चिखलदरा : विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळासह तालुक्यातील आदिवासी पाड्यांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू लागली आहेण शनिवारी अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येने शंभरी गाठली. तथापि, दुर्गम भागात विविध ठिकाणी व्हॉलीबॉल स्पर्धा होत आहेत. त्यासाठी जमणारी गर्दी प्रशासकीय उपाययोजनांना आव्हान देत आहे.
गत आठवड्यापर्यंत शांत असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळासह तालुक्यात कोरोनाचा उद्रेक आता होऊ लागला आहे. चिखलदरा, काटकुंभ व चुरणी हे हॉटस्पॉट ठरले आहेत. एकीकडे कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊनचे आदेश असताना, चिखलदरा तालुक्यातील जारिदा, हतरूसारख्या अतिदुर्गम परिसरातील पाड्यांमध्ये पंधरा दिवसांपासून विविध ठिकाणी व्हॉलीबॉल स्पर्धा भरवल्या गेल्या. यात कोरोना त्रिसूत्रीचे नियम पायदळी तुडवले गेले. शेकडो आदिवासींची गर्दी या स्पर्धांना होती. तशी छायाचित्रे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आली.
कोट
शनिवारी आलेल्या अहवालाअंती चिखलदरा तालुक्यातील अॅक्टिव्ह रू ग्णांचे शतक झाले आहे. आरोग्य यंत्रणा परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहे. नागरिकांनी नियमाचे पालन करावे. त्रिसूत्री पाळावी.
- सतीश प्रधान, तालुका वैद्यकीय अधिकारी, चिखलदरा