भातकुली : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरताच इतर शस्त्रक्रिया सुरू झाल्या आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयात तळवेल व वलगाव हत्तीरोग उपथकाद्वारे एकूण १४ हायड्रोसील रुग्ण भरती करण्यात आले होते. त्यापैकी १० जणांवर शस्त्रक्रिया पार पडली.
शल्यविशारद डॉ संतोष राऊत, भूलतज्ञ डॉ विपीन टोंगळे, डॉ स्वाती बाहेकर, डॉ शीतल सोळंके व जयश्री आंबोरे यांनी शस्त्रक्रिया पार पाडली. हत्तीरोग अधिकारी डॉ. जुनेद यांच्या नेतृत्वाखाली प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी प्रवीण चकुले, आरोग्य सहायक सुधाकर चोपकर व आरोग्य सेवक प्रकाश दातीर यांनी शिबिराचे आयोजन केले. तळवेल येथील आरोग्य सहायक मनोहर, क्षेत्र कर्मचारी दिवाण तसेच वलगावातील रात्र चिकित्सालय येथील आरोग्य सहायक माहुरे, आरोग्य सेवक बरडे व क्षेत्र कर्मचारी चव्हाण यांनी अथक परिश्रम घेतले. या वेळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी मुंद्रे हजर होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांनी २८ सप्टेंबर रोजी मोर्शी उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ. कळसकर यांच्या नेतृत्वाखाली शिबिर आयोजित केले असल्याचे सांगितले.