शहरं
Join us  
Trending Stories
1
Nagpur Rains: विदर्भाला पावसाचा तडाखा! नागपूरमध्ये घरांमध्ये पाणी, शाळांना सुट्टी; पुरामुळे अनेक ठिकाणी संपर्क तुटला
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
टेस्ट पासून का रे दूरावा? किंग कोहली म्हणाला; दाढी पिकली रे भावा!
4
FD पेक्षा जास्त परतावा, पण शेअर बाजाराचा धोका नको? आता 'हा' फंड देणार दुप्पट परतावा?
5
'...तर मी राजकारण सोडेन', नितीश कुमारांबाबत प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी
6
२० रुग्णालये, १३,००० कर्मचारी हे आहेत भारतातील सर्वात श्रीमंत डॉक्टर, एवढी आहे संपत्ती
7
हनुमान चालीसा बोलायचा राशिद, गर्लफ्रेंड झाली फिदा; पण तिथूनच सुरू झाला नवा कांड, युवती...
8
"साहेब, बायको पळाली"; ४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार; पतीची पोलिसांकडे धाव! म्हणाला... 
9
'या' आयपीओचं तुफान लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल; शेअर्स खरेदीची लूट
10
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
11
खळबळजनक! प्रायव्हेट व्हिडीओ दाखवून ३ कोटी उकळले अन् धमकावलं, CA ने आयुष्य संपवलं
12
आरारा....खतरनाक; कमी किमतीत स्मार्ट फीचर्स; Mahindra ने लॉन्च केली सर्वात SUV
13
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
14
'धुरंधर'मध्ये दिसलं पाकिस्तान, कुठे शूट झाले हे सीन्स? रणवीर सिंहच्या सिनेमाची चर्चा
15
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
16
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
17
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
18
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
19
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
20
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट

तुम्ही स्वत:चा सन्मान करा, लोकही करतील!

By admin | Updated: May 8, 2015 00:20 IST

'तुम्ही स्वत:चा सन्मान करा, लोक आपसूकच तुमचा सन्मान करतील,' असा मंत्र महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी महापालिकेच्या तमाम अभियंत्यांना गुरुवारी दिला.

गणेश देशमुख अमरावती'तुम्ही स्वत:चा सन्मान करा, लोक आपसूकच तुमचा सन्मान करतील,' असा मंत्र महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी महापालिकेच्या तमाम अभियंत्यांना गुरुवारी दिला. आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर गुडेवार यांनी गुरुवारी पहिल्यांदाच महापालिकेच्या सुमारे ३० अभियंत्यांशी संवाद साधला. बैठकीचे हे औचित्य साधून त्यांनी मार्मिक शैलीत अभियंत्यांचा आत्मविश्वास आणि आत्मसन्मान जागा करण्याचा प्रभावी प्रयत्न केला. चित्रपटात शोभावेत, असे स्वत:च्या आयुष्यातील काही अनुुभव त्यांनी अभियंत्यांशी 'शेअर' केलेत. ऐकायला औत्सुक्यपूर्ण वाटणारे हे किस्से जणू चाणक्यनीतीचा भाग असावा, इतके अर्थपूर्ण होते. प्रामाणिकच असा. कर्तव्यदक्षता तुमची शान ठरेल अन् अप्रामाणिकता शान घालवेल, असे अर्थ त्या अनुभवकथनातून वारंवार अंकित होत होते. मी कमिश्नरच असेन !एक महिना, दोन महिने वा वर्षभर- मी येथे राहील तितके दिवस कमिश्नर म्हणूनच राहील, अशा शब्दांत गुडेवार यांनी त्यांना अपेक्षित लोकाभिमुख, पारदर्शी आणि नियमसंगत कर्तव्याची जाणीव अभियंत्यांना करून दिली. अभियंता कोण ?'रॅशनल' आणि 'अ‍ॅनॅलिटकल' विचार करतो तो अभियंता. सोप्या मराठीत सांगायचे झाल्यास 'डोके चालवितो तो अभियंता.' तुम्ही अभियंता असाल तर डोके चालवून लहानसहान समस्यांवर उपाय शोधाल, अशी जाणीव गुडेवार यांनी अभियंत्यांना करून दिली. क्षुल्लक मुद्यांबाबत तक्रार करण्याऐवजी उपाय शोधण्याकडे कल असावा, असा त्यांचा त्यामागे होरा होता. वेगाने कामे कराअमरावती : सहा महिन्यांत विशेष वेगाने कामे करून अमरावती शहराचा चेहरा बदलत असल्याचे चित्र निर्माण करण्याची जबाबदारी गुडेवार यांनी अभियंत्यांच्या शिरावर सोपविली. अभियंत्यांनीही ती सहर्ष स्वीकारली. पावसाळ्यापर्यंत शक्य ती सर्व तांत्रिक कामे निपटवायची आणि पावसाळ्यात प्रत्यक्ष कामे कमी झालीत की धोरणात्मक कामांबाबत निर्णय घ्यायचे, असे कार्यसूत्रही गुडेवारांनी अभियंत्यांना दिले. रस्त्यांवरील कामे तातडीने पूर्ण करा. सार्वजनिक बांधकाम विभागातून निवृत्त झालेले गुणवंत आणि प्रामाणिकपणे काम करण्याची इच्छा असलेले अभियंते मानधनावर नेमा. ज्या रस्त्यांवर पाईपलाईन आदी कामे सुव्यवस्थितपणे झाली असतील तेथे सिमेंट रस्ते निर्माण करण्यासाठीचा प्रस्ताव द्या, कंत्राटदाराने देयक सादर केल्यावर महिनाभरात रक्कम अदा केली जाईल; तसे न झाल्यास दरमहा व्याजाचे पैसे कंत्राटदाराला दिले जातील, असे जाहीर करा, आदी सूचना त्यांनी या बैठकीत केल्यात. स्पष्ट निर्देश दिल्यानंतरही त्याकडे कानाडोळा करणाऱ्या बाळापूरच्या एका अधिकाऱ्याला लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे कसे सोपविले याबाबतची संघर्षगाथा गुडेवार यांनी जाणीवपूर्वक सांगितली. भ्रष्टाचार सोडणार नसाल तर तुम्हीही सुटणार नाही, असे संकेत त्यांनी या कथनातून दिलेत. मी स्वत:हून प्रकरणे शोधून काढत नाही; पण माझ्याकडे तक्रारी आल्या तर कुंडली काढल्याशिवाय राहत नाही, हेदेखील गुडेवार यांनी स्पष्ट केले.