शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीच्या तोंडावर डिझेलची शंभरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2021 05:00 IST

पेट्रोल-डिझेलने शंभरी पार केल्यामुळे वाहन असलेल्यांचा कौटुंबिक खर्च वाढला आहे. प्रवासावर मर्यादा आल्या आहेत. प्रवास महागला आहे. मालवाहतूक महागल्यामुळे धान्यासह किराणा आणि भाजीपाल्याच्या किमती आधीच वाढल्या आहेत. याने कौटुंबिक खर्चावर मर्यादा आल्या आहेत.

अनिल कडूलोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : डिझेल दिवाळीच्या तोंडावर शंभरी गाठणार असल्यामुळे त्याचा फटका सर्वसामान्यांना बसला आहे. यात प्रवासासह मालवाहतूक महागली आहे. गहू, तांदूळ, तूप, तेलासह विविध प्रकारच्या डाळी, शेंगदाणे आदी किराणा साहित्यदेखील महागले असून, ड्रायफ्रूट्स आधीच महागलेले आहेत. भाजीपाला सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. यातच दिवाळीच्या तोंडावर गृहिणींचा खर्च वाढणार आहे. हा सर्व प्रकार वाहतूक खर्चामुळे घडत आहे. शासनाने पेट्रोल, डिझेलवरील टॅक्स कमी केल्यास किमान दर कायम राहील. त्यामुळे वाहतूक खर्चाचा बोजा कमी होऊन इतर वस्तूंचे दर कायम राहण्यास मदत होईल, असे मत आहे.

मालवाहतूक महागली- डिझेलवाढीमुळे वाहतूक खर्च २० टक्क्यांनी महागला आहे. गहू मध्य प्रदेश, गुजरात, पंजाबमधून येतो. तांदूळही इतर राज्यातून आणला जातो. कपडा सुरत, इंदूरहून, तेल इटारसी, बैतूलहून, नारळ, चहा किराणा बाहेरून येत वाहतुकीमुळे किमती वाढल्या आहेत.

हे महागले- खाद्यतेल, गहू, तांदूळ, तूप, शेंगदाणे, चहा, डाळी, साखर, किराणा, ड्रायफ्रूट्स, गॅस सिलिंडर महागले आहे. कांदे, कोथिंबीर, टमाटे, कोहळे, वांगी, बरबटी, ढेमसे असा हिरवा भाजीपाला महागला आहे.

हे आणखी महागणार- खाद्यतेल, गहू, तांदूळ, तेल, तूप, शेंगदाणे, चहा, डाळींसह ड्रायफ्रूट्स, गूळ, कांदे आणि भाजीपाल्याची बाहेरून वाहतूक होत असल्याने आणखी महागणार आहे.

पेट्रोल-डिझेलने शंभरी पार केल्यामुळे वाहन असलेल्यांचा कौटुंबिक खर्च वाढला आहे. प्रवासावर मर्यादा आल्या आहेत. प्रवास महागला आहे. मालवाहतूक महागल्यामुळे धान्यासह किराणा आणि भाजीपाल्याच्या किमती आधीच वाढल्या आहेत. याने कौटुंबिक खर्चावर मर्यादा आल्या आहेत.- संध्या बोंडे, अमरावती

डिझेल पेट्रोलच्या वाढत्या किमतींचा फटका मध्यमवर्गीयांना बसला आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या असल्यामुळे एक गृहिणी म्हणून घरखर्च सांभाळताना चांगलीच कसरत करावी लागत आहे.- सुलभा उभाड, भिलोना.

 

टॅग्स :DieselडिझेलPetrolपेट्रोल