शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्येमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट, घर कोसळून ५ जणा्ंचा  मृत्यू, अनेक जण अडकल्याची भीती  
2
ओवेसींच्या सभेतून वारिस पठाण यांचं नितेश राणेंना आव्हान, म्हणाले, ‘दोन पायांवर येशील, पण…’ 
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या गळ्यात शांततेचं नोबेल, नेतन्याहू यांनी शेअर केला असा फोटो, म्हणाले…
4
"सामाजिक विषमता निर्माण करण्याला शरद पवार जबाबदार', मनोज जरांगेंच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखेंचा आरोप 
5
आठव्या क्रमांकाच्या बॅटरनं वाचवलं; पण तोच डाव उलटा फिरला!.. अन् टीम इंडियासमोर आफ्रिकेनं मारली बाजी
6
'हो, ते प्रवासी विमान आम्ही पाडलं होतं', अनेक महिन्यांनंतर व्लादिमीर पुतीन यांची कबुली
7
मनात नसताना रोहित-विराट 'तो' निर्णय घेणार? मोठी माहिती आली समोर
8
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
9
महिलेने रडत रडत केला फोन, पोलिसांना सांगितलं पतीचं गुपित, घराची झडती घेताच बसला धक्का 
10
क्रिकेटच्या मैदानात AI ची ‘बोलंदाजी’! मिताली राजनं पिच रिपोर्टसाठी घेतली गुगल ‘जेमिनी’ची मदत, अन्...
11
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
12
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
13
रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
14
शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला
15
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
16
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
17
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
18
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
19
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
20
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक

हॉटेलमधील वेटरची हत्या

By admin | Updated: September 26, 2016 00:33 IST

पार्टटाईम वेटरचे काम करणाऱ्या युवकाची चाकूने भोसकून हत्त्या करण्यात आली. या प्राणघातक हल्ल्यात अन्य दोन वेटर गंभीर जखमी झालेत.

प्राणघातक हल्ला : एकाला अटक, चार आरोपी पसारबडनेरा/ अमरावती : पार्टटाईम वेटरचे काम करणाऱ्या युवकाची चाकूने भोसकून हत्त्या करण्यात आली. या प्राणघातक हल्ल्यात अन्य दोन वेटर गंभीर जखमी झालेत. ही घटना शनिवारी मध्यरात्री एमआयडीसी मार्गावरील ‘हॉटेल अ‍ॅनेक्स’मध्ये घडली. अजित रमेश नाईक (३६,रा.फुलआमला) असे मृताचे तर सचिन वानखडे (२१, अमरावती) व संदीप पाटील (२०,रा. अकोला, ह.मु.तपोवन) अशी गंभीर जखमींची नावे आहेत. बडनेरा पोलिसांनी सतीश पालवे (३०,रा. जेवडनगर) याला अटक केली असून अन्य चार आरोपी पसार झाले आहेत. बडनेरा मार्गावरील एमआयडीसी परिसरातील हॉटेल अ‍ॅनेक्समध्येही काही युवक वेटरचे काम करीत आहे. त्यामध्ये मृत अजित नाईक व जखमी सचिन वानखडे व संदीप पाटील यांचा सहभाग आहे. शनिवारी मध्यरात्री १२.४० वाजता आरोपी सतीश पालवेसह अन्य युवक हॉटेल अ‍ॅनेक्समध्ये गेला. मद्यप्राशन केल्यानंतर त्यांनी जेवणासाठी वेटरला सांगितले. मात्र, हॉटेल बंद झाल्याचे वेटरने त्यांना सांगितले. मात्र, तरीही जेवण मिळण्याबाबत वेटरकडे तगादा लावला. त्यामुळे हॉटेल संचालकांनी दोन्ही युवकांना हॉटेलबाहेर काढण्याचे आदेश दिले. वेटरने दोघांना बाहेर जाण्यास सांगितल्याने वाद उफाळून आला. आरोपींनी फोन करून त्यांच्या साथीदारांना बोलावून घेतले. काही वेळातच आरोपींसह त्यांच्या साथीदारांनी तीन्ही वेटर्सवर चाकू व तलवारींनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात वेटर अजित नाईक याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. गंभीर जखमी सचिन वानखडे याला खासगी रुग्णालयात तर संदीप पाटील याला नागपूर येथे हलविण्यात आले. बडनेराचे पोलीस निरीक्षक दिलीप पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहास इर्विन रुग्णालयात आणले. याप्रकरणात पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून सतीश पालवेला अटक केली.आरोपींना अटक करा, नंतरच मृतदेह उचलूशिक्षण घेऊन पार्टटाईम 'जॉब' करणाऱ्या शेकडो वेटर्सना या घटनेमुळे धक्का बसला आहे. रविवारी सकाळी जॉब करणारे शेकडो युवक इर्विनच्या शवविच्छेदनगृहासमोर जमले होते. आरोपीला अटक करा, अन्यथा मृतदेह उचलणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता. मात्र, पीआय पाटील यांनी युवकांची समजूत काढून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. जेवणाच्या वादातून वेटरची हत्या करण्यात आली आहे. एका आरोपीला अटक करण्यात आली असून अन्य आरोपीचा शोध सुरु आहे. - दिलीप पाटील, पोलीस निरीक्षक, बडनेरा पोलीस ठाणे.