शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेचे आमदार निलेश राणेंची BJP प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांवर आगपाखड, संतापून म्हणाले...
2
Sushma Andhare : "प्रिय उदयभाऊ, उपमुख्यमंत्री पदाची तुमची सुप्त महत्वकांक्षा मी..."; सुषमा अंधारेंचा खोचक टोला
3
शेअर मार्केट, रियल इस्टेट क्रॅश येणार? रॉबर्ट कियोसाकींचा मोठा इशारा; 'या' क्षेत्रात गुंतवणुकीचा सल्ला
4
"अजित पवार उपमुख्यमंत्री; मुख्यमंत्री फडणवीस, त्यामुळे त्यांनाच मतदान करा", चंद्रकांत पाटलांचं विधान
5
पंकजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू; कुटुंबीयांकडून हत्येचा गंभीर आरोप, वरळी पोलीस ठाण्यात आक्रोश
6
शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे सोन्याला पुन्हा भाव! मात्र, चांदी घसरली; आजचे दर काय?
7
Delhi Blast : दहशतवादी डॉक्टरांमध्ये मतभेद; आदिलच्या लग्नाला का गेला नाही उमर? दिल्ली स्फोटात मोठा खुलासा
8
IND vs SA : कोण आहे Senuran Muthusamy? कसोटी पदार्पणात 'विराट' विकेट; भारताशी खास कनेक्शन अन् बरंच काही
9
४०व्या वर्षी दुसऱ्या बाळाला जन्म देणार सोनम कपूर, हटके मॅटर्निटी फोटोशूटने वेधलं लक्ष
10
युद्धाचा भडका उडणार, अमेरिका 'या' देशात सत्तांतर घडवण्याच्या तयारीत?; विमाने रद्द, युद्धनौका, लढाऊ विमाने तैनात
11
कर्मचारीहिताचा मोठा निर्णय! 'गिग वर्कर्स'नाही मिळणार PF-ग्रॅच्युइटी; नवीन लेबर कोडचे ३ महत्त्वाचे फायदे!
12
टॉर्चर अन् चॅटिंगने १० महिन्यातच संपवला संसार; पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीच्या मृत्यू प्रकरणात गूढ वाढले
13
काळाचा घाला! नैनीतालमध्ये भीषण अपघात, खोल दरीत पडली कार; तिघांचा मृत्यू, १ जखमी
14
"लढाई करून जिंकण्याचा दम नाही म्हणूनच..."; दिल्ली स्फोटावरून लष्करप्रमुख द्विवेदींनी पाकिस्तानचे काढले वाभाडे
15
टीम इंडियावर वनडेत नवा कर्णधार शोधण्याची वेळ! कोण घेणार शुभमन गिलची जागा?
16
जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकांवर टांगती तलवार; सुप्रीम कोर्टात काय होईल? इच्छुकांची घालमेल
17
VIDEO: हरलेल्या संघाच्या कॅप्टनला विचारलं- "जिंकल्यावर कसं वाटतंय?"; चूक लक्षात येताच....
18
"तू आई-वडिलांना छोट्या गोष्टी..."; फिजिओथेरपिस्टचा होणाऱ्या नवऱ्याला मेसेज, का संपवलं आयुष्य?
19
५ डॉक्टरांनी २६ लाख जमवले; दिल्लीतील स्फोट फक्त ट्रेलर, अनेक शहरांत हल्ल्याची योजना, NIA चा खुलासा
20
आमदार आल्यानंतर उभे न राहिल्याने डॉक्टरवर कारवाई; हायकोर्टानं काढली सरकारची खरडपट्टी, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

सर्वाधिक लाचखोरी महसूल विभागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 22:18 IST

लाचखोरीमध्ये अव्वल राहण्यासाठी महसूल विभाग व पोलीस प्रशासनामध्ये नेहमीच स्पर्धा असते. २०१० पासून या दोन विभागांची त्यासाठी चढओढ राहिली आहे.

