शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नवरा-बायकोत वाद, बापानेच केले ३ वर्षीय लेकीचे अपहरण

By प्रदीप भाकरे | Updated: January 28, 2024 18:31 IST

पाळणाघरातील घटना : पती, पत्नीत बेबनाव, केस न्यायालयात

अमरावती : पाळणाघरातून तीनवर्षीय चिमुकलीचे तिच्याच वडिलांनी अपहरण केल्याची तक्रार संचालक महिलेने फ्रेजरपुरा पोलिसांत नोंदविली. २५ जानेवारी रोजी दुपारी २:३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी, पोलिसांनी २६ जानेवारी रोजी उशिरा रात्री अपहृत मुलीच्या वडिलांसह अन्य एकाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला.

फिर्यादी महिला या आठ वर्षांपासून फ्रेजरपुरा हद्दीत पाळणाघर चालवितात. तेथे अनेक पालक त्यांच्या लहानग्या पाल्यांना तेथे सकाळी ९:३० ते सायंकाळी सात या कालावधीत सांभाळण्याकरिता सोडून जातात. ज्या चिमुकलीचे अपहरण झाले, ती तीनवर्षीय मुलगीदेखील दीड वर्षापासून त्या पाळणाघरात येत होती. त्या चिमुकलीच्या आईच्या सांगण्याप्रमाणे त्यांचे व त्यांच्या पतीचे न्यायालयात कौटुंबिक हिंसाचाराचे प्रकरण सुरू आहे. न्यायालयाने मुलीचा ताबा आईकडे दिला आहे. त्यामुळे तुम्ही माझ्या मुलीला चांगले सांभाळा, तिला तिच्या वडिलांकडे देऊ नका, असे त्या चिमुकलीच्या आईने आपल्याला सांगितले होते, असे पाळणाघर चालक महिलेने जबाबात म्हटले आहे.

मुलीचे वडील अधूनमधून भेटीसाठी

मुलीचे वडील अधूनमधून पाळणाघरात मुलीला भेटण्याकरिता येत जात असत. २५ जानेवारी रोजी दुपारी २:३० च्या सुमारास मुलीचे वडील पाळणाघरात आले. त्यावेळी त्यांची मुलगी जेवण करीत होती. वडील तिला दिसताच ती त्यांच्याकडे पळत गेली. त्यांनी तिला कडेवर घेतले. माझ्याबरोबर असलेल्या नातेवाइकास मुलीस दाखवितो व परत घेऊन येतो, अशी बतावणी पित्याने पाळणाघरातील एका महिलेकडे केली. त्यावर तशी परवानगी नाही, तुम्ही आतमध्ये येऊन बोला, असे म्हणतच ते मुलीला घेऊन बाहेर गेले तथा तिला मोपेडवर बसवून निघून गेले.

कचोरी खाऊ घालतो अन् परततोपाळणाघरात मुलांना सांभाळणाऱ्या एका महिलेने ती घटना पाहिली. त्यानंतर पाळणाघर संचालक महिलेने लगेचच चिमुकलीच्या आईला मोबाइल कॉल करून घटनेची माहिती दिली. चिमुकल्या मुलीच्या आईने आपल्या पतीस फोन कॉल लावला असता, ‘मी मुलीला कचोरी खाऊ घालतो व परत आणून सोडतो,’ असे त्याने सांगितले. मात्र, २६ जानेवारीच्या रात्रीपर्यंत त्यांनी त्या चिमुकलीला पाळणाघरात आणून सोडले नाही किंवा तिच्या आईच्या ताब्यात दिले नाही. त्यामुळे अखेर पाळणाघर संचालक महिलेने २६ ला रात्री फ्रेजरपुरा पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेत गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Policeपोलिस