शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

चांदूर बाजार बसस्थानकातील हिरकणी कक्षाला टाळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2024 14:16 IST

Amravati : प्रवासी स्तनदा मातांची कुचंबणा, कक्ष उघडे ठेवण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार: स्थानिक बसस्थानकामधील हिरकणी कक्षाला नेहमीच टाळे असते. त्यामुळे येथून प्रवास करणाऱ्या स्तनदा मातांना कुचंबणा सहन करावी लागत आहे. सार्वजनिक ठिकाणी स्तनदा मातांची होणारी कुचंबणा लक्षात घेता, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने राज्यातील विविध बसस्थानकांवर हिरकणी कक्ष सुरू केले. चांदूर बाजार बसस्थानकात हिरकणी कक्ष असले - तरी हा कक्ष कुलूपबंद आहे. स्थानिक अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून या धोरणावर पाणी फिरविल्याचे चित्र समोर येत आहे.

राज्यातील महायुतीच्या शिंदे सरकारने महिलांना पन्नास टक्के २ बसभाड्यात सवलत दिली असल्याने ९५ टक्के महिला एसटी बसने प्रवास करीत आहेत. यामध्ये तान्हुल्यांना घेऊन प्रवास करणाऱ्या महिला सुद्धा आहेत. बसस्थानकावरील गोंधळ, गर्दी, विविध वाहनांच्या कर्णकर्कश आवाजामुळे लहान बाळांची चिडचिड होते. त्यामुळे बाळ रडू लागल्यास मातांना आपल्या बाळांना स्तनपान द्यावे लागते. मात्र, हिरकणी कक्ष कुलूपबंद असल्याने ते सर्व उघड्यावर करावे लागते. परिणामी, त्यांची कुचंबणा होत आहे. यासंदर्भात चांदूर बाजार आगार व्यवस्थापकांच्या कार्यालयीन क्रमांकावर अनेकदा संपर्क केला असता, कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही.

मूळ उद्देशालाच हरताळचांदूर बाजार बसस्थानकात सुरुवातीला या कक्षामुळे अनेक स्तनदा मातांना दिलासा मिळाला. मात्र, या कक्षाकडे महामंडळाने दुर्लक्ष केल्याने कक्ष कुलूपबंदच दिसत आहे.

हिरकणी कक्षाला कुलूप राहते. ऐनवेळी चावी कोणाकडे पाहायची, हा प्रश्न उभा ठाकतो. अशा स्थितीत त्या हिरकणी कक्षाचा नेमका उद्देश तरी काय? असा प्रश्न निर्माण होत आहे.- आश्विनी डकरे, समाज सेविका, चांदूर बाजार 

टॅग्स :Amravatiअमरावती