शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

'तिला' विसरून कसे चालणार? अक्षय्य तृतीयेला रुबी श्वानाला पान ठेवून जपल्या आठवणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 00:37 IST

मागल्या वर्षी रुबी झाली होती अनंतात विलीन

मनीष तसरे, अमरावती: अक्षय्य तृतीयेला आपल्यातून नेहमीकरिता निघून गेलेल्या आप्तेष्टांचा फोटो ठेवून त्यांना मिष्टान्न भोजनाचे पान टाकून त्यांच्या आठवणी जपत असतो. आतापर्यंत आपण घरातील मृत पावलेल्या सदस्यांना पान टाकले आहे. मात्र अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यात उत्तमसरा गावात प्राणीप्रेमी सायंके परिवाराने त्यांच्या परिवारातील सदस्य "रुबी" श्वानाला मिष्टानांचा नैवेद्य दाखवून तिच्याबाबतचे प्रेम आणि ऋणानुबंध जपले आहे.

मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यातील ७ तारखेला रुबी ही 'टिक फिवर' या आजाराने मृत्युमुखी पडली होती. त्या वेळेस सायंके परिवाराने एखाद्या सौभाग्यवतीची सेवागत करावी तशी रुबी श्वानांच्या पार्थिवाची सेवागत केली होती.

तिच्या मृत शरीराला स्नान घालून अत्तर लावले होते. नंतर तिला हिरवी साडी नेसवून तिची नारळाने ओटी भरली होती. तिरडीवर तिचे पार्थिव शरीर सजवून तिची अंतिम यात्राही काढली होती. नाथ संप्रदायाच्या पद्धतीने रुबीला समाधी देण्यात आली होती. तेथून समोर काही दिवसांनी तिचा तिसरा दिवस करत गावातील बालकांना अन्नदान सायंके परिवाराने केले होते. रुबी गेल्यावर तिच्या स्मृतिदिनी या परिवाराने अमरावती येथील वसा संस्थेत उपचार घेत असलेल्या जखमी मुक्या प्राण्यांना एक दिवसाचे पोटभर अन्नदान केले होते.

शुक्रवारी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सकाळीच रुबीचा फोटो ठेवून तिला मिष्टान्नांचा नैवेद्य दाखविण्यात आला. रुबीचे पालक गजानननाथ सायंके सांगतात की, शुभम आणि भूषण या दोघे भावांनी रुबीला अगदी दोन महिन्याची असताना घरी आणले होते. तेव्हापासून आम्ही तिचा घरच्या सदस्याप्रमाणे सांभाळ केला. तिनेही आम्हाला तसाच जीव लावला. शाळेतून आल्यावर बॅग घरात नेणे, गाडीची चावी टेबलवर ठेवणे, सकाळी झोपेतून उठविण्याकरिता अंगावरचे पांघरून दाताने ओढणे, लहान बाळांची काळजी घेणे असे सर्व काम रुबी इमानेइतबारे करायची.

अक्षय्य तृतीयेला रुबीचे पान टाकल्यावर तिच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्यात. ती जिवंत असताना स्वयंपाक होईस्तोवर ती स्वयंपाक घराच्या समोर वाट बघत असायची. घरातील सर्व सदस्य जेवायला बसले की तिला सुद्धा तिच्या भांड्यात जेवण लागायचे. आज आम्ही तिच्या आवडीचे सर्व पदार्थ करून तिला पान वाढले. आजही आम्हाला घरात तिची कमी जाणवते. तिचा फोटो आम्ही अजूनही जपून ठेवला आहे. रुबी राहत असलेल्या खोलीत आजही तिच्या आवडीच्या, खेळायच्या वस्तू आम्ही जपून ठेवल्या आहेत. आमच्यासोबत ७ वर्षे राहिलेल्या रुबीला आम्ही कधीच विसरू शकणार नाही.- कविता आणि वनिता सायंके.

टॅग्स :dogकुत्रा