अमरावती : महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची बदली रद्द करण्यासाठी पुकारण्यात आलेल्या बंद दरम्यान काही समाज कंटकांनी धूडगुस घातला. गांधी चौकातील मराठा सावजी या हॉटेलमध्ये शिरुन या समाजंटकांनी तोडफोड केली. या परिसरात सहा महिन्यांपूर्वी एका तरुणाची हत्या करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास विशिष्ट धर्मीय तरुणांनी 'बंद' पाळण्याच्या नावावर येथे धुडगूस घातला. ते सर्व आंदोलनकर्ते टिपू सुल्तान या संघटनेचे कार्यकर्ते असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगीतले. त्यांच्या हाती विशिष्ट संघटनेचे बॅनर आणि फलकेसुध्दा होती. यातील काही मस्तवाल तरुणांनी मराठा सावजी या हॉटेलमध्ये तोडफोड केली तथा हाती येईल त्या साहित्यांची नासधूससु्ध्दा केली. काही तरुणांच्या या कृत्यांने शांततेत होत असलेल्या बंदला गालबोट लागले. याच संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अंबादेवी रोडवरील दुकानात घुसून तोडफोड केल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणात उशीरा रात्री गुन्हे दाखल होण्याची प्रक्रिया सुरु होती.हॉटेल तोडफोडप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल.नितीन पवारप्रभारी पोलीस आयुक्त
गांधी चौकात हॉटेलची तोडफोड
By admin | Updated: May 15, 2016 00:01 IST