शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
2
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
3
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
4
पाकिस्तानसाठी हेरगिरी, हरयाणाची युट्यूबर ज्योती मल्होत्रासह सहा अटकेत 
5
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
6
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
7
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
8
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
9
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
10
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
11
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
12
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
13
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
14
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
15
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
16
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
17
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
18
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
19
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक

रुग्णालयातील हिटरने गर्भवतीचा पाय भाजला, बोटे कापली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 05:00 IST

‘सिझेरियन’ झाल्याने बाळंतपणानंतर त्यांना थंडी वाजायला सुरुवात झाली. त्यामुळे  भैरवी यांना खोलीत आणण्यात आले. मात्र, शस्रक्रिये दरम्यान कमरेखालील भाग ॲनेस्थिशीयामुळे बधिर झाला होता.  थंडी वाजत असल्याने डॉक्टरांनी  परिचारिकेला हिटर लावण्यास सांगितले. सदर हिटर परिचारिकेने १० मिनिटे भैरवी यांच्या पायाजवळ पकडून त्यांच्या अंगावर ब्लँकेट टाकण्यात आले. मात्र, पाय बधिर असल्याने तेव्हा हिटरच्या वाफेची त्यांना जाणीव झाली नाही.

ठळक मुद्देपतीची पोलिसांत तक्रार, प्रसूतीनंतरची घटना, ॲनेस्थेशियामुळे पाय भाजण्याच्या वेदना तिला जाणवल्याच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गोंडस बाळाला जन्म दिल्यानंतर ओल्या बाळंतिनिला थंडी वाजली. डॉक्टरच्या सांगण्यावरून परिचारिकेने महिलेच्या पायाजवळ हिटर लावले. तिचा पाय भाजू लागला. बधिरीकरण आौषधीमुळे  तिला वेदना जाणवल्या नाहीत. मात्र पाय भाजला त्यानंतर काही दिवसांनी पायात इन्फेक्शन झाल्याने महिलेच्या पायाची तीन बोटे कापावी लागल्याची दुर्देवी  व तेवढीच धक्कादायक घटना शहरात घडली. तक्रारीनुसार, कॅम्पनजीकच्या भाग्यश्री कॉलनीतील प्रफुल्ल राम देशमुख यांनी खापर्डे बगिच्या परिसरात असलेल्या काळे नर्सिंग होमच्या संचालक डॉ. संध्या काळेविरुद्ध  सिटी कोतवाली ठाण्यात गुरुवारी तक्रार नोंदविली. डॉक्टरच्या निष्काळजीपणानामुळे पत्नीच्या पायाची बोटे कापावी लागली, असा आरोप त्यांनी सदर तक्रारीत केला आहे. प्रफुल्ल देशमुख यांच्या पत्नी भैरवी (३५) या गर्भवती असताना डॉक्टर काळे यांच्याकडे बाळंतपणाकरिता भैरवी यांची नोंदणी केली.  त्याचप्रमाणे त्यांच्याकडे उपचार सुद्धा घेणे सुरू केले. १८ फेब्रुवारी २०२१ रोजी भैरवी यांना प्रसूतीची कळा सुरू झाल्याने तिला काळे नर्सिंग होममध्ये दाखल केले. भैरवी यांनी एका गोंडस बाळाला जन्म दिला. मात्र, त्यांचे  ‘सिझेरियन’ झाल्याने बाळंतपणानंतर त्यांना थंडी वाजायला सुरुवात झाली. त्यामुळे  भैरवी यांना खोलीत आणण्यात आले. मात्र, शस्रक्रिये दरम्यान कमरेखालील भाग ॲनेस्थिशीयामुळे बधिर झाला होता.  थंडी वाजत असल्याने डॉक्टरांनी  परिचारिकेला हिटर लावण्यास सांगितले. सदर हिटर परिचारिकेने १० मिनिटे भैरवी यांच्या पायाजवळ पकडून त्यांच्या अंगावर ब्लँकेट टाकण्यात आले. मात्र, पाय बधिर असल्याने तेव्हा हिटरच्या वाफेची त्यांना जाणीव झाली नाही. मात्र काही वेळेत ॲनेस्थेसियाचा प्रभाव कमी झाल्यानंतर  भैरवी यांच्या पायाला वेदना जाणवू लागली. भैरवी यांनी याबाबत परिचारिकेला सांगितल्यानंतर तिने डॉ. काळे यांना कळविले. डॉक्टरांनी बघितले असता, भैरवी यांचा उजवा पाय जळाल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने प्लास्टिक सर्जन लक्षक देशमुख यांना पाचारण केले. त्यांनी ड्रेसिंग केले. त्यानंतर २४ फेब्रुवारीला डॉ. काळे यांनी भैरवीला डिस्चार्ज दिला. त्यानंतर डॉ. देशमुख यांनी महिलेला त्यांच्या हॉस्पिटलमध्ये बोलविले. १ मार्च २०२१ रोजी डॉक्टर देशमुख यांनी भैरवी यांच्या पायाची तीन बोटे कापावी लागतील, असे त्यांच्या पतीला सांगितले असता, त्यांना धक्का बसला. मात्र, त्यांनी कुठलाही निर्णय न घेता डॉ. अर्चना मशानकर यांच्याकडे तपासणीला नेले. त्यांनीही बोेटे कापावी लागतील, असे सुचवित व नागपूर येथील डॉ. शैलेश निसाळ यांच्याकडे नेण्यास सांगितले. ८ मार्च रोजी डॉ. निसाळ यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनीही बोटे कापवी लागतील असेच सांगितले. त्याच वेळी भैरवी यांची कोरोना चाचणीही करण्यात आली. चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर अमरावती येथील  डॉ. किशोर बेले यांच्याकडे त्या उपचारार्थ गेल्या असता, पायात पस झाल्याने लवकरच पायाची बोटे कापावी लागतील, असे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्याकडे  २४ मार्चला भरती करून २५ मार्च रोजी भैरवी यांच्या उजव्या पायाचा अंगठा, करंगळी व करंगळीच्या बाजूचे बोट कापावे लागले.

डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळेपत्नीला अपंगत्व

पत्नीला उपचार देते वेळी डॉ. काळे यांच्याकडून निष्काळजीपणा झाला. त्यामुळे पत्नीला कायमचे अपंगत्व आले. तसेच गत दोन महिन्याच्या कालावधीमध्ये या प्रकारामुळे मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.  कोरोना आजारालाही सामोर जावे लागले. एक महिन्यापर्यंत लहान बाळाला सुद्धा दुध सुद्धा पाजता आले नाही. याला कायमचे अपंगत्व व विद्रुपपणा येण्यास डॉक्टर काळे कारणीभुत असल्याचा आरोप प्रफुल्ल देशमुख यांनी केला. तसेच डॉक्टरविरुद्ध कायदेशिर कारवाई करण्याकरीता त्यांनी पोलीस आयुक्त व जिल्हाशल्यचिकित्सक यांच्याकडे सुद्धा तक्रारीचे प्रत पाठविली.

काय म्हणाल्या डॉक्टर?सदर महिलेची शस्त्रक्रिया यशस्वी झाली होती. थंडीचे दिवस असल्याने सिझेरिननंतर तिला थंडी वाजल्याने आयाने रुमहिटर लावले. ते हिटर महिलेच्या पायाजवळ ठेवल्याने तिचा पाय भाजला. आयाबाईला कामावरून कमी केले. ही माहिती मिळाल्यानंतर मलाच या घटनेचा शॉक बसला. कुठल्याच डॉक्टरला आपल्या रुग्णांचे वाईट व्हावे, असे वाटत नाही. आपण त्यांचे फॅमिली डॉक्टर असल्याची प्रतिक्रिया डॉ. संध्या काळे यांनी दिली.

मला अद्याप तक्रार प्राप्त झाली नाही. मात्र, तक्रार आल्यानंतर सदर प्रकरणाची तज्ज्ञ डॉक्टरची जिल्हास्तरीय समितीमार्फत चौकशी करण्यात येईल.  - श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्यचिकित्सक

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे पत्नीच्या पायाची बोटे कापावी लागली. त्यामुळे तिला कायमचे अपंगत्व आले. पोलिसांनी डॉक्टरविरुद्ध गुन्हा नोंदवून याची नुकसानभरपाई द्यावी. यासंदर्भात पोलिसांत तक्रार दिली आहे.प्रफुल्ल देशमुख,  महिलेचे पती

अद्याप आम्हाला कुठलीही तक्रार प्राप्त झाली नाही. तक्रार आल्यानंतर ती आयएमएच्या कार्यकारिणी समितीसमोर ठेवण्यात येईल. त्यानंतरच  या प्रकरणाची चौकशी करून पुढील कारवाईची दिशा ठरविली जाईल. डॉ. दिनेश ठाकरे, अध्यक्ष आयएमए 

शासन निर्णयानुसार डॉक्टरविरुद्ध थेट गुन्हा नोंदविता येत नाही. या प्रकरणात जिल्हा शल्यचिकित्सकांच्या समितीने चौकशी करून डॉक्टर दोषी असल्याचा अहवाल पोलिसांना सादर केल्यानंतरच पुढील होईल.  - आरती सिंह, पोलीस आयुक्त 

 

टॅग्स :hospitalहॉस्पिटल