शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीचा खून करुन पळून जाणाऱ्या पतीस अखेर अटक; एलसीबीची यशस्वी कार्यवाही  

By प्रदीप भाकरे | Updated: September 17, 2023 14:55 IST

भर रस्त्यात पत्नीचा खून करून पळून गेलेल्या आरोपी पतीला अखेर अटक करण्यात आली.

अमरावती : भर रस्त्यात पत्नीचा खून करून पळून गेलेल्या आरोपी पतीला अखेर अटक करण्यात आली. कचरु सुखराम कास्दे (४८, रा.कावला ता. भैसदेही, मध्यप्रदेश) असे अटक मारेकऱ्याचे नाव असून त्याला ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अमरावतीलगतच्या बडनेरा शहरातून अटक केली. रविवारी ही कार्यवाही करण्यात आली. याप्रकरणी ४ सप्टेंबर रोजी ब्राम्हणवाडा थडी पोलीस ठाण्यात खुनाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. नितु कचरु कास्दे (४२, रा. कावला ता. भैसदेही) असे मृताचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कावला येथील कचरु सुखराम कास्दे हा पत्नी नितु कचरु कास्दे हिच्यासमवेत ४ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातून मजुरी काम करुन घाटलाडकीमार्गे कावला या मुळगावी जात होता. दरम्यान घाटलाडकीसमोरील रस्त्यावर दोघा पतीपत्नीमध्ये वाद होऊन पती कचरु याने पत्नी नितु हिचा खून केला. तथा तो पळून गेला. तो घटनेच्या दिवशीपासून फरार झाला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक त्याच्या पाठीमागे होते. बायकोचा अंतिमसंस्कार टाळलाआरोपी हा पत्नीच्या अंतिमसंस्काराला हजर राहिला नाही. तो गावाकडे फिरकला देखील नाही. दरम्यान तो बडनेरा येथे लपून बसल्याची खबर मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक बडनेरा येथे पोहचले. सापळा लावुन त्यास शिताफीने ताब्यात घेतले. त्याला पुढील कार्यवाही करीता ब्राम्हणवाडा (थडी) पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

यांनी केली कार्यवाही पोलिस अधिक्षक अविनाश बारगळ, अप्पर पोलिस अधिक्षक शशिकांत सातव यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक सचिन पवार, पोलिस अंमलदार युवराज मानमोठे, रविंद्र व-हाडे, स्वप्नील तंवर, सागर नाठे, शांताराम सोनोने, सचिन मिश्रा चालक संजय गेठे यांनी ही कारवाई केली.

टॅग्स :AmravatiअमरावतीCrime Newsगुन्हेगारी