शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

'आय क्लीन अमरावती'च्या वारली पेंटिंगची ऐसीतैसी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 22:03 IST

'आय क्लीन अमरावती' च्या उपक्रमाला गालबोट व हरताळ फासण्याचे प्रकार सद्यस्थितीत शहरात सुरू झाले आहेत. काही दिवसांपूर्वी नवाथे नगरातील भूमिगत मार्गाच्या भिंतींवर एका राजकीय नेत्याच्या कार्यक्रमांचे पोस्टर लावण्यात आले होते, तर आता शिवाजी विज्ञान महाविद्यालय व गर्ल हायस्कूलसमोरील भिंतींवरील वारली पेटिंगची ऐसीतैसी करण्यात आली.

ठळक मुद्देस्वच्छ, सुंदर अमरावतीला गालबोट : तरुणांचे परिश्रम ठरताहेत निष्फळ

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : 'आय क्लीन अमरावती' च्या उपक्रमाला गालबोट व हरताळ फासण्याचे प्रकार सद्यस्थितीत शहरात सुरू झाले आहेत. काही दिवसांपूर्वी नवाथे नगरातील भूमिगत मार्गाच्या भिंतींवर एका राजकीय नेत्याच्या कार्यक्रमांचे पोस्टर लावण्यात आले होते, तर आता शिवाजी विज्ञान महाविद्यालय व गर्ल हायस्कूलसमोरील भिंतींवरील वारली पेटिंगची ऐसीतैसी करण्यात आली. अमरावतीला स्वच्छ व सुंदर ठेवण्याचे प्रयत्न करणाऱ्या काही तरुणांचे परिश्रम निष्फळ ठरत असल्याचे यावरून दिसून येत आहे.शहर स्वच्छ व सुंदर राहावे, यासाठी झपाटलेल्या काही तरुणांनी आय क्लिन अमरावती उपक्रम राबवून भिंतींवर वारली पेंटिंग काढून संदेश दिला. शहरातील शासकीय परिसरातील भिंतींवर वारली पेंटींगच्या माध्यमातून आय क्लिन अमरावतीचा संदेश दिला. तो संदेश वाचून आजपर्यंत कोणीही त्या भिंतींवर थुंकण्याची किंवा पोस्टर लावण्याचे धाडसही केले नाही. त्यामुळे या उपक्रमाला अमरावतीकरांचा चांगला प्रतिसाद मिळाले. तरुणांच्या या उपक्रमाचे कौतुक जिल्हा प्रशासनानेही केले. महापालिकेनेही पुढाकार घेत आय क्लिन अमरावती उपक्रमाला सहकार्य केले. त्यामुळे तरुणांचा उत्साह वाढला होता. त्यांनी शहरातील बहुंताश भिंतींवर वारली पेंटिंग काढून आय क्लिन अमरावतीचा संदेश दिला. मात्र, नुकतेच नवाथे नगरातील रेल्वे क्रॉसिंगचा अंडरपाथवरील भिंंतीवर एका राजकीय पक्षांच्या कार्यक्रमाचे पोस्टर लावण्यात आल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे आता या भिंती पुन्हा अस्वच्छ व विद्रुप दिसायला लागल्या आहेत. यांची खंत उपक्रम राबविणाऱ्यांनी तरुणांमध्ये व्यक्त होत आहे. यासंदर्भात ते तरुण महापालिका प्रशासनाकडे दाद मागणार आहे.महापालिका लक्ष देईल का ?महापालिका हद्दीत राबविण्यात आलेला आय क्लिन अमरावती या उपक्रमाची प्रशंसा महापालिका आयुक्तांसह राजकीय नेत्यांनी केली होती. भिंतीवरील वारली पेंटींगचे संदेश अमरावतीकरांना नेहमीच स्वच्छतेविषयक आठवण करून देणारे आहे. मात्र, त्याच संदेशांना नाहीसा करण्याचे प्रयत्न आता शहरात सुरू झाले आहे. असेच होत राहिले, तर स्वच्छ व सुंदर अमरावतीचे स्वप्न कसे पूर्ण होणार, याचीच चिंता उपक्रमात सहभागी तरुणांना सतावत आहे.