बँक सहव्यवस्थापक महिलेचा विनयभंग करण्यात आला.

अमरावती : 

'आय लव यू, तेरा फोटो देखके तेरेपे दिल आया है, जानेमन पैसा मत दे, सिर्फ एक बार तेरे साथ खाना खाना चाहता हूँ' असा व्हाईस मेसेज टाकून एका बँक सहव्यवस्थापक महिलेचा विनयभंग करण्यात आला. ७ एप्रिल रोजी ४:२० ते ५:४२ दरम्यान तिला एकूण आठ व्हाईस मेसेज करण्यात आले. त्यात तिला अश्लील शिवीगाळदेखील करण्यात आली. याप्रकरणी शहर कोतवाली पोलिसांनी आरोपी राजेश मिश्रा (रा. ठाणे) याच्याविरोधात १३ एप्रिल रोजी रात्री ९ च्या सुमारास गुन्हा दाखल केला.

येथील एका बँकेत सहव्यवस्थापक असलेल्या महिलेकडे बँक शाखांच्या नूतनीकरणाची जबाबदारी आहे. अशाच एका बँक शाखेच्या नूतनीकरणाचे काम ठाणे येथील एका कंपनीकडे असून, त्या कंपनीचा प्रतिनिधी म्हणून आरोपी राजेश मिश्रा काम पाहतो. त्या फर्मचा प्रतिनिधी म्हणून या महिला व्यवस्थापकाची त्याच्यासोबत ओळख झाली. त्यातून त्याने ७ एप्रिल रोजी तिला व्हाईस मेसेज पाठविला.

अन्य दुसऱ्यालाही पाठविला मेसेजआरोपी राजेश मिश्रा एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने त्या बँकर महिलेच्या सहकाऱ्याच्या व्हॉट्सअॅपवर त्याच दिवशी सायंकाळी ६:४१ ते ६:४४ दरम्यान व्हाईस मेसेज पाठविला. त्यात महिलेसह तिचा अन्य एक सहकारी गायब असल्याने काम कसे करायचे, ते समजत नसल्याचे म्हटले. असे काम करून दाखवेल की, तुम्ही विचार करू शकणार नाही, असे म्हणत बँकर महिलेशी एक मीटिंग करवून द्या, तिला एकटीला एकदा पाठवा, असे तो व्हाईस मेसेजमधून म्हणाला. यातून आरोपीने आपल्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी व्हाईस मेसेज पाठविल्याची महिला बँकरची खात्री पटली. तिने ती बाब तिच्या वरिष्ठांना सांगितली.

तो वृद्ध इंजिनिअर आणखी पाच- दहा वर्षे जिवंत राहील, पण तुझा फोटो मेसेज आरोपीने डिलिट करण्यापूर्वी पाहून माझे मन तुझ्यावर आले आहे, आपल्या मित्राला पाठविले, तर असे त्यात नमूद होते. ते एकूण आठ थोड्याच वेळात आरोपीने ते मेसेज व्हाईस मेसेज ऐकताच महिलेने ते डिलिट केले.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅप