शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

रेतीचोरांकडून धारणीच्या नायब तहसीलदाराला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 22:26 IST

येथील नायब तहसीलदारास रेतीचोरांकडून मारहाण करण्यात आली. धावत्या ट्रॅक्टरमधून उडी घेतल्याने त्यांचा जीव वाचला. ही घटना तालुक्यातील सोनाबर्डी रेतीघाटाजवळ ३ जानेवारी रोजी दुपारी १२.४५ च्या सुमारास घडली. धारणी पोलिसांनी विनाक्रमांकाच्या ट्रॅक्टर चालकाविरुद्ध भादंविचे कलम ३७९, ३५३, ३३२, ३६७, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देसोनाबर्डीची घटना : जीव वाचविण्यासाठी धावत्या ट्रॅक्टरमधून उडी

धारणी : येथील नायब तहसीलदारास रेतीचोरांकडून मारहाण करण्यात आली. धावत्या ट्रॅक्टरमधून उडी घेतल्याने त्यांचा जीव वाचला. ही घटना तालुक्यातील सोनाबर्डी रेतीघाटाजवळ ३ जानेवारी रोजी दुपारी १२.४५ च्या सुमारास घडली. धारणी पोलिसांनी विनाक्रमांकाच्या ट्रॅक्टर चालकाविरुद्ध भादंविचे कलम ३७९, ३५३, ३३२, ३६७, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला.आदिनाथ तानाजी गांजरे (३२) असे नायब तहसीलदाराचे नाव आहे. धारणी तहसीलमध्ये निवडणूक विभागात कार्यरत गांजरे हे ३ जानेवारीस सहकाऱ्यांसह सोनाबर्डी रेतीघाटाची पाहणी करण्यास गेले होते. त्यावेळी एका ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये रेती भरली जात असल्याचे निदर्शनास आले. गांजरे यांनी संबंधित चालकास वाहन धारणी तहसील कार्यालायात नेण्यास बजावले. त्यावेळी चालकाने रेती जागीच रिकामी केली व पळून जाण्याचा प्रयत्न केला. तो तो प्रयत्न हाणून पाडण्यासाठी गांजरे ट्रॅक्टरवर चढले. त्यावेळी आरोपी चालक व त्याच्या सहकाºयांनी गांजरे यांना मारहाण केली. गांजरे हे ट्रॅक्टरवर असतानाच आरोपी ट्रॅक्टर ट्रॉली घेऊन पळाले. अखेर एक किलोमीटर अंतरावर गेल्यानंतर ट्रॅक्टरचा वेग कमी झाला. त्यावेळी गांजरे यांनी उडी घेतली.अनोळखी चालक पळण्याच्या बेतात असताना मी ट्रॅक्टरवर चढलो व तो तहसील कार्यालयात नेण्यास सांगितले. त्याने मध्यप्रदेशकडे ट्रॅक्टर पळविला. यामुळे मला चालत्या ट्रॅक्टरमधून उडी घ्यावी लागली.- आदिनाथ गांजरे, नायब तहसीलदारनायब तहसीलदारांची तक्रार दाखल करण्यात आली आहे. आरोपीच्या छायाचित्रावरून त्याची ओळख पटविली जाईल. तपास आरंभला आहे.- विलास कुलकर्णीपोलीस निरीक्षक, धारणी