शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
5
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
6
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
7
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
8
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
9
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
10
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
11
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
12
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
13
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
14
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
15
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
16
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
17
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
18
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
19
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?

‘तिच्या’ शरीरावर सात वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 01:19 IST

माथेफिरूने अर्पिता ठाकरेवर चाकूचे तब्बल सात वार केल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालयात डॉक्टरांच्या तपासणीत आढळून आले. घटनास्थळी हत्येच्या थराराने नागरिक भयभीत झाले होते, तर इर्विन रुग्णालयात अर्पिताचा मृतदेह पाहून संतप्त नातेवाइकांनी गोंधळ घातल्याने खळबळ उडाली होती.

अमरावती : माथेफिरूने अर्पिता ठाकरेवर चाकूचे तब्बल सात वार केल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालयात डॉक्टरांच्या तपासणीत आढळून आले. घटनास्थळी हत्येच्या थराराने नागरिक भयभीत झाले होते, तर इर्विन रुग्णालयात अर्पिताचा मृतदेह पाहून संतप्त नातेवाइकांनी गोंधळ घातल्याने खळबळ उडाली होती.तुषार मस्करेने अर्पिताची निर्घृण हत्या केल्यानंतर राजापेठ पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली. प्रेमप्रकरण सुरू ठेवण्यास अर्पिताने नकार दिल्याने तिची हत्या केल्याची कबुली त्याने राजापेठ पोलिसांना दिली. अर्पिता व तुषार यांचे प्रेमप्रकरण शाळेपासून होते. दरम्यानच्या काळात त्यांच्या भेटीगाठी झाल्या. २०१५ मध्ये सालबर्डी येथील मंदिरात त्यांनी लग्न केले. त्यांच्या प्रेमप्रकरणाची भनक कुटुंबीयांना लागली. त्यांनी विरोध दर्शविल्यामुळे अर्पितानेही तुषारला नकार दिला होता. तरीसुद्धा तुषार मागावर असल्याचे पाहून अर्पिताचे कुटुंबीय बडनेरा पोलीस ठाण्यात गेले होते. पोलिसांकडे तोंडी तक्रार करून तुषारला समजाविण्याची विनंती केली. पोलिसांनी ठाण्यात दोघांच्या नातेवाइकांना बोलावून तुषारला समज दिला. यापुढे अर्पिताच्या मागे लागणार नसल्याचे त्यावेळी तुषारने लेखी दिले. तरीसुध्दा तुषारने अर्पिताचा पिच्छा पुरविला. मात्र, तिचा नकार कायम असल्याने मंगळवारी त्याने अर्पिताची हत्या केली. घटनेचे गांभीर्य पाहून पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांच्यासह उपायुक्त यशवंत सोळंके, शशिकांत सातव, सहायक पोलीस आयुक्त बळिराम डाखोरे यांनी राजापेठ पोलीस ठाणे गाठले होते.आक्रोश अन् गोंधळअर्पिताचे वृत्त कळताच कुटुंबीय व परिचयातील अनेक व्यक्ती इर्विन रुग्णालयात दाखल झाले. तिचा मृतदेह पाहून नातेवाइकांनी एकच आक्रोश केला. नातेवाइकांचा प्रचंड आक्रोश व संताप पाहून गोंधळ उडाला होता. त्यामुळे पोलिसांचा ताफा इर्विन रुग्णालयात पोहोचला.प्रेमसंबधांला नकार दिल्याने आरोपीने चिडून तरुणीची हत्या केल्याचे प्राथमिक चौकशीत पुढे आले आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून, पुढील चौकशी सुरु आहे.- संजयकुमार बाविस्करपोलीस आयुक्तमुस्लीम टोपी परिधान केली होती तुषारनेआरोपी तुषार हा नागरिकांची व पोलिसांची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने मुस्लीम गोल टोपी परिधान करून आला होता. हत्येनंतर तो पसार झाला असता, तर मुस्लीम तरुणाने हत्या केल्याचा संशय निर्माण झाला असता, हा त्यामागे उद्देश होता.प्रत्यक्षदर्शीने पकडले तुषारलातुषारने वर्दळीच्या रस्त्यावर अर्पितावर चाकूचे वार केले. यावेळी सचिन वानखडे, नावेद, राजू लंगोटे व रवींद्र पाचंगे यांनी त्याच्याकडे धाव घेतली. त्यांना पाहून तुषारने पलायन केले. सचिन व नावेद यांनी त्याला पकडले, तर रवींद्र व राजू यांनी अर्पिताला रुग्णालयात पाठविले.न्यायवैद्यक तज्ज्ञांनी घेतले रक्तांचे नमुनेराजापेठ पोलिसांनी घटनास्थळावर पडलेल्या रक्तांचे नमुने गोळा केले. जमिनीवर पडलेले रक्त एका विशिष्ट कागदाद्वारे बॉटलमध्ये घेण्यात आले आहे. न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीकरिता हे रक्तनमुने पाठविले जाणार आहेत.मैत्रिणीची तुषारशी झुंजतुषारने अर्पितावर चाकूने वार करताच तिच्या मैत्रिणीने धाडसी वृत्तीचा परिचय देत तुषारच्या हातातील चाकू हिसकण्याचा प्रयत्न केला. तुषारसोबत तिची झटापट झाली. चाकूने अर्पिताच्या मैत्रिणीच्या हातावर जखमा झाल्या.