शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

राणांच्या ‘गंगा सावित्री’वर होमहवन, गोमूत्र शिंपडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2022 15:26 IST

यावेळी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण, विचार विसरलेल्या शिवसैनिकांना सद्बुद्धी मिळावी, यासाठी प्रार्थना करण्यात आली.

अमरावती : आमदार रवी राणा यांच्या ‘गंगा सावित्री’ या निवासस्थानी युवा स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी होमहमन केले आणि गोमूत्र शिंपडून अपवित्र झालेला परिसर पवित्र करण्याचा अनाेखा उपक्रम राबविला. या वेळी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण, विचार विसरलेल्या शिवसैनिकांना सद्बुद्धी मिळावी, यासाठी प्रार्थना करण्यात आली.

आमदार रवी राणा व खासदार नवनीत रवी राणा यांच्या अनुपस्थितीत शनिवारी शिवसैनिकांनी आमदार राणांचे आई-वडील, लहान मुलांना घाणेरड्या भाषेत शिवीगाळ केली. घरावर दगडफेक करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे हिंदू संस्कृती विसरले आहेत. स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेली शिकवण न अंगीकारता आपल्या पदाचा गैरवापर करून पोलीस प्रशासनाच्या मदतीने दडपशाही करून हनुमान चालिसा पठण करणाऱ्यांना जेलची वारी करायला लावत आहेत, असा आरोप करण्यात आला.

या बाबींमुळे शिवसैनिक स्व. बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण विसरल्याचे सिद्ध झाल्याने दिवंगत बाळासाहेबांच्या आत्म्याला शांती लाभावी व वाट चुकलेल्या या तथाकथित शिवसैनिकांना सद्बुद्धी मिळावी, यासाठी युवा स्वाभिमानचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी होमहवन केले. स्थानिक शिवसैनिकांनी केलेल्या अर्वाच्य शिवीगाळ आणि धर्मविरोधी वागणुकीने अपवित्र झाल्याचे म्हणत सर्व परिसर गोमूत्र शिंपडून पवित्र करण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :PoliticsराजकारणRavi Ranaरवी राणाnavneet kaur ranaनवनीत कौर राणा