शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
2
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
3
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
4
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
5
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
6
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
7
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
8
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
9
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
10
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
11
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
12
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
13
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
14
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
15
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
16
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
17
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
18
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
19
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
20
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर

एचआयव्हीबाधित ३८ रुग्ण मरणाच्या दारी

By admin | Updated: May 18, 2016 23:59 IST

टीएल औषधींचा तुटवड्यामुळे एचआयव्हीबाधित ३८ रुग्ण सद्यस्थितीत मरणाच्या दारी आहेत. शासनाकडूनच पुरवठा होत नसल्यामुळे हे रुग्ण हताश झाले आहेत.

लोकमत विशेषअमरावती : टीएल औषधींचा तुटवड्यामुळे एचआयव्हीबाधित ३८ रुग्ण सद्यस्थितीत मरणाच्या दारी आहेत. शासनाकडूनच पुरवठा होत नसल्यामुळे हे रुग्ण हताश झाले आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयात एचआयव्ही एडस्ग्रस्तांच्या उपचारासाठी अमरावती जिल्हा एडस् प्रतिबंधक, नियंत्रण कक्ष आहे. आतापर्यंत या कक्षाच्या माध्यमातून ४ हजार ४५० पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी २ हजार ४२२ एड्सग्रस्तांवर औषधोपचार सुरु आहे. यापैकी ३८ रुग्णांना टीएल औषधींची आवश्यकता आहे. या औषधींचा पुरवठा महाराष्ट्र राज्य एडस् नियंत्रण संस्थेमार्फत राज्यभरात केला जातो. मात्र, इर्विन रुग्णालयाला टीएल औषधींचा पुरवठा होत नसल्यामुळे रुग्णांसमोर जीवनमरणाचा प्रश्न उभा ठाकला आहे. टीएल ही औषधी खासगी क्षेत्रात मिळते. महिनाभराची टीएल औषधी १ हजार ४०० रुपयांची होते. मात्र, गोरगरिब एडसग्रस्तांना हे औषधी विकत घेणे सहज शक्य होत नसल्याचे चित्र आहे. प्रशासकीय यंत्रणेच्या सांगण्यावरून तीच औषधी खासगीक्षेत्रातून ८०० रुपयांमध्ये देण्यात येत आहेत. मात्र, आता खासगीक्षेत्रातही टीएल औषधींचा तुटवडा निर्माण झाला आहे. टीएल औषधींचा पुरवठा महिनाभरापासून बंद असल्यामुळे एडसग्रस्तांची वणवण भटकंती सुरु आहे. यासंदर्भात जिल्हा एडस् प्रतिबंधक, नियंत्रण कक्षाचे अधिकारी अजय साखरे यांनी पालकमंत्री प्रवीण पोटे यांची भेट घेऊन टीएल औषधी उपलब्ध नसल्याचा मुद्दा मांडला. जिल्हा एचआयव्ही एड्स फोरम यांनी यासंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक अरूण राऊत यांना एक निवेदन सुध्दा सोपविले आहे. (प्रतिनिधी)रूग्णांच्या निवासाची व्यवस्था कराएचआयव्हीग्रस्त रुग्ण शहर व शहराबाहेरून इर्विनच्या एआरटी केंद्रात औषधोपचाराकरिता येतात. त्यांना मुक्काम करावा लागतो. परंतु सोय नसल्याने त्यांचे हाल होतात.त्यांच्यासाठी इर्विनच्या धर्मशाळेत निवासाची व्यवस्था करण्याची मागणी जिल्हा एचआयव्ही, एड्स फोरमने केली आहेएडस्ग्रस्तांवर एआरटी केंद्रातून उपचार केले जातात. ३८ गरजू रुग्णांची नोंद आमच्याकडे आहे. औषधींच्या तुटवड्यासंबधी वरिष्ठस्तरावर कळविण्यात आले आहे. १५ दिवसांत पुरवठा होईल.- अजय साखरे, कार्यक्रम अधिकारी, एआरटी केंद्र. इर्विनची लिफ्ट सहा महिन्यांपासून बंद इर्विन रुग्णालयातील जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण कक्षाच्या इमारतीमधील लिफ्ट सहा महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे एडसग्रस्तांना पायऱ्या चढूनच जावे लागत आहे. एडसग्रस्तांची प्रतिकारक्षमता कमी असते. ते अशक्त असतात. अशा रुग्णांना पायऱ्या चढून तिसऱ्या माळ्यावरील कक्षापर्यंत जावे लागत आहे. यासंदर्भात एआरटी केंद्राचे प्रमुख अजय साखरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाशी ९ वेळा पत्रव्यवहार केला आहे. मात्र, अद्याप त्यांच्याकडून लिफ्ट दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आलेले नाही. त्यामुळे बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ही लिफ्ट तातडीने दुरूस्त करण्याची मागणी आहे.