शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

विदर्भ राज्य आंदोलन समितीद्वारे वीज बिलाची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 01:45 IST

शेतकऱ्यांची, शेतमजुरांची, झोपडपट्टीवासीयांची, कारखान्यांची, व्यापारी व उद्योजक अशा सर्वांची वीज बिले निम्म्याने कमी करण्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या पदाधिकाºयांनी गुरुवारी महावितरण कार्यालयासमोर वीज बिलांची होळी करण्यात आली.

ठळक मुद्देचार तास ठिय्या : शेतकऱ्यांवर अन्याय बंद करा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शेतकऱ्यांची, शेतमजुरांची, झोपडपट्टीवासीयांची, कारखान्यांची, व्यापारी व उद्योजक अशा सर्वांची वीज बिले निम्म्याने कमी करण्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या पदाधिकाºयांनी गुरुवारी महावितरण कार्यालयासमोर वीज बिलांची होळी करण्यात आली. याशिवाय महावितरण समोर चार तास ठिय्या आंदोलन करण्यात आले.सदर आंदोलन एकाच वेळी संपूर्ण विदर्भात वीज बिलांची होळी करण्यात आली. विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जिल्हा समन्वयक राजेंद्र आगरकर यांच्या नेतृत्वात सदर आंदोलन करण्यात आले. २३ हजार कोटी शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करावे, अशीही जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.मोठ्या उद्योगांना अपुरा वीज पुरवठा, न परवडणारे उच्चांकीचे दर, विदर्भातील शेतीसाठी देण्यात आलेल्या कृषिपंपाच्या वीज जोडण्यांचे अवास्तव भारयिनमन, रात्री वीजपुरवठा करणे आदी प्रकारच्या अडचणी असल्याने शेतकरी व व्यापारी त्रस्त झाले असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. गुरुवारी दुपारी १२ ते ४ या वेळेत ठिय्या आंदोलनही छेडण्यात आले.याप्रसंगी रंजना मामर्डे, विजय कुबडे, रियाज खान, सतीश प्रेमलवार, विजय मोहोड, प्रकाश लढ्ढा, प्रकाश शिरभाते, सुनील साबळे, किशोर मसराम, सुभाष धोटे, विनायक इंगोले, प्रवीण देशमुख यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती. जिल्ह्यात अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आले.मोर्शीत ठिय्या आंदोलनशेतकºयांना कृषिपंपाच्या वीज बिलातून मुक्तीच्या मागणीसाठी मोर्शी तालुक्यातील शेतकरी, नागरिकांनी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या नेतृत्वात महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनात घनश्याम शिंगरवाडे, शेषराव खोडस्कर, सुधाकर गायकी, बंडू साऊत, नगरसेवक रवि गुल्हाने, क्रांती चौधरी, ओंकार काळे, अंकुश राऊत, नूरखाँ रहीमखाँ, रवि नागले, राहुल तायडे, आनंद सदातपुरे, मोहन परतेती, अरविंद इंगळे यांच्यासह शेकडो आंदोलक उपस्थित होते.परतवाड्यातही होळीवीज ग्राहकांच्या लुटीविरोधात गुरुवारी महावितरण कार्यालयापुढे युवा स्वाभिमानी संघटना, भ्रष्टाचार निर्मूलन समिती व समता परिषद, राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी संघटना, शेतकरी संघटना, मानव विकास संघटना मनसे आदींनी संयुक्तरीत्या विजेची बिले जाळली. बंटी केजडीवाल यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या आंदोलनात अनुष्का बेलोकार, पूजा सातपुते, कल्पना सातपुते, छाया वैद्य, संगीता वंजारी, छाया चिरडे, सोहन कोल्हापुरे, नरेंद्र शर्मा, मनीष गवळी, गोलू निमकडे, श्याम साहू, कैलास गणेशे, चेतन बाळापुरे, हरीश शिंपीकर आदी उपस्थित होते.अंजनगावात जाळली वीज बिलेविदर्भात ६ हजार ३०० मेगावॅट विज तयार होते आणि त्यातील फक्त २ हजार २०० मेगावॅट वीज विदर्भवासी वापरतात. त्यातही देशातील सर्वात महाग वीज विदर्भातील जनतेला दिली जाते. या अन्यायाविरुद्ध गुरुवारी अंजनगावात शेतकरी संघटनेने ठिय्या आंदोलन केले आणि महावितरण कार्यालयापुढे वीज बिलाची होळी केली. यावेळी शेतकरी संघटनेचे माधवराव गांवडे, संजय हाडोळे, गजानन दुधाट, माणिकराव मोरे, अशोक गिते, सुनील साबळे, देविदास ढोक, बंडू चोपडे, रमेश पटेल, विजय ढोक, संजय पवार, अरुण गोंडचवर, सुमेध हिंगे, बंडू अरबट, गणेश धोटे, विलास धुमाळे, दीपक काकड, निखिल ठाकरे, गजानन कोल्हे, प्रकाश चºहाटे, किरण काकड आदी उपस्थित होते.

टॅग्स :electricityवीज