शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
4
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
5
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
6
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
7
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
8
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
9
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
10
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
11
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
12
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
13
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
14
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
15
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
16
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
17
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
18
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
19
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
20
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...

हिरूळपूर्णाच्या मायलेकाची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 05:01 IST

मुंबईहून माहेरी १७ मे रोजी परतलेली २५ वर्षीय महिला व तिच्या तीन वर्षीय मुलाला हिरूळपूर्णा गावातच क्वारंटाईन सेंटरवर ठेवण्यात आले. त्या महिलेच्या पतीचा अहवाल मुंबई येथे कोरोना पॉझिटिव्ह आला होता. तालुका प्रशासनाने माय-लेकाला २२ मे रोजी अमरावती येथे हलविले. २४ मे रोजी रात्री ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये एकच दहशत पसरली होती.

ठळक मुद्देघरी परतले : गाव दहशतमुक्त, जगण्याच्या जिद्दीला सलाम

सुमीत हरकूट ।लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : कल्याण (मुंबई) येथून माहेरी परतलेल्या माय-लेकांमुळे तालुक्यात कोरोनाचा सर्वप्रथम शिरकाव झाला. मात्र, सकारात्मक दृष्टिकोन व जिद्दीमुळे तालुक्यातील ते पहिले कोरोनाग्रस्त आता कोरोनामुक्त झाले आहेत. ते हिरूळपूर्णा येथील स्वगृही परतले आहेत. यामुळे गावच नव्हे, अख्ख्या चांदूरबाजार तालुक्यास दिलासा मिळाला आहे.मुंबईहून माहेरी १७ मे रोजी परतलेली २५ वर्षीय महिला व तिच्या तीन वर्षीय मुलाला हिरूळपूर्णा गावातच क्वारंटाईन सेंटरवर ठेवण्यात आले. त्या महिलेच्या पतीचा अहवाल मुंबई येथे कोरोना पॉझिटिव्ह आला होता. तालुका प्रशासनाने माय-लेकाला २२ मे रोजी अमरावती येथे हलविले. २४ मे रोजी रात्री ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये एकच दहशत पसरली होती. त्या माय-लेकाला उपचारासाठी अमरावतीच्या कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तसेच त्यांच्या संपर्कात आलेले नऊ नातेवाईक व १८ इतर व्यक्तींचे थ्रोट स्वॅब घेण्यात आले. याशिवाय गावातील ५८ व्यक्तींना चांदूर बाजार येथील क्वारंटाईन सेंटरला दाखल करण्यात आले होते. सलग १३ दिवस वेगवेगळ्या वॉर्डांमध्ये त्या माय-लेकाने कोरोनाशी झुंज दिली. त्या तीन वर्षीय चिमुकल्यास तर १३ दिवस ना आई दिसली, ना कुणी आप्त. कोविड रुग्णालयातील वार्डात त्याने डॉक्टर व परिचारिकांच्या स्नेहाने लढाई जिंकली. १३ दिवसानंतर पुन्हा दोघांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. यामध्ये दोन्ही रुगणांचा अहवाल निगेटिव्ह आला तसेच या मायलेकाच्या संपर्कात आलेल्या सर्व २७ व्यक्तींचे अहवालसुद्धा निगेटिव्ह प्राप्त झाले. कोरोनामुळे दहशतीत सापडलेल्या हिरूळपूर्णा रहिवाशांनी यामुळे सुटकेचा श्वास सोडला. कोविड रुग्णालयातील उपचारानंतर ३ जून रोजी ते माय-लेक घरी परतले आहेत.तूर्तास माहेरीकोरोनावर यशस्वी मात करणारी महिला तिच्या मुलासह माहेरी हिरूळपूर्णा येथेच वास्तव्यास आहे. खबरदारी म्हणून त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले. तालुका महसूल व आरोग्य प्रशासनाने खबरदारी घेत तातडीने सूत्रे हलविले. हायरिस्क, लोरिस्कच्या व्यक्तींची यादी बनवून त्यांना होम व इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात आले. अख्खे गाव सॅनिटाइज करण्यात आले. तालुका आरोग्य अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी ही संपूर्ण यंत्रणा कामाला लागल्याने संपर्कातील व्यक्तींना तातडीने क्वारंटाईन करण्यात आले. परिणामी संसर्ग रोखला गेला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या