ठळक मुद्देमहापालिका, पंचायत समितीही आघाडीवर : पोलीस प्रशासन दुसऱ्या क्रमांकावर

संदीप मानकर ।आॅनलाईन लोकमतअमरावती : लाचखोरीमध्ये अव्वल राहण्यासाठी महसूल विभाग व पोलीस प्रशासनामध्ये नेहमीच स्पर्धा असते. २०१० पासून या दोन विभागांची त्यासाठी चढओढ राहिली आहे. महापालिका व पंचायत समित्यांनीदेखील यादीत तिसरा-चौथा क्रमांक पटकावत ‘हम भी कुछ कम नही’ हे दाखवून देत आहेत. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) कडून मिळालेल्या राज्यस्तरीय आकडेवारीवरून २०१० च्या तुलनेत २०१७ मध्ये सापळ्यांच्या प्रमाणात दुपटीने वाढ झाल्याचे निदर्शनास येत आहे.१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१० या वर्षभराच्या कालावधीत एसीबीने लाचखोरीविरोधात ४८६ सापळे यशस्वी केले. यामध्ये ६०८ आरोपींना अटक करण्यात आली. या वर्षात लाचखोरीत पहिल्या क्रमांकावर १०९ ट्रॅपसह पोलीस प्रशासन होते. दुसरे स्थान महसूल विभागाने (९५ ट्रॅप) राखले. महापालिका (३९) व पंचायत समिती (३८) चौथ्या स्थानी होती. २०१२ या वर्षात २०१० च्या तुलनेत ट्रॅपमध्ये किंचित वाढ झाली. या वर्षात एकूण ४८९ सापळ्यांमध्ये ६३३ जणांना ताब्यात घेतले. या वर्षातही पोलीस प्रशासन १२७ ट्रॅपसह अव्वल स्थानी होते. पाठोपाठ महसूल (९९) विभाग होता. यावेळी मात्र महापालिका विभागाने (३१) तिसरा व पंचायत समिती विभागाने (२४) चौथा क्रमांक घेतला.२०१७ च्या आकडेवारीनुसार ८७५ सापळ्यांची या वर्षात राज्यात नोंद झाली. यामध्ये ११४७ जणांना अटक करण्यात आली. यावर्षी महसूल (२०७) पहिल्या स्थानी, तर पोलीस विभाग (१६९) दुसºया क्रमांकावर आहे. पंचायत समित्यांमध्ये ९७, तर मनपा क्षेत्रात ६५ ट्रॅप करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभाग व जलसंपदा विभागात भ्रष्टाचाराची अनेकानेक प्रकरणे उघडकीस येत असतानाही हा विभाग मात्र लाचखोरीची प्रकरणे दाखल होण्याच्या विषयात माघारला आहे, हे विशेष!२०१५ मध्ये हजारांवर सापळेप्रवीण दीक्षित यांनी १ आॅक्टोबर २०१३ रोजी पोलीस महासंचालक (एसीबी) या पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर लाचखोरीची सर्वाधिक प्रकरणे नोंदविण्यात आली. २०१५ मध्ये तब्बल १२३४ ट्रॅप यशस्वी झाले. यामध्ये १५९३ जणांना ताब्यात घेण्यात आले होते. महसूलचे ३०८ व पोलिसांचे २७६ ट्रॅप झाले. तिसºया क्रमाकांवर पंचायत समिती विभाग (१३९) होता. महापालिकांत ७२ सापळे यशस्वी झाले.जानेवारी २०१८ मध्ये ७९ सापळेराज्यातील एसीबीच्या पथकांनी १ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०१८ दरम्यान एकूण ७९ सापळे यशस्वी केले असून, यामध्ये १०० जणांना आरोपी करण्यात आले आहे. लाचखोरांकडून १९ लाख १७ हजार १०० रुपये जप्त करण्यात आले आहेत.