शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीपूर्वी एनडीए खासदारांची डिनर पार्टी रद्द; पंतप्रधानांच्या निवासस्थानी कार्यक्रम होणार होता; कारण आले समोर
2
एकाच पत्नीचे १५ पती! इंग्लंडला पाठवण्यासाठी लढवली शक्कल, ऐकून पोलिसही थक्क झाले
3
Punjab Flood : आभाळ फाटलं, पुराचा वेढा! पंतप्रधान मोदी करणार पंजाबचा दौरा; २००० गावं पाण्याखाली, ४६ मृत्यू
4
आरोग्य आणि जीवन विमा आता जीएसटी-मुक्त! पण प्रत्यक्षात किती प्रीमियम स्वस्त होईल?
5
साप्ताहिक राशीभविष्य: पितृपक्ष सुरुवात ७ राशींना तापदायी-संमिश्र; ५ राशींना लाभ-पैसा येईल!
6
जीएसटी कपातीनंतरही किंमत कमी केली नसेल तर मला सांगा, मी तिथे येईन; निर्मला सीतारामन यांचे विधान
7
गणेश विसर्जनावेळी वीजेचा शॉक लागून दुर्घटना; एकाचा मृत्यू, चौघे जखमी, मुंबईतील घटना
8
पंतप्रधानांच्या मणिपूर दौऱ्यासाठी जय्यत तयारी; १५००० लोकांची बैठक व्यवस्था, स्टेज उभारणीचे काम सुरू
9
३० वर्षीय विवाहितेचे १७ वर्षांच्या तरुणाशी संबंध, मुलीने आक्षेपार्ह स्थितीत पाहिल्यावर...
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सकारात्मक भूमिकेचे मोदींकडून स्वागत; म्हणाले, "भारत आणि अमेरिकेमध्ये..."
11
२२ तास चाललेल्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल
12
खलिस्तानी अतिरेक्यांना कॅनडामधून मदत; कनडा सरकारचा अहवाल : दोन संघटनांची केली नोंद
13
Thane: गणपती विसर्जन करताना पाच जण नदीत बुडाले, एकाचा मृतदेह मिळाला; दोघांचा शोध सुरूच
14
Ganpati Visarjan: भर पावसात, जल्लोषात गणरायाला निरोप; मुंबईत ढोल-ताशांसह गुलालाची उधळण
15
ट्रम्प यांचा यु-टर्न! टॅरिफ पद्धतीत केले बदल; महत्त्वाची खनिजे व औषधी उत्पादनांसह काही वस्तूंना सूट
16
आजचे राशीभविष्य - ७ सप्टेंबर २०२५, नवीन कामाची सुरूवात करण्यास अनुकूल दिवस
17
Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा
18
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
19
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
20
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार

‘सन्मान प्रेरणेचा, सन्मान गुणवत्तेचा’ आता राज्यभर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 19:40 IST

चांदूर रेल्वे पंचायत समिती स्तरावर राबविलेल्या ‘सन्मान प्रेरणेचा, सन्मान गुणवत्तेचा’ या उपक्रमाला राज्य शासनाने राज्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

- मोहन राऊतधामणगाव रेल्वे (अमरावती) - चांदूर रेल्वे पंचायत समिती स्तरावर राबविलेल्या ‘सन्मान प्रेरणेचा, सन्मान गुणवत्तेचा’ या उपक्रमाला राज्य शासनाने राज्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये राबविण्याचा निर्णय घेतला आहे. वर्षभरापूर्वी गटशिक्षणाधिकारी अशोक इंगळे यांनी या उपक्रमाकरिता घेतलेल्या परिश्रमाचे यामुळे चीज झाले आहे. खासगी शाळांपेक्षा जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक दर्जा अव्वल असल्याचा अहवाल नुकताच असर संस्थेने सादर केला होता.त्यामागे ‘सन्मान प्रेरणेचा, सन्मान गुणवत्तेचा’ या उपक्रमाचा हातभार आहे. चांदूर रेल्वेचे गटशिक्षणाधिकारी अशोक इंगळे यांनी एक वर्षापूर्वी हा उपक्रम पंचायत समिती स्तरावर राबविला होता. तालुक्यातील ७४ शाळांमध्ये राबविलेल्या या उपक्रमाने तालुक्यातील शाळा अव्वल ठरल्या. यानंतर अमरावती जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती जयंत देशमुख यांनी चिखलदरा येथील मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखांच्या बैठकीत ही संकल्पना राबविण्याचे जिल्हा स्तरावर आवाहन केले होते.  त्यानुसार हा उपक्रम प्रथम जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था व  पंचायत समित्यांच्या गटसाधन केंद्रांमार्फत राबविण्यात आला. आता हा उपक्रम राज्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे. उपक्रमात शाळा पडताळणी करण्याकरिता अनेक भागांत गुण विभागण्यात आले. भौतिक गुणवत्ता, समाज सहभाग, व्यवस्थापन याकरिता वेगवेगळे  गुण देण्यात आले. उत्तम मुख्याध्यापक, उत्तम शिक्षक असे विविध पुरस्कार निवडण्यात आले. एक वर्षाची माहिती संकलित करून असे पुरस्कार शाळा, केंद्र स्तरावर देण्यात आले आहेत.  असे आहेत उपक्रमभौतिक सुविधेमध्ये लोकसहभागावर शाळेची रंगरंगोटी. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दृष्टिकोणातून महत्त्वपूर्ण घटक समाविष्ट असणे. डिजिटल वर्गांचा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वापर करता येणे. वैज्ञानिक प्रयोगाकरिता साहित्य उपलब्धता. प्रयोगाचे सादरीकरण. गुणवत्तेमध्ये इयत्ता पहिलीसाठी बेरीज, दुसरीसाठी वजाबाकी, तिसरीसाठी गुणाकार, चौथीसाठी भागाकार तसेच परिसर अभ्यास; यामध्ये स्वत: कुटुंबाबद्दल माहिती सांगणे. कुटुंब, शाळा, गाव, महापुरुष, राष्ट्रीय सण,  एक ऐतिहासिक घटना अशी माहिती विद्यार्थ्या$ंकडून घेणे. 

चांदूरचे गटशिक्षणाधिकारी अशोक इंगळे यांनी राबविलेला हा उपक्रम जिल्ह्यानंतर राज्यात पोहोचला आहे. या उपक्रमामुळे जि.प. शाळांच्या  गुणवत्तेत वाढ होईल.- जयंत देशमुख, शिक्षण सभापती, जिल्हा परिषद, अमरावती

चांदूर रेल्वे पॅटर्न आता राज्यभर राबविण्यात येणार आहे. हा गटशिक्षणाधिकारी अशोक इंगळे व आमचा सन्मान आहे. आमच्या जिल्हा परिषद शाळा यापुढे  प्रगत शिक्षण देतील.ृ- अमोल पोळ, गटविकास अधिकारी, पंचायत समिती

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रAmravatiअमरावती