मुद्रांकाचा तुटवडा : आॅनलाईन अर्ज सादरीकरण हाऊसफुल्लअमरावती : प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत ‘सर्वांसाठी घरे’ या योजनेचा लाभ मिळावा, याकरिता नागरिकांनी कागदपत्रे तयार करण्यासाठी एकच गर्दी केली आहे. तहसील, सेतू केंद्र, महापालिका खिडकी, तलाठी कार्यालय आदी ठिकाणी जणू यात्रा भरल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. १०० रुपयांचे मुद्रांक मिळविण्यासाठी महिला, पुरुषांचा लांबच लांब रांगा ही नित्याचीच बाब झाली आहे.महापालिका प्रशासनाने प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत ‘सर्वांसाठी घरे’ या योजनेसाठी अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ केला आहे. प्रारंभी नागरिकांना घरांच्या लाभासाठी आॅनलाईन अर्ज सादर करणे अनिवार्य आहे. त्यामुळे कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी तहसीलमध्ये नागरिकांची प्रचंड गर्दी होत आहे. १५ मार्चपर्यंत या योजनेसाठी आॅनलाईन कागदपत्रे स्वीकारण्याला अवधी असल्यामुळे गर्दी ओसरण्याचे नाव घेत नाही. अशातच १०० रुपयांच्या मुद्रांकावर प्रतीज्ञापत्र सादर करावे लागत असल्यामुळे मुद्रांक मिळविण्यासाठी तहसील, उपनिबंधक कार्यालयात तोबा गर्दी उसळली आहे. ही योजना सर्व समाजातील घटकांसाठी असल्यामुळे ज्यांना पक्के घरे नाहीत, अशा नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी धाव घेतली आहे. मात्र एकाच वेळी हजारो नागरिकांनी कागदपत्रे तयार करण्यासाठी कार्यालय गाठल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. सेतू केंद्रात देखील पाय ठेवायला जागा नाही, असे चित्र सध्या शहरात दिसून येत आहे. या योजनेसाठी झोपडपट्ट्यांमधील नागरिक मोठ्या प्रमाणात आवश्यक कागदपत्रे तयार करण्यासाठी या कार्यालयात चकरा मारत असल्याचे चित्र आहे. नागरिकांना कागदपदत्रे आॅनलाईन सादरीकरण करताना त्रास होऊ नये, यासाठी महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी पाचही झोन कार्यालयात आॅनलाईन कागदपत्रे स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. त्यामुळे नागरिकांना कागदपत्रे सादर करताना सायबर केंद्रात होणाऱ्या त्रासापासून काहीअंशी महापालिकेने दिलासा मिळाला आहे. मात्र तहसील कार्यालयात अचानक कागदपत्रे तयार करण्यासाठी उसळलेल्या गर्दीचा लाभ दलालांना फावत असल्याचे चित्र आहे.महापालिकेत अर्ज स्वीकारण्यासाठी पाच खिडक्याअर्ज स्वीकारण्याकरीता महापालिकेत पाच खिडक्या आहेत. या खिडक्यांवर नागरिकांचे अर्ज स्वीकारले जात आहे. विशेषत: उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, मुद्रांकावर प्रतीज्ञालेख, बँक पासबूक ही कागदपत्रे अनिवार्य असून त्याशिवाय अर्ज स्वीकारला जात नाही. मुद्रांक प्रतिज्ञापत्रावरुन गोंधळ१०० रुपयांच्या मुद्रांकावर प्रतीज्ञापत्र सादर करणे अनिवार्य असल्याचे महापालिका प्रशासनाने म्हटले आहे. मात्र मुद्रांकावर प्रतीज्ञापत्र नसले तरी कागदपत्र स्वीकारली जातात, असे महसूल विभागाने नोटीसद्वारे नागरिकांना कळविले आहे. परंतु घर मिळावे, यासाठी गरीब, सामान्य नागरिक मात्र मुद्रांक मिळण्यासाठी दिवसभर रांगेत उभे राहत आहे. घर मंजूर झाल्यानंतर १०० रुपयांच्या मुद्राकांवर प्रतीज्ञापत्र आवश्यक असल्याचे महसूल विभागाचे म्हणने आहे. तर महापालिका प्रशासनाने खिडकीवर अर्ज स्वीकारताना आवश्यक कागदपत्रात १०० रुपयांच्या मुद्राकांवर प्रतीज्ञापत्र अनिवार्य केले असल्याने एकच गोंधळ उडत आहे.तहसीलच्या नियमित कामकाजावर परिणामही कागदपत्रे तयार करण्यासाठी तहसील कार्यालयात तोबा गर्दी झाल्यामुळे नियमीत कामाकाजावर परिणाम झाला आहे. तहसीलदार, नायब तहसीलदारांना याच कामात व्यस्त राहावे लागत आहे. तलाठी कार्यालयातही उत्पन्नाचा दाखला मिळविण्यासाठी नागरिकांची झुंबड आहे.१०० रुपयांच्या मुद्रांकाची गरज नाही- तहसीलदारया योजनेचा लाभासाठी आॅनलाईन कागदपत्रे सादर करताना १०० रुपयांच्या मुद्राकांची गरज नाही, प्रतिज्ञापत्र हे कागदावरही चालते, असे आयुक्य गुडेवार यांनी सांगितल्याचे तहसीलदार बगळे म्हणाले. प्रतिज्ञापत्र मिळावे, यासाठी चार नायब तहसीलदार, तीन लिपिकांची नियुक्ती करण्यात आली.
‘सर्वांसाठी घरे’ योजनेला तोबा गर्दी
By admin | Updated: March 12, 2016 00:10 IST