लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : रस्ताच्या कडेला व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून न दिल्याने सोमवारी दिव्यांग बांधवांनी आ. सुनील देशमुख यांच्या घरासमोरच ठिय्या देऊन अर्धदफन आंदोलन पुकारले. प्रहार जनशक्ती पार्टी अंतर्गत प्रहार अपंग क्रांती दलाच्या या आंदोलनामुळे खळबळ उडाली होती.दिव्यांगांना उदरनिर्वाहासाठी रस्त्याच्या कडेला व्यवसायासाठी जागा देण्यासाठी महापालिकेने पाऊल उचलले होते. ३० दिव्यांगांना जागा देण्याची तयारी महापालिकेने दर्शवून जागा निश्चित केल्याचा प्रस्ताव सभागृहात मांडला होता. महापौरांनी याविषयी आ. सुनील देशमुखांशी चर्चा केली तसेच महापालिकेकडून पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र, अद्याप प्रस्तावावर अंमलबजावणी झाली नाही. त्याचे स्मरण देण्यासाठी सोमवारी दिव्यांगांनी आ. सुनील देशमुख यांच्या घरासमोरच अर्धनग्न अवस्थेत ठिय्या दिला. यावेळी श्याम राजपूत, चंदू खेडकर, सुधीर कोहरे, मो. फहीमउल्ला हसन, मुशाफीक अहमद शेख मुनाद, अंकुश भुरे, हेमंत निखार, विनिता इंगळे, पंकज सोनटक्के, नरेंद्र चेंडकापुरे, प्रकाश पाटेकर, जयकुमार कदम, आशिष श्रीखंडे, नंदू थोरात, उमाकांत खंडारे, उत्तम सहारे, गजानन पवार, दीपक गुप्ता उपस्थित होते.
आमदाराच्या घरासमोर दिव्यांगांचे अर्धनग्न आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 22:38 IST
रस्ताच्या कडेला व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून न दिल्याने सोमवारी दिव्यांग बांधवांनी आ. सुनील देशमुख यांच्या घरासमोरच ठिय्या देऊन अर्धदफन आंदोलन पुकारले. प्रहार जनशक्ती पार्टी अंतर्गत प्रहार अपंग क्रांती दलाच्या या आंदोलनामुळे खळबळ उडाली होती.
आमदाराच्या घरासमोर दिव्यांगांचे अर्धनग्न आंदोलन
ठळक मुद्देअमरावतीत खळबळ : प्रहार अपंग क्रांती दलाचा ठिय्या