शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे सरकार फक्त श्रीमंतांचे', महाराष्ट्रातील ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
2
पुन्हा एक सोनम! आत्याच्या नवऱ्यासोबतच १५ वर्षांपासून प्रेमसंबंध; तरुणीने लग्न होताच पतीचा काढला काटा
3
Video: साप... साप... Live सामन्यात घडला विचित्र प्रकार, भरमैदानात उडाला गोंधळ अन् मग...
4
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम कुणी केला? अखेर एस. जयशंकर यांचं वॉशिंग्टनमधून मोठं विधान, म्हणाले...
5
इन्स्टाग्रामवर चूक केली, माफीही मागितली; तरी राजा रघुवंशीची बहीण मोठ्या अडचणीत सापडली! पोलिसांनी केली कारवाई
6
भीषण वास्तव! डोक्यावर दप्तर...; शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड, करतात जीवघेणा प्रवास
7
"कामासाठी कॉम्प्रोमाइज केलंस का?", 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याला चाहत्याचा प्रश्न, म्हणाला- "हो, पण..."
8
बुडालेल्या बँकांवर डाव लावला, एकीने नशीब फळफळवले; आता हजारो कोटींमध्ये खेळतोय शेतकऱ्याचा मुलगा
9
वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले...
10
आधी मुलाला नववधूसारखं सजवलं, भरपूर फोटो काढले, शेवटी संपूर्ण कुटुंबाने टाकीत उडी मारून जीवन संपवले
11
"सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सरचं निदान करण्यासाठी घेतलेल्या व्हॅन खरेदीत घोटाळा’’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप  
12
दुहेरी हत्याकांड: आईचा मृतदेह बेडरुममध्ये, तर मुलाचा वॉशरुमध्ये; नोकरानेच केली हत्या, कारण...
13
४ महिन्यांत ६० रुपयांवरून २५२ वर आला 'हा' शेअर; गुंतवणूकदार मालामाल, तुमच्याकडे आहे का?
14
गोव्याहून पुण्याला निघालेले स्पाईसजेटचे विमान, हवेत असताना खिडकीच बाहेर आली...
15
अल कायदाच्या दहशतवाद्यांनी केलं तीन भारतीयांचं अपहरण, या देशात घडली धक्कादायक घटना
16
धक्कादायक! टीव्ही अभिनेत्रीच्या एकुलत्या एक मुलाची आत्महत्या, ५७व्या मजल्यावरुन उडी मारून संपवलं जीवन
17
Chaturmas 2025: सुरु होतोय चातुर्मास; या चार महिन्यात कांदा-लसूण खाऊ नये, कारण...
18
तेजस्वीसोबत ब्रेकअप.. तिच्यासाठीच अनुषा दांडेकरला सोडलं? करण कुंद्रा म्हणतो, "पैसे लावा.."
19
रुकेगा भी नहीं और झुकेगा भी नहीं; नोवाक जोकोविचचा पुष्पा अवतार, फोटोची सोशल मीडियावर चर्चा!
20
शेजारी राष्ट्राकडे आलं इलॉन मस्कचं हाय-स्पीड इंटरनेट! एका महिन्याचा खर्च पाहून धक्का बसेल!

रेमेडीसिव्हिरचा तुटवडा कोरोनाशी कसे लढणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 05:00 IST

अन्न व औषधी विभागाच्या माहितीनुसार, शासकीय रुग्णालात ७५०० व खासगीत २०० रेमडिसिव्हिर उपलब्ध असल्याचे असल्याचे औषधी निरीक्षक मनीष गोतमारे यांनी सांगितले. मात्र, या इंजेक्शनचा उपयोग होत असल्याने सध्या चार हजार व्हायल उपलब्ध असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांनी सांगितले. जिल्ह्यातील कोरोना संसर्ग सध्याही कमी झालेला नाही.   रोज ४०० च्या आसपास रुग्णांची नोंद होत आहे.

