शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अपहरणाचा कट उधळला

By admin | Updated: July 1, 2014 01:15 IST

शहरातील एका श्रीमंताच्या मुलाचे अपहरण करुन एक कोटी रुपयांची खंडणी मागण्याची योजना आखणाऱ्या टोळीतील दोन आरोपींना पोलिसांनी त्यापूर्वीच अटक करुन अपहरणाचा कट उधळून लावल्याने

एक कोटीची खंडणी : अनर्थ टळला, पोलीस उपायुक्तांची माहितीअमरावती : शहरातील एका श्रीमंताच्या मुलाचे अपहरण करुन एक कोटी रुपयांची खंडणी मागण्याची योजना आखणाऱ्या टोळीतील दोन आरोपींना पोलिसांनी त्यापूर्वीच अटक करुन अपहरणाचा कट उधळून लावल्याने मोठा अनर्थ टळला. दुचाकी चोरीप्रकरणी अटकेतील आरोपींनी पोलिसांना शहरातील एका श्रीमंताच्या मुलाच्या अपहरणाची योजना आखली होती, अशी धक्कादायक माहिती पोलिसांना दिली. अब्दुल इम्रान अब्दुल सलीम (२९) हा भारतीय महाविद्यालयात बी. कॉम तृतीय वर्ष व अश्विन गणेश वाघमारे (२२ दोन्ही रा. बिच्छु टेकडी) हा विमलाबाई देशमुख महाविद्यालय (रुलर) येथे इयत्ता १२ वीचा विद्यार्थी आहे. या दोघांना काही महिन्यांपूर्वी गाडगेनगर पोलिसांनी दुचाकी चोरी प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर जामीनावर ते सुटले होते. दरम्यान या टोळीचा मास्टर मार्इंड असलेला अब्दुल इम्रान व अश्विनने लहान- मोठ्या चोरी करण्यापेक्षा मोठा हात मारण्याचा कट रचला. कटातील साथीदाराचा शोध सुरुया कटात आणखी एक साथिदार सहभागी होता. त्यांनी शहरातील एका श्रीमंत पित्याच्या मुलाचे अपहरण करुन एक कोटी रुपयांची खंडणी मागण्याची योजना आखली. यासाठी त्यांनी शहरातून दोन दुचाकी वाहने चोरी केली. परंतु त्यांना फ्रेजरपुरा पोलिसांनी अटक करुन त्यांच्याकडून चोरीच्या दोन दुचाकी जप्त केल्या. पोलीस कोठडीदरम्यान आरोपींचे खरे रुप पोलिसांपुढे आले. त्यांनी पोलिसांना तीन घरफोडींसह शहरातील ज्या श्रीमंत व्यक्तीच्या मुलाचे अपहरण करणार होते त्याचे नाव व योजना सांगितली. हे चोरटे वेळीच हाती लागल्याने शहरात मोठी घटना टळल्याची माहिती पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.मेडिकलमधून खरदी केले गुंगीचे औषधश्रीमंताच्या मुलाचे अपहरण केल्यानंतर त्याला रडू येऊ नये यासाठी अब्दुल इम्रानने त्याला बेशुद्ध करण्यासाठी मेडिकलमधून क्लोरोफॉर्म हे गुंगीचे औषध खरेदी केले होते, अशी माहिती त्याने पोलिसांना दिली