शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

पतीने कर्तव्य निभावलं, किडनी देत पत्नीला नवं आयुष्य दिलं!

By उज्वल भालेकर | Updated: June 15, 2024 18:52 IST

सुपर स्पेशालिटीमध्ये ४० वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी

उज्वल भालेकर, अमरावती : आयुष्यभराचा साथ देण्याची शपथ दिलेल्या आपल्या साथीदार पत्नीच्या गंभीर आजारपणात पती देवदूत ठरला आहे. दोन्ही किडनी निकामी झालेल्या ४७ वर्षीय पत्नी सरला तुंडलवार यांना ५७ वर्षीय पती उदय तुंडलवार यांनी आपली किडनी दान देऊन नवे जीवनदान दिले आहे. स्थानिक विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) येथे ४० वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया शुक्रवारी यशस्वी करण्यात आली. या शस्त्रक्रियेनंतर पती, पत्नी दोघांच्याही प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.

विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) येथे अमरावती विभागातून किडनीच्या आजाराने ग्रस्त रुग्ण उपचारासाठी येत असतात. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव कसबा येथील रहिवासी असलेल्या सरला उदय तुंडलवार या मागील दोन वर्षांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त होत्या. त्यामुळे त्यांच्यावर डायलिसिस उपचार सुरू होते. यावेळी आपल्या पत्नीला होणारा त्रास लक्षात घेता पती उदय तुंडलवार यांनी आपल्या पत्नीला किडनी दान करण्याचा निर्णय घेतला. तसेच, आपल्या पत्नीला देखील किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी त्यांनी प्रोत्साहीत करत तयार केले. यावेळी रुग्णालय प्रशासनाने महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया निशुल्क केली.

सुपरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे व विशेष कार्य अधिकारी डॉ. मंगेश मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली नेफरोलॉजिस्ट डॉ. अविनाश चौधरी, युरो सर्जन डॉ. राहुल पोटोडे, डॉ. विक्रम देशमुख, डॉ. राहुल घुले, डॉ. विशाल बाहेकर, डॉ. प्रतीक चिरडे, बधिरिकरणतज्ज्ञ डॉ. रोहित हातगावकर, डॉ. बाळकृष्ण बागवाले, डॉ. दीपाली देशमुख, डॉ. जफर अब्बास अली, डॉ. माधव ढोपरे यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वी केली. यावेळी परिचारिका अनिता तायडे, सरला राऊत, नीता कांडलकर, कविता बेरड, नीलिमा तायडे, लता मोहता, अभिषेक नीचत, स्नेहल काळे, नम्रता दामले, अनिता खोब्रागडे, योगिश्री पडोळे, रेखा विश्वकर्मा सोबतच अभिजित देवधर, वैभव भुरे, अनु वडे, नितीन मते यांनी यासाठी सहकार्य केले.

टॅग्स :Healthआरोग्यAmravatiअमरावती