शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

ना खायला देत होती, ना चांगली वागायची! पत्नीच्या त्रासापायी पतीने केली आत्महत्या

By प्रदीप भाकरे | Updated: December 22, 2023 17:31 IST

पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल.

प्रदिप भाकरे पाटील, परतवाडा : पतीच्या त्रासापायी पत्नीने आत्महत्या केल्याच्या अनेक घटना घडत असतात. पतीच्या शारीरिक, मानसिक जाच असहय होऊन अनेक विवाहिता आत्मघात करवून घेतात. मात्र, पत्नीच्या त्रासापायी पतीने आत्महत्या केल्याची घटना अपवादात्मकच. चक्क पत्नीच्या त्रासापायी पतीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना परतवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. यात पतीला छळणाऱ्या पत्नीविरुद्ध परतवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अशोक वसंतराव इंगोले (३५, रा. हिवरा बुद्रूक, ता. नांदगाव खंडेश्वर, हल्ली मुक्काम गौरखेडा कुंभी, ता. अचलपूर) असे मृताचे नाव आहे.                         पोलीस तक्रारीनुसार, अशोक वसंतराव इंगोले याने १ डिसेंबर रोजी गौरखेडा कुंभी येथे आत्महत्या केली. यावरून परतवाडा पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद करून केली. मात्र, चौकशीदरम्यान अशोक इंगोले याला त्याच्या पत्नीने आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून पत्नी सीमा अशोक इंगोले (२९, रा. गौरखेडा कुंभी) हिच्याविरुद्ध परतवाडा पोलिसांनी भादंविचे कलम ३०६ अन्वये २१ डिसेंबर रोजी गुन्हा नोंदविला. अशोक आणि सीमा यांचा सन २०१२ मध्ये विवाह झाला. विवाहानंतर नऊ वर्षे अशोकच्या मूळ गावी हिवरा बुद्रूक येथे दाम्पत्य वास्तव्यास होते. यादरम्यान सीमाने गावातील बचत गटाकडून १ लाख ७० हजार रुपयांचे कर्ज काढले. पण, तिचे घरात कुणाशीही पटत नव्हते. सासरच्या मंडळीसमवेत ती सतत भांडत राहायची. तिच्या वागणुकीमुळे अशोक त्रस्त होता. यातच दीड वर्षापूर्वी अशोकसोबत भांडण करून सीमा माहेरी गौरखेडा कुंभी येथे मुलीसह निघून आली.

काही दिवसांनंतर अशोकही गौरखेडा कुंभी येथे येऊन सीमासोबत राहू लागला. गौरखेडा कुंभी येथील शेरे पंजाब धाब्यावर तो मजुरी करू लागला. सीमाने काढलेल्या बचत गटाच्या कर्जाचे हप्ते तो भरत होता. मात्र, त्यानंतरही सीमा अशोकसोबत भांडायची. त्यांच्यातील नाते जवळपास संपुष्टात आले होते. ती त्याचा छळ करायची.

केवळ पैसा अन् पैसाच!

ती अशोकला जेवायलाही देत नव्हती. सतत पैसे मागायची. हा सर्व घटनाक्रम अशोकने मृत्यूपूर्वी ३० नोव्हेंबर रोजी आपल्या आईला आणि १ डिसेंबरला दुपारी वडिलांना फोनवरून सांगितला. वडिलांसोबत फोनवर बोलणे सुरू असतानाच मध्येच फोन कट झाला आणि काही तासांनंतरच अशोकने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा निरोप त्याच्या आई-वडिलांना मिळाला.

पत्नीच्या त्रासाला कंटाळून अशोकने त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे साक्षीदारांनी सांगितले. साक्षीदारांचा जबाब आणि मृतकाच्या वडिलांच्या तक्रारीवरून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला.-संदीप चव्हान, ठाणेदार, परतवाडा

टॅग्स :AmravatiअमरावतीCrime Newsगुन्हेगारी