शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात आंदोलकांना मोठा धक्का! सेव्हन सिस्टर्सच्या मास्टरमाईंडनेच साथ सोडली, विद्यार्थी नेते सत्तेसाठी हपापले...
2
मुस्लिम कार्यकर्त्याचं स्वागत करणं ब्रिटीश पंतप्रधानांना पडलं महागात; कीर स्टार्मर यांच्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड!
3
‘ते मरावेत’, असं झेलेन्स्की यांना का वाटतं?
4
खिशाला लागणार कात्री! नवीन वर्ष २०२६ मध्ये चांदी ₹३ लाख आणि सोनं ₹१.६० लाखांच्या पार जाणार?
5
आजचा दिवस रेल्वे अपघातांचा! जेव्हा टाटानगर एक्स्प्रेस जळत होती, तेव्हा जगाच्या या कोपऱ्यात ट्रेन घसरली, १३ जणांचा मृत्यू
6
'ऑपरेशन सिंदूर' वेळी भारताला समजावण्यासाठी हे दोन देश आले होते, युद्धविरामवर पाकिस्तानचा दावा
7
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी; DCM एकनाथ शिंदेंनी दिले आदेश
8
भारतासाठी इशाऱ्याची घंटा; बांगलादेश हा केवळ शेजारी देश नाही, तर... 
9
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२१,३४१ चं फिक्स व्याज, गॅरंटीसह मिळणार परतावा
10
भीषण काळरात्र! टाटा नगर-एर्नाकुलम एक्स्प्रेसमध्ये आग; एकाचा होरपळून मृत्यू, दोन डबे खाक!
11
Video : हवेत टक्कर अन् काही सेकंदात जमिनीवर कोसळले हेलिकॉप्टर! अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद
12
चांदी जैसा रंग है तेरा...! 'ही' छैल छबेली चांदी फक्त भाव खात चालली आहे...
13
"युक्रेन शांतता चर्चा ९५% यशस्वी, पण..." झेलेन्स्की-ट्रम्प यांच्यात काय चर्चा झाली? हा महत्वाचा मुद्दा अद्यापही लटकूनच
14
रशियन सैन्यातील १० भारतीयांचा युद्धात मृत्यू; भावाचा शोध घेणाऱ्या तरुणाचा खळबळजनक दावा
15
आजचे राशीभविष्य २९ डिसेंबर २०२५ : या राशीला आज लॉटरी लागणार, शेअर्समध्ये पण...
16
१ महिन्यात ३ चतुर्थींचा अद्भूत योग; २०२६ मध्ये किती अन् कधी विनायक-संकष्टी तिथी? यादीच पाहा
17
एआयच्या निमित्ताने अदानींसोबतच पवार कुटुंब एकाच व्यासपीठावर; शरद पवार यांचे अदानींकडून कौतुक
18
मुंबई महापालिकेत काँग्रेस-वंचित युती; इतर महापालिकांचा निर्णय स्थानिक पातळीवर; वंचित ६२ जागा लढवणार, अकोल्यात मात्र वेटिंग
19
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
20
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
Daily Top 2Weekly Top 5

अनैतिक संबंधातून झाले त्याच्या जीवनाचे वाटोळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 22:10 IST

स्थानिक पेठ मांगरुळीचा ५२ वर्षीय विवाहित इसम जिजाऊ नगरमध्ये भाड्याने घर घेऊन पत्नी आणि मुलीसह वास्तव्यास होता. परंतु सुखी संसारात एका २२ वर्षीय तरुणीचे आगमन झाले नि संसाराचे वाटोळे होऊन लग्नाची पत्नी तीन वर्षापूर्वीच मुलीसह माहेरी गेली.

ठळक मुद्देपेठ मांगरुळीचा थरार : अनैतिक संबंधाचा बळी ठरली रूपाली

लोकमत न्यूज नेटवर्कवरुड : स्थानिक पेठ मांगरुळीचा ५२ वर्षीय विवाहित इसम जिजाऊ नगरमध्ये भाड्याने घर घेऊन पत्नी आणि मुलीसह वास्तव्यास होता. परंतु सुखी संसारात एका २२ वर्षीय तरुणीचे आगमन झाले नि संसाराचे वाटोळे होऊन लग्नाची पत्नी तीन वर्षापूर्वीच मुलीसह माहेरी गेली.मृत रुपालीसोबत त्याचे अनैतिक संबंध कायमच राहिले. घरी येणे-जाणे सुरूच होते. १ डिसेंबरला तरुणी दुपारी दीड वाजताच्या सुमारास याच्या घरी आली. आरोपी हा दारुच्या नशेत असताना तिने पैसे मागितल्याचे कारण सांगण्यात येत असून, रागाच्या भरात चाकूने वार करून तिला गंभीर जखमी केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रुपालीचा मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपीने बाहेरून कुलूप लावून पळ काढला आणि थेट कळमेश्वर पोलिसापुढे शरणांगती पत्करुन हकीकत सांगितली. वरुड पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले तर मृतदेहाचा पंचनामा करून खुनाचा गुन्हा दाखल केला.मृत रुपाली वासुदेव बावस्कर २२ रा. बहादा हिचे आरोपी गजानन महादेव यादव पेठ मांगरुळी ह.मु. जिजाउनगर वरुड याचेसोबत गेल्या दोन - तीन वर्षांपासून अनैतिक संबंध असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी विवाहित असून त्याला पत्नी आणि एक मुलगी आहे. दोन-तीन वर्षांपासून कळमेश्वर येथे माहेरी राहत होती. आरोपीचे तीन वर्षांपासून रुपालीसोबत संबंध असल्याचे सांगण्यात येते. तेव्हापासूनच पती-पत्नीमध्ये खटके उडून पत्नी मुलीसह माहेरी कळमेश्वरला निघून गेल्याचे सांगितले. मृत ही आरोपी प्रियकराला वारंवार पैशांची मागणी करीत होती. प्रियकर हा मजुरी करीत होता. ते शक्य नसल्याने त्रस्त झाल्याची कबुली आरोेपीने दिली. १ डिसेंबरच्या दुपारी प्रेयसी रुपाली ही दुपारच्यावेळी दीड वाजतादरम्यान बहादा येथून बँकेतून वरूडला पैसे काढण्यास जाण्याचे आई-वडिलांना सांगून निघाली होती. ती थेट आरोपीच्या घरात पोहचली. येथे दोघांचे काय झाले हे कुणालाही परिसरात माहिती नव्हते. गजाननला नेहमी पैसे मागत असल्याने मद्यधुंद अवस्थेत असताना मृतासोबत त्याचे भांडण झाले. यातूनच चाकूने पोटावर वार करून तरुणीचा खून केल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनेनंतर सदर आरोपी हा पांढुर्णा, सावनेरमार्गे कळमेश्वरला गेला. आरोपीसुद्धा आत्महत्या करण्याच्या बेतात असताना विचार बदलल्याने आरोपीने स्वत:च कळमेश्वर पोलिसांपुढे आत्मसमर्पण करून गुन्ह्याची कबुली दिली. यासंदर्भात पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी दिलदार तडवी, ठाणेदार दीपक वानखडे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक कांबळे, गट्टे, उपनिरीक्षक प्रिया उमाळे, जमादार उमेश ढेवले, धानोरकर, चौधरी, कुकडे यांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली. सोमवारी दुपारी २ वाजता अमरावती मध्यवती कारागृहात रवानगी करण्यात आली.