ठळक मुद्दे२३ कोरोना हॉस्पिटलसाठी २०० व्हायल उपलब्ध, संसर्ग कायम त्यात जिल्ह्याबाहेरील रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोना संसर्गात गंभीर रुग्णांसाठी वरदान ठरलेल्या ‘रेमडिसिव्हिर’ इंजेक्शनचा या चार दिवसांत तुटवडा निर्माण झालेला आहे. शासकीय रुग्णालयांत उपलब्ध असले तरी खासगीत मात्र, मोठी किंमत मोजावी लागत आहे. मागणीनंतर पुरवठा होत नसल्याने ही परिस्थिती ओढावल्याने कोरोनाशी कसे लढणार, हा प्रश्न उपस्थित झाला आहे व अशा प्रतिकुल परिस्थितीत काळाबाजारात वाटेल ती किंमत मोजून रुग्णाचा जीव वाचविण्याचा प्रयत्न नातेवाईक करीत आहेत.अन्न व औषधी विभागाच्या माहितीनुसार, शासकीय रुग्णालात ७५०० व खासगीत २०० रेमडिसिव्हिर उपलब्ध असल्याचे असल्याचे औषधी निरीक्षक मनीष गोतमारे यांनी सांगितले. मात्र, या इंजेक्शनचा उपयोग होत असल्याने सध्या चार हजार व्हायल उपलब्ध असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांनी सांगितले. जिल्ह्यातील कोरोना संसर्ग सध्याही कमी झालेला नाही.   रोज ४०० च्या आसपास रुग्णांची नोंद होत आहे. यात किमान ८ ते १० टक्के रुग्ण गंभीर अवस्थेत असतात. यापैकी काही शासकीय, तर काही रुग्ण खासगी रुग्णालयांत दाखल होतात. जिल्ह्यात २३ डेडिकेटेड कोरोना हॉस्पिटल आहेत. या रुग्णालयाच्या मेडिकल स्टोअरमध्ये रेमडिसिव्हिर विक्रीला असल्याचे सांगण्यात येते. याशिवाय अन्य जिल्ह्यांतील रुग्णदेखील येथील डीसीएच सुविधेत उपचारार्थ दाखल होत असल्याने या इंजेक्शनची वाढती मागणी वाढली व त्यातुलनेत पुरवठा होत नसल्यानेच आता चढ्या भावाने विक्री होत असल्याचे आरोग्य यंत्रणेद्वारा सांगण्यात आले. या इंजेक्शनचा काळाबाजार होऊ नये, याकरिता जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या आदेशाने जिल्हास्तरावर नियंत्रण समिती स्थापन करण्यात आलेली आहे. समिती सदस्यांनी शनिवारी काही रुग्णालय व मेडिकल स्टोअरची तपासणी केली. याशिवाय केंद्रीय आरोग्य पथकाने रेमडिसिव्हिरचा काळाबाजार होऊ नये, अशी तंबी दिल्याने गांभीर्य वाढले आहे.जिल्ह्यात पाच कंपन्यांचा पुरवठाजिल्ह्यात सध्या झायडस, हेटेरो, मायलॉन, सिपला व ज्युबिलॉन या पाच कंपन्यांद्वारा पुरवठा होतो. शासकीय रुग्णालयांत हॉफकिनद्वारे पुरवठा होत आहे. या पाचही  कंपनींच्या रेमेडिसिविरचे दरमात्र, वेगवेगळे आहे. मागील आठवड्यात हेटेरोद्वारा ४०० व्हायलाचा पुरवठा करण्यात आला होता. रविवारी पुन्हा पुरवठा होणार होता. मात्र, स्टाॅकिस्टकडे माल नसल्याने  नकार दर्शविण्यात आला. आता प्रतीक्षा असल्याचे एफडीएचे औषधी निरीक्षक मनीष गोतमारे यांनी सांगितले.

२३ खासगी रुग्णालयांना २०० व्हायल कसे पुरणार?एफडीएच्या माहितीनुसार, जिल्ह्यातील २३ खासगी रुग्णालयांसाठी २०० व्हायल उपलव्ध असल्याचे सांगण्यात आले. या रुग्णालयांत आयसीयूमध्ये २३६, ऑक्सिजन बेडवर २३८ व व्हेंटिलेटरवर ३८ रुग्ण आहेत. आयसीएमआरच्या गाईडलाईनचा वापर केला तरी एवढा साठा पुरेसा नाही. त्यामुळे या इंजेक्शनची चढ्या दराने विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अन्य जिल्ह्यांचे रुग्ण अमरावतीतसध्या नागपूर, यवतमाळ, बुलडाणा आदी जिल्ह्यातील रुग्ण उपचारार्थ दाखल होत आहेत. गंभीर अवस्थेतील या रुग्णांसाठी नातेवाईक वाटेल ती किंमत मोजावयास तयार असल्याने या इंजेक्शनची चढ्या दराने विक्री होत असल्याचे वास्तव आहे.

शासकीय रुग्णालयात रेमडिसिव्हिरचा वापर प्रोटोकॉलनुसार होतो.  सध्या चार हजार व्हायलचा साठा रुग्णासाठी पुरेसा आहे. जीव वाचणे महत्त्वाचे आहे. पीडीएमसीला उसनवार पद्धतीने ४०० व्हायल दिले आहेत.- श्यामसुंदर निकम जिल्हा शल्यचिकित्सक

सध्या रेमडिसिव्हिरचे २०० व्हायल उपलब्ध आहेत व तेदेखील खासगी कोविड रुग्णालयाच्या मेडिकल स्टोअर्समध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे चढ्या भावाने विक्रीची शक्यता नाकारता येत नाही. आमचा वॉच आहे.- मनीष गोतमारे औषधी निरीक्षक, एफडीए

जिल्हधिकारी कार्यालयात रविवारी झालेल्या बैठकीत प्रोटोकॉलनुसार व फाॅर्म भरल्यानंतरच इंजेक्शन उपलब्ध होत आहेत. शासकीय रुग्णालयातूनही आवश्यकतेनुसार उसनवार घेण्याच्या प्रशासनाच्या सूचना आहेत- डॉ अनिल रोहणकर श्वसन विकारतज्ज्ञ

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस