आंदोलनाचा इशारा : आयुष मंडळाकडून शेतकऱ्यांची दिशाभूलअंजनगाव सुर्जी : वनौषधीयुक्त वनस्पती उत्पादनाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये मोठी मागणी आहे. मात्र, या पिकाला येणारा खर्च मोठा असल्याने व आयुष मंडळाच्या वतीने देण्यात येणारे अनुदान बंद झाल्याने शेतकरी बेजार झाले आहेत. सुरुवातीला या पिकाला कोणतीही रोगराई नव्हती त्यामुळे शेतकऱ्यांना हे पीक परवडणारे होते. परंतु गेली ५ ते ६ वर्षापासून या वनौषधी पिकांवर निसर्गाच्या सततच्या अवकृपेमुळे रोगराई येत असून त्यामध्ये वनौषधी पिकवणारे शेतकरी हवालदिल झाले आहेत.या खर्चीक असलेल्या पिकांना केंद्र सरकारकडून ६० टक्के अनुदान व ४० टक्के वाटा हा महाराष्ट्र शासनाच्या आयुष मंडळ पुणे यांच्याकडून दरवर्षी मिळत होते. त्यासाठी आयुष मंडळ पुणे यांचेकडून महाराष्ट्रातील एकूण वनौषधी पिकांचा कृती आराखडा अॅक्शन प्लॅन दरवर्षी सादर करावा लागत असतो. परंतु यावर्षी मागील महिन्यामध्ये दिल्ली येथे आयुष मंडळाच्या झालेल्या बैठकीदरम्यान पुणे औषधी मंडळाच्यावतीने कोणत्याही जबाबदार अधिकाऱ्याने महाराष्ट्रातील औषधी वनस्पतीवरील अनुदान व एकूण लागवड व त्यावरील उपाययोजनांबाबत कोणताही कृती आराखडा सादर केला नाही. त्यामुळे यावर्षी सन २०१६-१७ मध्ये महाराष्ट्रातील सर्व वनौषधी पीक उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळणार नाही. परिणामी वनौषधी उत्पादक शेतकरी पूर्णपणे अनुदानापासून वंचित राहणार आहेत. याबाबत माहिती मिळताच अंजनगावचे नगराध्यक्ष कमलकांत लाडोळे, मनोहर मुरकुटे यांनी दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री भाऊसाहेब पुंडकर, प्रवीण पोटे, आ. रमेश बुंदिले, जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रार केली. (शहर प्रतिनिधी)सुपीक शेतीत लागवडसंपूर्ण महाराष्ट्रामध्ये विशेषत: सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या अकोला, बुलडाणा, अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव, अकोट, जळगाव जामोद, चिखलदरा, अचलपूर या भागातील सुपीक असलेल्या शेतीमध्ये फार मोठ्या प्रमाणात वनौषधी पिकाची लागवड केली जाते.
अनुदान बंद झाल्याने वनौषधी उत्पादक बेजार
By admin | Updated: March 28, 2017 00:05 IST