शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

माँसाहेबांना मानवंदना अन् मानाचा मुजराही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 23:20 IST

आॅनलाईन लोकमतअमरावती : छत्रपती विचार मंचतर्फे राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांचा जयंती उत्सव शुक्रवारी साजरा करण्यात आला. यावेळी शहरातून काढण्यात आलेली रॅली व जिजाऊंच्या जयघोषाने अंबानगरी दुमदुमून निघाली.रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी स्त्रीभ्रूण हत्या, मुलींवर होणारे अ‍ॅसिड हल्ले, छेडखानी, हगणदारीमुक्त शहर आदी सामाजिक विषयांकडे लक्ष वेधणाऱ्या अप्रतिम पथनाट्यांचे मुख्य चौकात सादरीकरण केले.यावेळी श्यामनगर चौकातील राजमाता जिजाऊंच्या ...

ठळक मुद्देजयंती : रॅली, पथनाट्यात युवकांचा सहभाग, सामाजिक संदेशअंबानगरीत जयघोषछत्रपती विचार मंच, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघाचा समावेश

आॅनलाईन लोकमतअमरावती : छत्रपती विचार मंचतर्फे राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांचा जयंती उत्सव शुक्रवारी साजरा करण्यात आला. यावेळी शहरातून काढण्यात आलेली रॅली व जिजाऊंच्या जयघोषाने अंबानगरी दुमदुमून निघाली.रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी स्त्रीभ्रूण हत्या, मुलींवर होणारे अ‍ॅसिड हल्ले, छेडखानी, हगणदारीमुक्त शहर आदी सामाजिक विषयांकडे लक्ष वेधणाऱ्या अप्रतिम पथनाट्यांचे मुख्य चौकात सादरीकरण केले.यावेळी श्यामनगर चौकातील राजमाता जिजाऊंच्या पुतळ्याला मानवंदना देऊन व पूजन करून रॅलीला सुरुवात झाली. राजकमल चौक, इर्र्विन चौक, गाडगेनगर, कठोरा नाका, आरटीओ चौकातून शेकडो युवक, मुलींनी मोटरसायकल रॅली काढून जिजाऊ माँसाहेबांचा जयघोेष केला. यावेळी वैभव बिजवे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तर प्रियंका मानकर यांनी जिजाऊंची वेशभूषा साकारली होती. ते या रॅलीचे विशेष आर्कषण ठरले होते. यावेळी जिजाऊ बुरघाटे या लहान मुलीनेही जिजाऊ माँसाहेबांची वेशभूषा साकारली होती.रॅलीमध्ये छत्रपती विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष सुमीत देशमुख, उपाध्यक्ष सागर देशमुख, अर्पित वडतकर, राहुल देशमुख, जयपाल उत्तमानी, सचिन मेहरे, रूषीकेश चौधरी, प्रणीत शेखार, अविनाश शिंदे, मयूर पाकधुने, विक्की सोळंके, मंगेश लोणकर, रूपाली धोटे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. ठिकठिकाणी पथनाट्याचे सादरीकरण विनय भगत व दिनेश गोहत्रे यांच्या नेतृत्वातील चमूने केले.राष्ट्रमाता जिजाऊ चौकात मानवंदनाजिजाऊ बिग्रेड, संभाजी बिग्रेड, मराठा सेवा संघ व जिजाऊ बँकेच्यावतीने राष्ट्रमाता जिजाऊ चौकातील राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेबांच्या पुतळ्याचे पूजन व हारार्पण करून, मानवंदना देण्यात आली. यावेळी शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राजमाता जिजाऊंना मानाचा मुजरा केला.शहरात शुक्रवारी ठिकठिकाणी जिजाऊंची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद, शिवाजी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे एनएसएस पथक यांनीही सहभाग घेतला. कार्यक्रमाला उपमहापौर संध्या टिकले, जिजाऊ बँकेचे शरद भोकसे, अर्चना बारबुद्धे, मनोज काळमेघ, मंजूषा घोडमारे, चंद्रशेखर पाथरे, अभिजित पवित्रकार, अंकीत चौधरी, हर्षक ढवक, मनीषा तायडे, गणेश धाकतोडे, पंडित मोर्शे, मनीष बोडखे, चंद्रशेखर पाथरे, प्रीती देशमुख, कविता उगले, विवेक हाते, राजेश बंड, वृषभ महल्ले यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. संभाजी बिग्रेडचे जिल्हाध्यक्ष तुषार देशमुख, निखिल काटोलकर, जिजाऊ बिग्रेडच्या कांचन उल्हे, मोहिते, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे राम देशमुख रजत विधळे, प्रसेनजित देशमुख, योगेश देशमुख, कनिकेश पवार, आशिष पर्वते, अंकित भाकरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होेते.