शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
4
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
5
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
6
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
7
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
8
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
9
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
10
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
11
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
12
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
13
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
14
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
15
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
16
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
17
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
18
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
19
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
20
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा

नऊ तालुक्यांत हायड्रोपॉनिक चारनिर्मिती प्रकल्प

By admin | Updated: October 15, 2015 00:17 IST

राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत कमी खर्चाच्या हायड्रोपॉनिक तंत्रज्ञानाव्दारे ^(माती विना) हिरव्या चाऱ्याचे उत्पादन घेण्यात येणार आहे.

प्रस्ताव तयार : गतिमान वैरणविकास कार्यक्रमलोकमत विशेषअमरावती : राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत कमी खर्चाच्या हायड्रोपॉनिक तंत्रज्ञानाव्दारे ^(माती विना) हिरव्या चाऱ्याचे उत्पादन घेण्यात येणार आहे. हा प्रकल्प विभागातील ४३ तालुक्यांमध्ये राबविला जाणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील ९ तालुक्यांचा समावेश आहे. अवर्षणप्रवण क्षेत्रातील विभागातील एकूण पाच जिल्ह्यातील तालुक्यांची यासाठी निवड करण्यात आली आहे. गतिमान वैरणविकास कार्यक्रमांतर्गत चारा उत्पादनासाठी लाखो रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. हाड्रोपॉनिक्स तंत्रज्ञानाव्दारे हिरवा चारा निर्मिती प्रकल्प राबविण्यात येणार आहे. अवर्षणप्रवण क्षेत्र या कार्यक्रमात समाविष्ट करण्यात आले आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या गोवा शाखेने हायड्रोपॉनिक्स चारा पध्दती विकसित केली असून ही पध्दती कमी खर्चाची आहे. त्यात पाण्याची गरजही कमी असते, कमीत कमी जागेत व कमी दिवसात हिरव्या चाऱ्याचे उत्पादन घेता येते. मातीशिवाय उगवणाऱ्या या हिरव्या चाऱ्यात पशुधनवाढीसाठी तसेच दुधाचे उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने आवश्यक घटक असल्याची माहिती सूत्रांनी दिली. हिरव्या चाऱ्याची काढणी अत्यंत सोपी आहे. वेळेची बचत व वातावरणातील किडरोगांचा यावर प्रादूर्भाव न होणे ही या चाऱ्याची जमेची बाजू ठरली आहे. अद्याप राज्यात महसूल विभागाने दुष्काळसदृश स्थिती असलेल्या जिल्ह्यांची घोषणा केलेली नाही. त्यामुळे ही योजना राबविण्यासाठी अवर्षणग्रस्त तालुक्यांनाच उद्दिष्ट देण्यात आले आहे. कमी पावसामुळे बऱ्याच ठिकाणी चाराटंचाई आहे. यावर उपाय म्हणून चारा डेपो उघडले जातात. मात्र, यात मोठ्या प्रमाणावर निधी खर्च होतो आणि कायमस्वरुपी तोडगाही निघत नाही. अशा स्थितीत चाऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी हे नवीन तंत्रज्ञान उपयोगी पडणार आहे. गतिमान वैरणविकास कार्यक्रमांतर्गत ही योजना राबविली जाणार आहे, यासाठी १० कोटी रुपये खर्चाला प्रशासकीय मान्यता दिली आहे. यात एका युनिटच्या उभारणीसाठी २४ हजार रुपये खर्च येणार आहे. किंमतीच्या २५ टक्के म्हणजेच सहा हजार रुपये प्रतियुनिट अर्थसहाय्य यासाठी देण्यात येणार आहे. हा प्रकल्प वरदायी ठरण्याची चिन्हे आहेत.जनावरांना कमी दिवसात आणि कमी पाण्यात हिरवा चारा या प्रकल्पाचे माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळे कुठल्याही ऋतूमध्ये हिरवा चारा उपलब्ध राहण्याचे दृष्टीने हा उपक्रम दिलासादायक आहे.-पुरूषोत्तम सोळंके, जिल्हा पशुसंवर्धन, अधिकारी जि.प.या तालुक्यांची निवडजिल्ह्यातील १४ तालुक्यांपैकी ९ तालुके हायड्रोपॉनिक प्रकल्पासाठी निवडण्यात आले आहेत. यामध्ये नांदगाव खंडेश्वर, भातकुली, अचलपूर, चांदूरबाजार, चांदूररेल्वे, तिवसा, दर्यापूर, मोर्शी, धारणी या तालुक्यांमध्ये हा प्रकल्प साकारला जाईल.