शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

नझूलच्या जागेवर दारु दुकानाला परवानगी कशी?

By admin | Updated: December 18, 2014 00:11 IST

वडाळी येथील देशी दारू विक्रीचे दुकान हद्दपार करण्यासाठी महिलाशक्ती एकवटली आहे. शासनाच्या दारु विक्रीबाबतच्या धोरणाची चिरफाड करण्यासाठी ...

अमरावती : वडाळी येथील देशी दारू विक्रीचे दुकान हद्दपार करण्यासाठी महिलाशक्ती एकवटली आहे. शासनाच्या दारु विक्रीबाबतच्या धोरणाची चिरफाड करण्यासाठी कोणतेही पाऊल उचलण्याची या रणरागिणींची तयारी आहे. मात्र, ज्या दारु विक्रीच्या दुकानाबाबत वाद उफाळला आहे, ते दुकान नझुलच्या जागेवर असून चालविण्याचा परवाना मिळाला कसा? हा खरा सवाल आहे.मागील १० महिन्यांपासून वडाळीतील देशी दारु विक्रीचे दुकान प्रशासनाच्या आदेशाने बंद आहे. हे दुकान वडाळीत नकोच, ही भूमिका या परिसरातील महिलांची आहे. मात्र नियमानुसार हे दुकान दुसरीकडे स्थलांतरित करायचे असल्यास मतदान प्रक्रिया राबवूनच प्रशासनाला निर्णय घ्यावा लागतो. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. मतदार यादीत घोळ असल्यामुळे ही प्रक्रिया थांबवून महिलांनी महापालिका, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारभारावर ताशेरे ओढत मतदान नकोच ही भूमिका घेतली. अखेर जिल्हा प्रशासनाला यात मध्यस्ती करावी लागली. पुढील आदेशापर्यंत दारु विक्रीचे दुकान बंद करण्याचा निर्णय तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांना निर्गमित करावा लागला. परंतु कालांतराने दारु विक्रेत्यांनी दुकानाविषयी उच्च न्यायालयात धाव घेतली. याचिकेनुसार न्याय मागितला. त्यामुळे उच्च न्यायालयाने प्रशासनाला योग्य कार्यवाहीचे आदेश दिले. त्यानुसार महापालिका आयुक्त अरुण डोंगरे यांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करुन २८ डिसेंबर रोजी देशी दारु विक्रीच्या दुकानासंदर्भात मतदान घेण्याचे सांगितले. मात्र पुन्हा मतदान होणार असल्याने वडाळीतील महिलांचा राग अनावर झाला. त्यानंतर एक्साईज, जिल्हाकचेरीवर धाव घेत या दुकानासंदर्भात मतदान घेतल्यास कायदा हातात घेऊ, असा इशारा दिला. देशी दारुच्या दुकानावरुन प्रक्षोभ उफाळून येत असताना हे दुकान खरेच वडाळीतील चालविणे योग्य आहे का? याविषयी जिल्हाप्रशासनाने गुप्त अहवाल मागविणे आवश्यक आहे. ज्या तीव्रतेने महिलांनी या दारु दुकानाविषयी जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढ्यात गाऱ्हाणी मांडल्यात ते दुकान कोणाच्या मालकीचे? ती जागा कोणाच्या मालकीची? या खोलात शिरल्यास हे दुकान हटविण्यासाठी मतदान घेण्याची गरज पडणार नाही, हे वास्तव आहे. वडाळी व देवीनगर हा संपूर्ण भाग हा नझुलमध्ये आहे. या जागेवर दारु विक्रीचा परवाना देता येतो काय? याचा शोध जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला तर न्यायालयाच्या आदेशापूर्वीच जिल्हाधिकारी किरण गित्ते हे नझुलच्या जागेवरील हे दारुविक्रीचे दुकान सहजतेने अतिक्रमणाच्या नावाखाली भुईसपाट करु शकतात, हे कोणालाही विचारण्याची गरज नाही, हे खरे आहे. वडाळी, देवीनगरचा भाग हा स्लम म्हणून महापालिकेने घोषित केला आहे. २७ वर्षांपूर्वी ज्या मालमत्ताधारकाच्या नावाने हे दारु विक्रीचे दुकान सुरु करण्यात आले. त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती. मात्र दरवर्षी राज्य उत्पादन शुल्क विभाग ज्या नियमांना अनुसरुन दारु विक्री परवान्याचे नूतनीकरण करतात, त्यानुसार वडाळीतील हे देशी दारु विक्रीचे दुकान अस्तित्वात आहे काय? याचे चिंतनही जिल्हाधिकाऱ्यांनी करावे; तथापि उच्च न्यायालयाच्या आदेशाने पुन्हा मतदान झाले तर महिलांचे दारुबंदीसाठीचे आंदोलन कोणते वळण घेईल, ही वेळच सांगेल, या निर्णयाप्रत आंदोलक पोहचले आहेत.