शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

गृहमंत्र्यांनी शंकरबाबांच्या झोपडीत बनवला चहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 12:09 IST

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वझ्झर येथे शंकरबाबांच्या झोपडीत चूल पेटवून चहा शिजविला आणि तेथील मूकबधिर विद्यार्थ्यांना दिला.

ठळक मुद्दे बेवारस मतिमंद, मूकबधिर वर्षाचे करणार कन्यादानवझ्झर येथे भेट

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बेवारस व मतिमंद मुलांच्या पुनर्वसनाचा कायदा करण्यासाठी आपण सर्वाधिक प्रयत्नशील असून, स्व. अंबादासपंत वैद्य मतिमंद बाल सुधारगृहात असलेल्या १८ वर्षांवरील बेवारस मूकबधिर, अंध मुलांना त्याचा लाभ होईल, असे प्रतिपादन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वझ्झर येथे सोमवारी केले.नियोजित दौऱ्यानुसार गृहमंत्र्यांनी सायंकाळी ७ वाजता शंकरबाबा पापळकर यांच्या देखरेखीतील अचलपूर तालुक्यातील वझ्झर येथील स्व. अंबादासपंत वैद्य मतिमंद मूकबधिर बालसुधारगृहाला भेट दिली. याच बालगृहात लहानाचे मोठे झालेले समीर आणि वर्षा या दोन मुलांचे विवाह लग्न गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या लावावे, मुलीचे वडील अनिल देशमुख यांनी व्हावे, अशी विनंती शंकरबाबा पापळकर यांनी इच्छा व्यक्त केली. गृहमंत्र्यांनी ती मागणी स्वीकारली. वर्षा नामक या बेवारस मतिमंद, मूकबधिर मुलीचा विवाह नागपूर येथे भव्य स्वरूपात करून तिचे कन्यादान करणार असल्याचे त्यांनी सांगितले. शंकरबाबांच्या झोपडीत चूल पेटवून त्यांनी चहा शिजविला आणि तेथील मूकबधिर विद्यार्थ्यांना दिला.लग्नात शरद पवार उपस्थित राहणारवर्षा आता २३ वर्षांची झाली आहे. ती नागपूरच्या रेल्वे स्थानकावर एक दिवसाची असताना पोलिसांना सापडली होती. न्यायालयाच्या माध्यमातून तिचे संगोपन वझ्झर येथील बालसुधारगृहात झाले. समीर हा शिर्डी येथे सापडला होता. सोमवारी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दोघांच्या गळ्यात हार टाकून साक्षगंधाचे सोपस्कार आटोपले. नागपूर येथे लग्नात शक्य झाल्यास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही आणणार असल्याचे देशमुख यांनी शंकरबाबांशी बोलताना सांगितले.कायद्याचे वचनदेशात दिव्यांग, मतिमंद मुलांना १८ वर्षानंतर कुठे ठेवायचे, याचा कायदा नाही. हा कायदा व्हावा, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून शंकरबाबा पापळकर यांची धडपड सुरू आहे. सामाजिक न्यायमंत्र्यांशी चर्चा करून विधानसभेत प्रश्न ठेवणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शंकरबाबांना यावेळी अभिवचन दिले.१८ वर्षे वयानंतर मतिमंद मुलांचे काय, हा प्रश्न अनेक वर्षांपासून भेडसावत आहे. त्यांच्यासंबंधी कायदा करण्यासंदर्भात प्रयत्न करणार असल्याचे गृहमंत्र्यांनी वचन दिले आहे. वर्षाचे कन्यादान व समीरसोबत तिचे लग्न भव्य स्वरूपात करणार असल्याने यापेक्षा आनंदाचा क्षण कुठलाच नाही.- शंकरबाबा पापळकर, समाजसेवक, वझ्झर, ता. अचलपूर

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुख