शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

भूदान चळवळीतील शंभर हेक्टर जमीन महसूल विभागाच्या रेकॉर्डवरून गायब!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 03:43 IST

यवतमाळ जिल्ह्यातील प्रकार; भूदान यज्ञ मंडळाची तक्रार

- गजानन मोहोड अमरावती : आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळचळीदरम्यान दान मिळालेल्या जमिनींची प्रशासनाच्या अनास्थेने वाट लागली आहे. यवतमाळ तालुक्यात मौजा मोहा येथे १००.८५ हेक्टर जमिनीच्या भूदान नोंदी महसूल विभागाच्या रेकार्डवरुन गायब करून प्रशासनाच्या संगनमताने भूमाफीयांनी याची चक्क विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार भूदान यज्ञ मंडळाने उघडकीस आणला आहे. तशी तक्रारही त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.

मौजा मोहा येथील अंंबादास विश्वनाथ भुमरे यांची ४१३.७९ हेक्टर जमीन २८ सप्टेंबरच्या १९५५ चय आदेशानुसार भूदान यज्ञ मंडळाला देण्यात आली होती. फेरफार क्रमांक ३०५३ मधील नमुना १ (११) मध्ये याची रितसर नोंद घेण्याात आलेली आहे. यापैकी १००.८५ हेक्टर आर जमीन ही मोहा येथील सर्वोदय ग्राम परिवार संस्थेला विविध प्रयोजनासाठी देण्यात आली. या संस्थेद्वारा शर्थभंग झाल्याने त्या संस्थेचा भूदान पट्टा भूदान यज्ञ मंडळाने रद्द केला व या जमिनीची नोंद भूदान यज्ञ मंडळाचे नावे करण्याबाबतचे प्रकरण यवतमाळ तहसीलदार यांचे कार्यलयात प्रलंबित आहे.

भूदान यज्ञ मंडळाला प्राप्त झालेली ४१३.७९ हेक्टर जमीन ही ८७ गटात विभागली होती. याची तहसील कार्यालयात नमुना १ क (११) मध्ये तितक्यच गटांची माहिती समाविष्ट असणे आवश्यक आहे. भूदान यज्ञ मंडळाच्या भूदान अंकेक्षणचे संयुक्त सचिव नरेंद्र बैस यांनी याविषयी चौकशी केली असता केवळ ५३ गटांच्याच नोंदी व माहिती या नमुन्यात समाविष्ट असल्याचे उघडकीस आले आहे.उर्वरीर ३४ गट यामध्ये गायब करण्यात आल्याच धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. या गटांची महसूल विभागाच्या संगनमताने दलालांनीच वाट लावल्याचा आरोप होत आहे. भूदानची जमीन अहस्तांतरणीय असल्याने त्याची रितसर नोंद भूदान यज्ञ मंडळाचे नावे करणे महत्वाचे आहे. याविषयी येथील विभागीय आयुक्तांकडे तक्रार करण्यात आलेली आहे.

नोंदी नसलेल्या ३४ गटांची वस्तुस्थिती

पहूर पुनर्वसनाच्या नोंदी असलेले एकूण ८ गट आहेत. याव्यितिरिक्त एकूण ८ गटात ९७१ निवासी प्लॉट पाडून विक्री करण्यात आलेले आहे. अकृषक परावर्तीत १ गट, संगणकीय प्रणालीतून प्राप्त न होऊ शकलेले २ गट आहे. शासन निर्देशाचे उल्लंघन झाल्याची माहिती यवतमाळ जिल्ह्णातील यवतमाळ तहसीलदारांना देण्यात आलेली असतांना अद्यापर्यत प्रकरण प्रकरण निकाली निघालेली नाहीत त्यामुळे आता विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात ठिय्या देण्याच मानस या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :AmravatiअमरावतीMaharashtraमहाराष्ट्र