पान २ चे लिड
चांदूर रेल्वे : कोरोना लॉकडाऊन, त्यापाठोपाठ आलेल्या निर्बंधामुळे बांधकाम साहित्याचे भाव वधारले आहेत. एकीकडे इंधनाचे दर वाढल्याने बांधकाम व्यवसायात मंदी आहे. इंधनामुळे वाहतूक खर्च वाढला अन् आता साहित्याचे दरही गगनाला भिडल्याने बांधकाम महागले आहे.
इंधनाच्या भाववाढीमुळेच सर्व क्षेत्रात महागाईने डोके वर काढले आहे. कोरोनाकाळात अनेक व्यावसायिकांनी चढ्या दरात बांधकाम साहित्य विकून नागरिकांची लूट केली. मुद्रांक शुल्क कमी केलेला असला तरी बांधकाम साहित्याच्या दरावर मर्यादा आणण्यासाठी इंधनाचे दरदेखील आटोक्यात आणण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, अशी मागणी बांधकाम व्यावसायिक व घराचे बांधकाम करणारे लोक करीत आहेत.
बांधकाम साहित्याचे दर का वाढले?
दिवाळीनंतर बांधकाम साहित्याचे दर नेहमी वाढतात. यानंतर बांधकामांना सुरुवात होत असते. यंदा मात्र बांधकाम साहित्याचे दर वाढण्याची अनेक कारणे आहेत. अतिवृष्टीमुळे वीटभट्टीमधील विटा फुटल्या. विटांची कमतरता भासू लागली. दर वाढवून विटा विकल्या जात आहेत. विटांच्या गुणवत्तेवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. सिमेंट, स्टीलदेखील वाढीव दरात घ्यावा लागत आहे. त्याचप्रमाणे वाळू मिळत असली तरी तीही वाढीव दरात विकत घ्यावी लागत आहे.
बांधकाम साहित्य परिमाण लॉकडाऊन आधीचे दर आताचे दर
वाळू - ब्रास - ६ हजार रुपये-८ हजार रुपये
गिट्टी - प्रति ट्रक - २५०० रुपये - ३५०० रुपये
विटा - एक नग - ५ रुपये - ७ रुपये
सिमेंट - एक बॅग - २८० रुपये - ३४० रुपये
लोहा - किलो - ३४ रुपये - ४५ ते ५५ रुपये
कोट
विदेशातून भारतात येणारा कच्चा माल बंद आहे. त्यामुळे बांधकाम करण्यासाठी लागणारे साहित्याचे भाव वाढले आहेत. रेतीघाटच बंद असल्याने दर वाढले आहेत. त्यातच इंधनाचे दर वाढल्याने वाहतूक खर्चदेखील वाढला आहे. या सर्व बाबींचा परिणाम हा बांधकाम साहित्याच्या वाढीवर झाला आहे.
- विजय जयस्वाल, बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स, मालखेड रेल्वे
------------------