नांदगाव खंडेश्वर : रांची (झारखंड) येथे शुक्रवारी राष्ट्रीय शालेय धनुर्विद्या स्पर्धा पार पडली. यामध्ये येथील एकलव्य धनुर्विद्या अकादमीच्या ५ खेळाडूंचा महाराष्ट्र संघात सहभाग होता. १४ वर्षे वयोगटात ऋतिक सोळंके याने २० मीटर अंतरावर सुवर्ण पदक, रजत पदक व सांघिक रजत पदक प्राप्त करून भारतातून द्वितीय क्रमांक प्राप्त केला. विवेकानंद शामसुंदर याने सांघिक प्रकारात रजत पदक मिळविले. १७ वर्षे वयोगटात ऋषिकेश चांदूरकरने सांघिक प्रकारात रजत पदक मिळवले. ऋषिकेश सध्या भारतीय खेळ प्राधिकरणाच्या औरंगाबाद सेंटरला सराव करतो. हे खेळाडू छत्रपती पुरस्कार प्राप्त सदानंद जाधव, एनआयएस प्रशिक्षक अमर जाधव, क्रीडा संकुलाचे कोच विलास मारोटकर यांच्या मार्गदर्शनात सराव करतात. त्यांच्या निवडीबद्दल राज्य धनुर्विद्या संघटनेचे अध्यक्ष प्रशांत देशपांडे, सचिव प्रमोद चांदूरकर, एकलव्य अकादमीचे राजेंद्र लवंगे, विशाल ढवळे, अनूप काकडे, संदीप डोफे, पवन शिंदे, कमलेश लोमटे, पवन जाधव व पालकांनी कौतुक केले. (तालुका प्रतिनिधी)
एकलव्यच्या ऋतिकला राष्ट्रीय स्पर्धेत १ सुवर्ण, २ रौप्यपदक
By admin | Updated: January 30, 2016 00:19 IST