शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
कहानी में कुछ तो गडबड हैं! काँग्रेसचे राज ठाकरेंना ‘नो ऑब्जेक्शन’; उद्धवसेनेचा मार्ग मोकळा?
3
Himachal Pradesh Cloudburst : हिमाचलमध्ये पावसाचा कहर, किन्नौरमध्ये ढगफुटी; घरे आणि गाड्या गेल्या वाहून, ३२५ रस्ते बंद
4
मुंबई ते लंडन... लवकरच बोहल्यावर चढणाऱ्या अर्जुन तेंडुलकरची संपत्ती किती? तुमचाही विश्वास नाही बसणार
5
Bitcoin नं तोडले सर्व विक्रम; सोनं-चांदी सोडून क्रिप्टोकडे पळाले गुंतवणुकदार
6
अर्जुन तेंडुुलकरची होणारी बायको सानिया चांडोक काय करते? तिचा व्यवसाय कोणता? जाणून घ्या
7
"पुतिन यांनी युक्रेन युद्ध थांबवलं नाही तर...!"; महत्वाच्या बैठकीपूर्वीच ट्रम्प यांची रशियाला खुली धमकी!
8
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
9
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
10
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
11
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
12
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
13
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
14
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
15
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
16
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
17
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
18
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
19
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
20
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी

२४ तासांत कसे भरणार ६० हजार अर्ज ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 21:49 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी १५ सप्टेंबर ही ‘डेडलाईन’ आहे.

ठळक मुद्देमुदतवाढ हवीच : जगाचा पोशिंदा अर्जासाठी रात्रंदिवस रांगेत

गजानन मोहोड ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी १५ सप्टेंबर ही ‘डेडलाईन’ आहे. अद्याप जिल्ह्यातील ६० हजार शेतकºयांचे अर्ज भरावयाचे आहेत. येत्या २४ तासांत हे आॅनलाईन अर्ज कसे भरणार, हा प्रश्न उभा ठाकला आहे. त्यामुळे योजनेला किमान १५ दिवस मुदतवाढ देणे अपरिहार्य आहे. जगाचा पोशिंदा रात्रंदिवस रांगेत उभा असल्याने या योजनेत सन्मान कुठे, हा तर बळीराजाचा अवमान असल्याची खंत शेतकºयांनी बोलून दाखविली.जिल्ह्यात कर्जमाफी व प्रोत्साहन योजनेसाठी दोन लाख २५ हजार शेतकरी पात्र आहेत. यामध्ये एक लाख ६७ हजार शेतकरी थकबाकीदार, ४३ हजार शेतकरी चालू खातेदार आहेत तर २० ते २५ हजार शेतकºयांच्या कर्जाचे पुनर्गठन झाले आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत दोन लाख ९२ हजार २०९ शेतकºयांनी नोंदणी केली असली तरी प्रत्यक्षात एक लाख ४२ हजार ६८५ शेतकºयांनी बुधवारपर्यंत आॅनलाईन अर्ज भरले आहेत. गुरूवारी अधिकाधिक नोंदणी होऊन आॅनलाईन अर्ज भरले गेले तरी अंतिम मुदतीपर्यंत म्हणजे १५ तारखेपर्यंत म्हणजेच केवळ २४ तासांत किमान ६० हजार शेतकºयांचे आॅनलाईन अर्ज भरणे, ही अशक्यप्राय बाब आहे.सन्मान कुठे... हा तर अवमानचछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कल्याण योजनेंतर्गत कर्जमाफीची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी बळीराजा पत्नीसह रात्रंदिवस लाईनमध्ये उभा आहे. सेतू, संग्राम, महा- ई -सेवा केंद्र यांसह सीएससी केंद्रात गेल्यानंतर सर्व्हर डाऊन, अंगठा घेणारे डिव्हाईस कनेक्ट न होणे, यांसह अनेक अडचणींचा सामना शेतकºयांना करावा लागत आहे. कर्जमाफीची माहिती बँका नीटपणे देत नाही. केंद्रचालकांचे सहकार्य नाही, शेतकºयांकडून अधिकचे पैसे उकळणे, याप्रकारामध्ये शेतकºयांचा सन्मान नव्हे तर ्अवमान असल्याची खंत शेतकºयांनी बोलून दाखविली.तीन दिवसांपासूनचे भारनियमन उठले ‘आॅनलाईन’च्या मुळावरजिल्ह्यासह राज्यात चार दिवसांपासून सक्तीचे भारनियमन सुरू झाले आहे. यामुळे ग्रामीण भागातील महा -ई-सेवा केंद्र कित्येक तास बंद राहते. याचा थेट फटका शेतकºयांना बसतो. या केंद्रावर त्यांना पत्नीसह ताटकळत बसावे लागत आहे. कर्जमाफीच्या आॅनलार्ईन प्रक्रियेत हे नवे संकट शेतकºयांसमोर उभे ठाकले आहे.अंगठा संलग्नित होत नसल्याच्या सर्वाधिक तक्रारीकर्जमाफी प्रक्रियेत शेतकºयांचे आधार कार्ड मोबाईल क्रमांकाशी लिंक असणे महत्त्वाचे आहे.ज्यांचे आधार लिंकिंग नाही, अशा शेतकºयांना पत्नीसह स्वत:चा अंगठा देवून बायोमेट्रिकओळख पटवावी लागते. मात्र, या प्रक्रियेत त्यांचा अंगठा संलग्नित (मॅच) होत नसल्याच्या सर्वाधिक तक्रारी आहेत. किमान अशा अपवादात्मक स्थितीत तरी शेतकºयांचे अर्ज शेवटच्या दिवशी तरी आॅफलाईन पद्धतीने स्वीकारल्यास शेतकºयांना आधार ओळख नसल्यास शासनाचा आधार मिळेल.