शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

बडनेऱ्यात पाच तास थांबली ‘हमसफर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 01:41 IST

गंगानगर ते त्रिचरापल्ली हमसफर वातानुकूलित एक्स्प्रेस पावसाच्या धोक्यामुळे बडनेरामार्गे वळविण्यात आली. या आकस्मिक बदलांची कल्पना नसलेल्या पाचशे प्रवाशांनी रेल्वे स्थानकावर मोठा गोंधळ घातला. काही प्रवाशांनी ही गाडी रोखून धरण्याचादेखील प्रयत्न केला.

ठळक मुद्देप्रवासी संतप्त : ट्रेन रोखली, रेल्वे प्रशासनाचा गोंधळ

लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : गंगानगर ते त्रिचरापल्ली हमसफर वातानुकूलित एक्स्प्रेस पावसाच्या धोक्यामुळे बडनेरामार्गे वळविण्यात आली. या आकस्मिक बदलांची कल्पना नसलेल्या पाचशे प्रवाशांनी रेल्वे स्थानकावर मोठा गोंधळ घातला. काही प्रवाशांनी ही गाडी रोखून धरण्याचादेखील प्रयत्न केला. संतप्त प्रवाशांना पाच तासानंतर दुसºया गाडीने भुसावळमार्गे पुण्याला पाठविण्यात आले. त्यानंतरच रेल्वे प्रशासनाने सुटकेचा श्वास घेतला. सदरचा प्रकार बुधवार, ७ आॅगस्ट रोजी घडला.राजस्थानमधील गंगानगर येथून निघालेली हमसफर एक्सप्रेस कल्याणमार्गे केरळमधील त्रिचरापल्ली येथे जाते. ही गाडी बडनेरामार्गे जात नाही. मात्र, मुसळधार पावसामुळे या गाडीला भुसावळहून बडनेरापर्यंत आणण्यात आले. रेल्वे प्रशासनाकडून कुठलीही सूचना न देता आपल्याला एवढ्या दूर का आणले, याचा संताप व्यक्त करीत हमसफर एक्स्प्रेसमधील ५०० प्रवाशांनी बडनेरा रेल्वे स्थानकावर एकच गोंधळ घातला. हमसफर एक्स्प्रेस मूळ मार्गाकडे वळवा, असा त्यांचा आग्रह होता. सकाळी साडेनऊ वाजता ही गाडी बडनेºयात पोहोचली. प्रवाशांच्या गोंधळावर तोडगा काढण्याच्या प्रयत्नात पाच तास ही एक्स्प्रेस बडनेरा रेल्वे स्थानकावर थांबून होती. यादरम्यान प्रवाशांनी इतर गाड्या जाऊ देणार नाही, अशी भूमिका घेतल्याने रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा बल, शहर पोलिसांना पाचारण करण्यात आला. अखेर दुपारी २ च्या महाराष्टÑ एक्सप्रेसने प्रवाशांना भुसावळ व पुण्याकडे रवाना करण्यात आले. स्टेशन प्रबंधक पी.के. सिन्हा, वाणिज्य निरीक्षक शरद सयाम, पोलीस निरीक्षक शरद कुलकर्णी, रेल्वे बलाचे सहायक निरीक्षक एस.जी. वानखडे, पी.के. भाकर आदी अधिकाऱ्यांनी तणाव निवळण्यासाठी परिश्रम घेतले. प्रवाशांना रवाना केल्यावर हमसफर एक्स्प्रेस मार्गस्थ झाली.सूचना मिळाली नाहीगंगानगर येथून निघालेल्या हमसफर एक्स्प्रेसमधील प्रवाशांना गाडी वळविण्यात येणार असल्याची सूचना दिलीच नाही, अशा संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांच्या होत्या. जीपीएस, गाडीतील डिस्प्ले बंद होते. सुरतनंतर गाडीत टी.सी.देखील नसल्याचे प्रवाशांनी बोलून दाखविले.

टॅग्स :railwayरेल्वे