शहरं
Join us  
Trending Stories
1
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
2
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
3
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
4
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
5
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
6
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
7
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
8
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
9
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
10
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
11
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
12
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
13
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
14
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
15
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
16
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

‘क्लस्टर’ झोनमध्ये घरपोच रेशन धान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 05:00 IST

महापालिका आयुक्तांद्वारे हा भाग ेकंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केलेला असल्याने या भागाच्या सर्व सीमा प्रशासनाने बंद केलेल्या आहेत. यामध्ये ही रेशन दुकाने बंद करण्याचे आदेश आहेत. दुसरीकडे शासनाच्या वेगवेगळ्या योजनांतून अन्नधान्य रेशन दुकानांना प्राप्त होत आहे. त्यामुळे पुरवठा विभागाद्वारे २८ एप्रिलला कटेंनमेंट झोनमधील १६ रेशन दुकानदारांची सभा घेण्यात आली.

ठळक मुद्दे१६ दुकानदारांद्वारे सुविधा : गर्दी टाळण्यासाठी पुरवठा विभागाचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येथील ‘क्लस्टर झोन’मध्ये कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता, रेशन दुकानांमध्ये गर्दी होऊ न देण्यासाठी १६ रेशन दुकानांच्या लाभार्थींकडे बुधवारपासून घरपोच रेशन धान्य देण्यात येत आहे. शहराच्या अन्नधान्य वितरण अधिकारी तथा तहसीलदार नीता लबडे यांच्या मार्गदर्शनात सुरू असलेल्या या उपक्रमाला नागरिकांचे चांगले सहकार्य लाभले आहे.महापालिका आयुक्तांद्वारे हा भाग ेकंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केलेला असल्याने या भागाच्या सर्व सीमा प्रशासनाने बंद केलेल्या आहेत. यामध्ये ही रेशन दुकाने बंद करण्याचे आदेश आहेत. दुसरीकडे शासनाच्या वेगवेगळ्या योजनांतून अन्नधान्य रेशन दुकानांना प्राप्त होत आहे. त्यामुळे पुरवठा विभागाद्वारे २८ एप्रिलला कटेंनमेंट झोनमधील १६ रेशन दुकानदारांची सभा घेण्यात आली. यामध्ये रेशन दुकानांमध्ये शिल्लक असलेल्या धान्याची घरपोच सेवा (होम डिलिव्हरी) देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.संचारबंदीच्या काळात नागरिकांच्या घरापर्यंत रेशन धान्य पोहचवून दिले जात असताना, कायदा व सुवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी या पथकासोबत पोलीस बंदोबस्तदेखील राहणार असल्याचे तहसीलदार लबडे यांनी सांगितले.या भागांमध्ये रेशन धान्याची होम डिलिव्हरीकंटेनमेंट झोनमधील भाजीबाजार, खोलापुरीगेट, गौस नगर (२), रहमतनगर, छायानगर (३), ताजनगर, कमेला ग्राऊंड, हातीपुरा, हैदरपुरा व तारखेडा (३) येथील तीन दुकानांच्या लाभार्थींना ही घरपोच सेवा देण्यात येत आहे. अंत्योदय व केशरी कार्डधारकांना याचा लाभ मिळणार आहे. कोरोनाच्या संकटकाळात प्रत्येक नागरिकाला त्यांच्या हक्काचे रेशन मिळावे, यासाठी पुरवठा विभागाद्वारे हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या