शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

३६०० कोटींच्या ‘त्या’ भोजन पुरवठा निविदाप्रकरणी राज्य सरकारला उच्च न्यायालयाची नोटीस

By गणेश वासनिक | Updated: April 12, 2023 19:20 IST

सामाजिक न्याय विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह, मागासवर्गीय संस्थांवर अन्याय झाल्याबाबत याचिका दाखल

अमरावती: राज्यात शिंदे-फडणवीस सरकारने बड्या कंपन्यांसाठी सामाजिक न्याय व  विशेष सहाय्य विभागाच्या ४४१ वसतिगृहात भोजन पुरवठा करण्यासाठी ३६०० कोटींची निविदा काढल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी नोटीस बजावली आहे. सरकारला जबाब दाटल करण्यासाठी दोन आठवड्याचा कालावधी देण्यता आला आहे. भीम शक्ती संघटनेचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष पंकज मेश्राम यांनी मागासवर्गीय संस्थांवर अन्याय झाल्याबाबतची याचिका दाखल केली आहे, हे विशेष.

पंकज मेश्राम यांनी नागपूर खंडपीठात दाखल याचिका क्रमांक १७१३/ २०२३ नुसार सामाजिक न्याय विभागातंर्गत राज्यात मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी एकूण ४४१ शासकीय वसतिगृहे, अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलां-मुलींसाठी १०० शासकीय निवासी शाळा आहेत. शासकीय निवासी शाळा व वसतिगृहामधील प्रवेशित विद्यार्थ्यांना भोजन पुरवठा करण्यासाठी यापूर्वी  विभागीय स्तरावर निविदाद्वारे प्रादेशिक उपायुक्त यांच्या समितीमार्फत प्रति कंत्राटदाराला चार वसतिगृहे, शाळांची जबाबदारी दिली हाेती. त्यामुळे हजारो मागासवर्गीय बेरोजगारांना कंत्राटाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध व्हायचा. मात्र, २४ जून २०२२ रोजी शासन निर्णयाला नव्या सरकारने स्थगिती न देता त्याला महिन्याभराची मुदतवाढ दिली.

आता राज्यासाठी एकच कंत्राट काढून ५० कोटींची आर्थिक उलाढाल तीन वर्षात  १५ जिल्ह्यांत १०० ठिकाणी १० कोटींचे भोजन पुरवठा, अनामत २५ लाख व ७५० नोंदणीकृत (पी.एफ) कामगार अशी जाणीवपूर्वक अटी, शर्ती आहेत. दरवर्षी १२०० काेटी याप्रमाणे तीन वर्षाचा भोजन पुरवठा कालावधीकरिता ३६०० कोटींचा कंत्राट बड्या कंत्राटदारांना मिळावा, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे या निविदेत मागासवर्गीय बेरोजगार संस्था सहभाग होऊ शकत नाही, अशी यंत्रणा राज्य सरकारमध्ये कार्यरत असल्याचे याचिकेत नमूद आहे. न्या. ए.एस. चांदुरकर, न्या. एम.डब्ल्यू. चांदवाणी यांच्या पीठासीनासमोर ५ एप्रिल २०२३ रोजी ही याचिका दाखल केली होती, तर बुधवार १२ एप्रिल रोजी राज्य सरकारला नोटीस जारी करण्यात आली आहे.याचिकाकर्त्यावतीने ॲड. सोनिया गजभिये यांनी तर राज्य सरकारच्यावतीने ॲड. ए.एम. देशपांडे यांनी कामकाज सांभाळले.

टॅग्स :Courtन्यायालय