शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

झाकलेल्या विहिरीत सुप्रिया पडली कशी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 01:22 IST

ख्रिस्त कॉलनीत भाड्याने राहायला गेलेल्या काबरा कुटुंबीयांची सहा वर्षीय सुप्रिया हिचा घराच्या आवारातीलच विहिरीत मृतदेह आढळला. ती विहीर हिरव्या जाळीने संपूर्ण झाकलेली होती. दीड फूट जागाच केवळ मोकळी होती तसेच विहिरीच्या गोलाकारावर कुंड्या ठेवल्या होत्या.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ख्रिस्त कॉलनीत भाड्याने राहायला गेलेल्या काबरा कुटुंबीयांची सहा वर्षीय सुप्रिया हिचा घराच्या आवारातीलच विहिरीत मृतदेह आढळला. ती विहीर हिरव्या जाळीने संपूर्ण झाकलेली होती. दीड फूट जागाच केवळ मोकळी होती तसेच विहिरीच्या गोलाकारावर कुंड्या ठेवल्या होत्या. इतके अडचणीचे ठिकाण असताना सुप्रिया विहिरीत पडलीच कशी, या दिशेने पोलिसांनी आता तपास सुरू केला आहे.चांदूरबाजार येथील व्ही.आर. काबरा शाळेच्या अध्यक्षाची सुप्रिया ही मुलगी होती. सुप्रियाच्या वडिलांचे आठ महिन्यांपूर्वी निधन झाले. मतिमंद सुप्रियाला ख्रिस्त कॉलनी स्थित आशादीप मतिमंद विद्यालयात शिक्षणासाठी दाखल करण्यात आले. चांदूर बाजारहून तिला दररोज शाळेत ने-आण केले जात होते. ७ जुलै रोजी सुप्रियाची आई दोन्ही मुलींना घेऊन ख्रिस्त कॉलनीतील चंद्रमोहन क्षीरसागर यांच्याकडे भाड्याने राहायला आल्या. यादरम्यान दुपारच्या सुमारास ती बेपत्ता झाली. कुटुंबीयांसह गाडगेनगर पोलिसांनी तिचा शोध घेतला. गाडगेनगर पोलिसांनी सोमवारी पुन्हा क्षीरसागर यांच्या घरी जाऊन विचारपूस केली. त्यांच्या घराच्या आवारात असणाऱ्या विहिरीतसुद्धा पाहण्यात आले. मंगळवारी विहिरीतून दुर्गंधी येत असल्याचे पाहून काही जणांनी डोकावून पाहिले असता, सुप्रियाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. या माहितीवरून गाडगेनगर ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विनोद चव्हाण यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. त्यावेळी संपूर्ण विहिरीवर हिरव्या जाळीचे आवरण व त्याभोवती कुंड्या लावलेल्या होत्या. केवळ समोरील बाजूने दीड फूट इतकी जाळी उघडी असल्याचे आढळले. त्यातूनच सुप्रिया आत पडली असावी, असा कयास लावण्यात आला. मात्र, आधीच विहिरीवर हिरव्या नेटचे आवरण, कुंड्या असताना सुप्रिया आत पडली कशी? कोणत्याही कुंड्यांना धक्का लागलेला नव्हता. हिरवी नेटसुद्धा ‘जैसे थे’ होती. त्यातच २० ते २५ फूट खोल या विहिरीच्या आतील ओबडधोबड दगड आहेत. विशेष म्हणजे, शवविच्छेदन अहवालात सुप्रियाच्या शरीरावर एकही जखम नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे सुप्रिया विहिरीत पडली कशी, या दिशेने पोलीस तपास करीत आहे. सुप्रियाच्या मृत्यूबाबत ख्रिस्त कॉलनीसह शहरात विविध चर्चा सुरु झाली आहे.पोलीस तपासाची दिशा : शवविच्छेदन अहवालानुसार पाण्यात बुडून मृत्यूख्रिस्त कॉलनीतील घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. त्यावेळी विहिरीवर ग्रीन नेट व कुंड्या होत्या. केवळ एक ते दीड फूट इतकीच जागा मोकळी होती. तिच्या शरीरावर एकही जखम आढळली नाही. शवविच्छेदन अहवालात पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे स्पष्ट होत आहे.- विनोद चव्हाण, पोलीस उपनिरीक्षकपाण्यात बूडून मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालावरून स्पष्ट होत आहे. ती विहिरीत पडली कशी, या दिशेनेही तपास सुरू आहे. मृत सुप्रियाच्या कुटुंबीयांचे बयाण नोंदविण्यात येईल. याबाबत चौकशी सुरू आहे.- राजश्री चंदापुरेपोलीस उपनिरीक्षक, गाडगेनगर.सुप्रिया पडल्याचा आवाज नाहीरविवारी दुपारच्या सुमारास सुप्रियाची आई घरात साहित्याची आवरासावर करीत होती. यादरम्यान सुप्रिया बेपत्ता झाली. त्याच वेळी ती विहिरीत पडली असावी. मात्र, दुपार आणि त्यात रविवार असल्याने वर्दळ वाहनांची फारशी नसताना सुप्रिया विहिरीत पडल्यावर कुणालाच आवाज कसा आला नाही, विहिरीवर आवरण असताना सुप्रिया त्यात पडली कशी, ही बाब तेथील रहिवाशांना भेडसावत आहे.

टॅग्स :Deathमृत्यू