शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

आणखी किती बळी हवे?

By admin | Updated: February 14, 2016 00:15 IST

अपूर्वा देऊळगावकर... ट्रकचालकाच्या बेदरकारपणाचा बळी ठरलेली तरणीताठी मुलगी.

ट्रकने घेतला तरुणीचा बळी : जनाक्रोश उफाळला, आता उपाययोजनांचा रतीबअमरावती : अपूर्वा देऊळगावकर... ट्रकचालकाच्या बेदरकारपणाचा बळी ठरलेली तरणीताठी मुलगी. स्नेहसंमेलनात सहभागी होण्यासाठी निघालेल्या या जीवावर ट्रकने घाला घातला आणि शहराची वाहतूक व्यवस्था अक्षरश: उघडी पडली. यापूर्वीही ट्रकच्या बेफाम वाहतुकीने अनेकांचे बळी घेतले. वर्षभरात आयुक्तालय हद्दीत झालेल्या अपघातात ७० बळी गेले. त्यातील अनेकांचा जीव ट्रकने घेतला. एखादा अपघात घडल्यानंतर उपाययोजनांचा रतीब घातला जातो. मात्र त्यानंतर काही दिवसांतच परिस्थिती जैसे थे होते. मग प्रश्न उपस्थित होतो की, आणखी किती बळी हवेत?२२ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीचा ट्रक अपघातात अकाली बळी गेल्यानंतर बेदरकार आणि अनियंत्रित वाहतुकीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या अपघाताने समाजमन पुरते हेलावले आहे. शनिवारच्या अपघातानंतरही उपाययोजना राबविल्या जातील. मात्र काही दिवसांनी या उपाययोजना केवळ कागदावरच राहतात. यापूर्वी पीएसआयचा बळीअमरावती : सहामहिन्यांपूर्वी रात्री ११.३० च्या सुमारास पीएसआय हनुमान चवळे यांना ट्रकने धडक दिली होती. त्यांच्या घटनास्थळी मृत्यू झाला होता. चार महिन्यांपूर्वी शेगावनाका परिसरात बेफाम ट्रकने एका दाम्पत्याचा बळी घेतला होता. शुक्रवारी अपूर्वा देऊ ळगावकरच्या अपघाती मृत्यूने जड वाहतुकीच्या नियंत्रणावर प्रश्नचिन्ह लागले आहे.अपूर्वाचा मोठा भाऊ नागपूरवरून परतलामृत अपूर्वाचा मोठा भाऊ सिपना महाविद्यालयात एम.ई.चे शिक्षण घेत आहे. आपल्या धाकट्या बहिणीच्या अपघाताची बातमी कळताच तो नागपूरवरून अमरावतीला निघाला. पण मृतदेह कारंजाला नेत असल्याची माहिती शिक्षकांनी देताच तो कारंजाला रवाना झाला. निमूळत्या मार्गावर पार्किंगच्या रांगागांधी चौकातून राजापेठकडे जाणाऱ्या या रस्त्यावर गॅस एजन्सीसह अन्य दुकाने आहेत. या दुकानांसमोर दुचाकींची भली मोठी अवैध पार्किंग लागते. आजही अपूर्वाला ट्रक समोरून येत असताना दिसला. तिने आपली दुचाकी बाजूला लावण्याचा प्रयत्न केला. मात्र अर्ध्या रस्त्यापर्यंत आलेल्या पार्किंगमुळे तिला जीवाला मुकावे लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. नो-एन्ट्री फलकावरचअनेकदा नो-एन्ट्रीच्या वेळेतच ट्रक, टिप्परची बेफाम वाहतूक केली जाते. कधी दंडही वसूल केल्या जातो. मात्र ट्रक चालकांच्या बेफाम आणि बेदरकारपणावर अंकुश लावला जात नाही. लक्झरी बसेससुध्दा शहरात प्रवेश बंदी असताना या बसेससुध्दा खुलेआमपणे शहरात शिरतात. यावरही वाहतूक विभागाला अंकुश लावता आलेला नाही. ट्रक चालकांवर कडक कारवाई कराट्रक चालकाचीच चुकी असल्याचे प्रथमदर्शीनी सांगितले. १० वाजता दरम्यान अपघात झाला. १५ मिनिटांतच अपघाताची माहिती कळली. पोलिसांनी मृतदेह इर्विनमध्ये नेला. बोंडे हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घेत असलेल्या विद्यार्थिनीची माहिती घेतली. त्या घाबरलेल्या होत्या. अपूर्वा व सोनल चांगल्या मैत्रिणी होत्या. त्या नेहमी दुचाकी व पेट्रोल शेअर्स करायच्या. कॉलेजच्या विद्यार्थ्यांना माहिती मिळताच मुले निघून गेले. सोमवारी अपूर्वाला कॉलेजच्यावतीने सामूहिक श्रद्धांजली देण्यात येईल, अशी माहिती सिपनाचे प्राचार्य एस. ए. लडके यांनी दिली. मृतदेहावर शनिवारी ६ वाजता कारंजा लाड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. सुरेश उभाडे यांच्याकडे भाड्याने राहत होती अपूर्वाव्यंकटेश लॉनजवळील सुरेश उभाडे यांच्याकडे भाड्याच्या खोलीत मागील तीन वर्षांपासून मृत अपूर्वा देऊळगावकर राहत होती. अतिशय मनमिळावू स्वभावाची अपूर्वाचा अचानक मृत्यू झाल्याने परिसरातील नागरिकांना व उभाडे परिवारांनाही धक्काच बसला. जगदीश गुप्तांकडून सांत्वनासिपना अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अध्यक्ष सिपना तथा माजी मंत्री जगदीश गुप्ता यांना घटनेची माहिती मिळताच ते इर्विनच्या शवागारात पोहचले. सिपनाचे बहुतांश प्राध्यापक व विद्यार्थीही अपूर्वाच्या नातेवाईकांचे सांत्वन करीत होते. गुप्ता यांच्याशिवाय शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख बाळासाहेब भागवत यांनी सुध्दा शवविच्छेदन कक्षात येवून सहकार्य केले. फेट्याने केला घातसिपना इंजिनिअरींग कॉलेजमध्ये शनिवारी क्रीडा महोत्सव व स्रेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. मृतक अपूर्वा राजकुमार देऊळगांवकर ही सिपना कॉलेजला कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरींग या शाखेची तृतीय वर्षाची विद्यार्थिनी होती. ती तिची मैत्रीण सोनल गुळकरी, प्रियंका हेलांडे, श्रृतिका तिडके यांच्यासोबत स्रेहसंमेलनासाठी फेटे आणण्यासाठी गेली होती. फेटे कॉलेजमध्ये नेताना घात झाला व क्षणात तिचे आयुष्य संपले. अपूर्वा ही सोनल गुलकरी हिच्या दुचाकीवर मागे बसली होती तर प्रियंका व श्रृतिका दुसऱ्या दुचाकींवर जात असल्याचे प्रथमदर्शीनींनी सांगितले. शाळांच्या वेळात ‘नो-एन्ट्री’शहरातील सर्व शाळा महाविद्यालय सुरू होण्याच्या सुटण्याच्या कालावधीची माहिती घेऊन त्या वेळेमध्ये शाळामहाविद्यालय व नजीकच्या परिसरात जड वाहनांना नो-एन्ट्री केली जाणार आहे. तूर्तास या भागात सकाळी ६.३० ते ८.३०, दुपारी १ ते २.३० व दुपारी ४.३० ते ६.३० या कालावधीत जड वाहनांना ‘नो-एन्ट्री’ आहे.