शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

घरकूल लाभार्र्थींचा थेट पंतप्रधानांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 22:21 IST

प्रधानमंत्री आवास योजनेतील घरे पूर्ण झालेल्या निवडक लाभार्थी महिलांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शिर्डी येथून थेट संवाद साधला. प्रधानमंत्री आवास योजनेत ई-गृहप्रवेश शुभारंभ व विविध कार्यक्रम शिर्डी येथे झाले. यावेळी प्रधानमंत्री आवास योजनेतील ई-गृहप्रवेश सोहळा आॅनलाइन चाव्या देऊन जिल्ह्यात करण्यात आला.

ठळक मुद्देतीन महिलांना संधी : प्रधानमंत्री आवास योजनेत ई-गृहप्रवेश

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : प्रधानमंत्री आवास योजनेतील घरे पूर्ण झालेल्या निवडक लाभार्थी महिलांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शिर्डी येथून थेट संवाद साधला. प्रधानमंत्री आवास योजनेत ई-गृहप्रवेश शुभारंभ व विविध कार्यक्रम शिर्डी येथे झाले. यावेळी प्रधानमंत्री आवास योजनेतील ई-गृहप्रवेश सोहळा आॅनलाइन चाव्या देऊन जिल्ह्यात करण्यात आला.अंजनगाव बारी (ता. अमरावती) येथील फातिमाबी अब्दुल सलीम, टाकरखेडा (ता. भातकुली) येथील मीरा प्रमोद सोळंके, कुऱ्हा (ता. तिवसा) येथील हकिमाबी राजदार खाँ आदींचा पंतप्रधानांशी जिल्हाधिकारी कार्यालयातील एनआयसी कक्षात संवाद झाला. मिळालेली घरे कशी आहेत, स्वच्छतागृहाची व्यवस्था, वीज उपलब्ध झाली का, अशी विचारणा पंतप्रधानांनी केली. आवास योजना वंचितांसाठी महत्त्वाची ठरली आहे, अशी प्रतिक्रिया फातिमा सलीम व मीरा सोळंके यांनी त्यांच्याकडे व्यक्त केली. प्रधानमंत्री आवास योजनेत जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. ३३ हजार ९४८ घरांपैकी २९ हजार २५० घरे मंजूर करण्यात आली. २१ हजार ९१३ घरांचे काम सुरू असून, १४ हजार ७४८ घरे पूर्ण झाली असल्याचे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प भंडारी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, प्रकल्प संचालक आनंद भंडारी यांच्यासह लाभार्थी महिला उपस्थित होत्या.