शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभर चेतना देणारी आनंदपर्वणी मेळघाटातील आदिवासींची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2022 05:01 IST

कोरकू होळीमध्ये गावपाटलाच्या भेटीवरून परत आल्यानंतर भोजन करून रात्रभर ‘मुठवा’ देवासमोर नृत्य केले जाते. नंतर दुसऱ्या दिवशी रंगपंचमी साजरी करतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पळसाच्या फुलापासून रंगपंचमीसाठी रंग तयार केला जातो. रंग तयार केलेल्या भांड्यात जोपर्यंत फगवा टाकत नाही, तोपर्यंत रंग खेळला जात नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्यात केवळ मेळघाटात आढळणाऱ्या कोरकू या आदिवासी जमातीचा होळी हा दिवाळीपेक्षाही मोठा सण आनंदात साजरा केला जातो. ही होळी सुमारे पाच दिवस चालते. होळी हा सण साजरा करीत असताना जी गाणी म्हटली जातात, त्यात त्यांचा इतिहास सांगितला जातो. अनेकदा ही गाणी अर्थपूर्ण विनोदाने भरली असतात. विविध गावांतील नृत्य पथके होळी पेटवण्याच्या दिवशी गात असतात. होळीचा जो उंच दांडा व बांबू असतो, तो खाली पडायला आल्यास पोलीस पाटील त्याला दुसऱ्या लाकडाच्या साहाय्याने वरचेवर झेलतो. कारण तो बांबू व दांडा खाली पडल्यास आदिवासी समाजात अपशकुन मानला जातो. पोलीस पाटील झेललेल्या बांबूचा व दांड्याचा अग्रभाग तोडतो. त्या अग्रभागाची पूजा केली जाते. अग्रभागाचा तुकडा याच स्थानिक भागातील नृत्य पथकास दिला जातो. स्त्री-पुरुष, मुले आनंदाने होळीभोवती नाचतात व रात्र जागून काढतात. कोरकू होळीमध्ये गावपाटलाच्या भेटीवरून परत आल्यानंतर भोजन करून रात्रभर ‘मुठवा’ देवासमोर नृत्य केले जाते. नंतर दुसऱ्या दिवशी रंगपंचमी साजरी करतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पळसाच्या फुलापासून रंगपंचमीसाठी रंग तयार केला जातो. रंग तयार केलेल्या भांड्यात जोपर्यंत फगवा टाकत नाही, तोपर्यंत रंग खेळला जात नाही. होळी हा सण सतत पाच दिवस साजरा केल्यानंतर पाचव्या दिवशी मात्र एकत्र बसून वर्गणी (फगवा) मोजली जाते. पैशांची व धान्याची मोजणी केल्यानंतर फगवा मागण्यासाठी जी मंडळी होती, त्या मंडळींना एकत्र करून बोकड, कोंबड्या बोलावून त्याचा वाटा करून प्रत्येकाच्या घरात देतात किंवा एकत्र स्वयंपाक करून एकत्रित जेवतात.  ही मेळघाटातील होळीची महती आहे.

होळी हा आदिवासी कोरकू बांधवांकरिता महत्त्वाचा सण आहे. लग्नाची बोलणी असो वा मुलांचा संस्कारविधी, सर्व काही यादरम्यान होतात. वेगवेगळ्या दिवशी होळी करून एकत्रित आनंद लुटतात. - डॉ. रोहिणी देशमुख, समाजशास्त्र विभाग, संगा़बा अमरावती विद्यापीठ

पंचायतीत निर्णय  कोणत्या गावी हा कार्यक्रम कधी करायचा, यासाठी पंचायत भरते. गावातील पाटील याचा निर्णय देतात. ज्या-ज्या गावातून वर्गणी गोळा केली असेल, त्या-त्या गावातील मंडळीला जेवायला बोलावले जाते.

 

टॅग्स :Holiहोळी 2022