शहरं
Join us  
Trending Stories
1
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
2
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
3
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
4
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
5
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
6
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
7
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
8
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
9
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
10
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
11
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
12
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
13
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा
14
प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग
15
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
16
'लापता लेडीज'च्या 'फूल'ची कान्समध्ये एन्ट्री, नितांशीच्या वेणीमध्ये 'या' ८ अभिनेत्रींचे फोटो
17
"मराठी मुलांनी आता उत्तर प्रदेशात जाऊन नोकऱ्या करायच्या का?"; शरद पवार गटाचा संतप्त सवाल
18
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
19
सोशल मीडियावर ट्रेंड होतंय #BoycottSitaareZameenPar, नेमकं कारण काय?
20
दिलजीत दोसांझची 'नो एन्ट्री २' मधून एक्झिट! 'या' कारणामुळे दिला नकार; नेटकरी खूश

घरगुती २५९, सार्वजनिक २५४ होलिकादहन

By admin | Updated: March 12, 2017 00:27 IST

हिन्दू धर्माचा महत्त्वाचा सण असणाऱ्या होळीची जय्यत तयारी झाली असून यंदा शहरात २५९ घरगुती तर २५४ सार्वजनिक ठिकाणी होळीचे दहन केले जाणार आहे.

शहरात चोख बंदोबस्त : ७३ ठिकाणी फिक्स पॉर्इंट लावून नाकाबंदीअमरावती : हिन्दू धर्माचा महत्त्वाचा सण असणाऱ्या होळीची जय्यत तयारी झाली असून यंदा शहरात २५९ घरगुती तर २५४ सार्वजनिक ठिकाणी होळीचे दहन केले जाणार आहे. यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त राहणार असून शहर पोलिसांकडून ७३ ठिकाणी फिक्सपार्इंट लावून नाकाबंदी केली जाणार आहे. होळी म्हणजे वसंतपंचमी भारतीय संस्कृतीतील एक मोठा सण आहे. सर्व रोगराईचे निराकरण करणारा हा सण असल्याचे पुरातन काळापासून समज आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही होळीची जय्यत तयारी सुरू झाली आहे. अमरावतीकरांमध्ये होळी सणाची उत्सुकता शिगेला पोहोचली असून होळीनंतरच्या रंग उत्सवाला शनिवारपासूनच सुरुवात झाल्याचे चित्र शहरात पाहायला मिळाले.होळी सणासाठी सर्वत्र उत्साहअमरावती : होळीच्या विधिवत पूजेचे साहित्य व रंग खरेदीसाठी बाजारपेठेतील प्रतिष्ठानात मोठी गर्दी होत आहे. शहरात घरगुती व सार्वजनिक होळीमध्ये राजापेठ हद्दीत ६३, कोतवाली हद्दीत २५, खोलापुरी गेट हद्दीत ५०, भातकुलीत २८, गाडगेनगरात ७१, नागपुरी गेटमध्ये २५, वलगावात ४६, फे्रजरपुरा हद्दीत ८५, बडनेरा हद्दीत ६५ व नांदगाव पेठ हद्दीत ५८ ठिकाणी होळीचे दहन केले जाणार आहे. बंदोबस्तासाठी ४ सहायक पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वात १८ पोलीस निरीक्षक, २२ सहायक पोलीस निरीक्षक, ५२ पोलीस उपनिरीक्षक (१५ महिला पोलीस), २०० होमगार्ड, १०० महिला होमगार्ड, ५५० पोलीस कर्मचारी तसेच एसआरपीएफची १०० जवानांची एक कंपनी तैनात केली जाणार आहे. (प्रतिनिधी)खेळा इको फे्रंडली होळीहोळीसाठी हिरवे झाडे तोडल्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होते. त्यामुळे सुकलेली लाकडांची होळी करा, असा संदेश निसर्गप्रेमीं दिला आहे. होळीसाठी टायर्स व रॉकेलचा उपयोग केल्यास प्रदूषण वाढण्याची शक्यता असते. पर्यावरणपुरक होळी साजरी करण्यात पुढाकार घ्यावा, असे आवाहन निसर्गप्रेंमीनी केले आहे.