आॅनलाईन लोकमतपरतवाडा : अचलपूर पंचायत समिती अंतर्गत येणाºया सावळी दातुरा येथे सांडपाणी वाहून नेणाऱ्या नालीचा वाद विकोपाला गेला आहे. अडविलेले पाणी नागरिकांच्या घरासह पिण्याच्या पाण्यासाठी वापरत असलेल्या बोअरवेलमध्ये शिरत आहे. मात्र, ग्रामपंचायतीकडून काहीच कार्यवाही झाली नाही.सावळी दातुरा ग्रामपंचायत अंतर्गत मलवार कॉलनीतील नारायणपूर रस्त्यावरील पहिल्या ओळीतील प्लॉटधारकांनी सांडपाणी वाहून नेणाऱ्या नालीवर शौचालय आणि वापरासाठी जागेचे अतिक्रमण केले आहे. त्याचा फटका आता इतर रहिवाशांना बसत आहे. अतिक्रमण काढल्याशिवाय नालीचे बांधकाम करू देणार नाही आणि अतिक्रमण काढीत नाही, अशी परस्परविरोधी विधाने यानिमित्त झालीत.न्यायप्रविष्ट प्रकरणात सांडपाणी वाहून नेणारी नाली मोकळी करीत पाणी काढण्याचा आदेश झाला. ग्रामपंचायतीने नालीचे अडलेले काम पूर्ण करण्यासाठी मजूर, गवंडीसुद्धा आणले. पुन्हा पोलिसांत परस्परविरोधी तक्रारी झाल्या. या वादामुळे इतर नागरिकांना शौचालयाच्या पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. सर्वत्र घाणीचे साम्राज्य, दुर्गंधी पसरली असून, मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव झाला आहे. घाण पाणी घरासह बोअरमध्ये शिरत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. सर्व वाद करणारे सुशिक्षित आणि नोकरदार आहेत, हे विशेष.पोलीस संरक्षण मागितलेसांडपाण्याच्या नालीचा वाद न्यायालयातून आता पोलिसांत पोहोेचला आहे. ग्रामपंचायतीने बांधकाम करण्यासाठी पोलिसांची मदत मागितली आहे. पोलीस अधीक्षकांनी परतवाडा पोलिसांना मोका पाहणीचा अहवाल पाठविण्याच्या सूचना दिल्या आहेत. या धबडग्यात नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे.नाली बांधकामासाठी पोलिसांची मदत मागितली आहे. तसे पत्र पाठविले असून, मोक्का पाहणी झाल्यावर बंदोबस्त मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतरच कामाला सुरुवात होईल.- बी.पी. अवघड,ग्रामसचिव, सावळी दातुरा
सावळीच्या मलवार कॉलनीत घरोघरी शौचालयाचे पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 23:48 IST
अचलपूर पंचायत समिती अंतर्गत येणाºया सावळी दातुरा येथे सांडपाणी वाहून नेणाऱ्या नालीचा वाद विकोपाला गेला आहे. अडविलेले पाणी नागरिकांच्या घरासह पिण्याच्या पाण्यासाठी वापरत असलेल्या बोअरवेलमध्ये शिरत आहे. मात्र, ग्रामपंचायतीकडून काहीच कार्यवाही झाली नाही.
सावळीच्या मलवार कॉलनीत घरोघरी शौचालयाचे पाणी
ठळक मुद्देवाद कुणाचा, त्रास कुणाला? : बोअरवेलमध्ये दूषित पाणी, परिसरात घाण, डासांचा प्रादुर्भाव